Agripedia

रेशीम उद्योग उभारण्यासाठी शासनाकडून दोन महत्त्वाच्या योजना राबविल्या जातात.पहिली म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून अनुदानाचा लाभ मिळू शकतो तर दुसरी योजना म्हणजे केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या सिल्क समग्र या माध्यमातूनही अनुदानाचा लाभ घेता येणार आहे.

Updated on 04 December, 2021 10:21 AM IST

रेशीम उद्योग उभारण्यासाठी शासनाकडून दोन महत्त्वाच्या योजना राबविल्या जातात.पहिली म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून अनुदानाचा  लाभ मिळू शकतो तर दुसरी योजना म्हणजे केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या सिल्क समग्र या माध्यमातूनही अनुदानाचा लाभ घेता येणार आहे.

अनुदानाचे स्वरूप

 महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत एका एकर वरील तुतीची लागवड आणि तिची जोपासना याकरिता साहित्य खरेदी म्हणजेच रोपे, खते आणि औषधे यासाठी एकूण दोन लाख 176 रुपये इतके अनुदान तीन वर्षात विभागून दिले जाते.तसेच रेशीम किडे संगोपन गृह बांधकामासाठी एका वर्षात 92 हजार 289 रुपये अनुदान देण्यात येते. परंतु यामध्ये प्रमुख अट अशी आहे की पात्र लाभार्थी यांच्याकडे जॉब कार्ड असणे आवश्यक आहे. तसेच दुसरी योजना सिल्क समग्र ही योजना अशा व्यक्तींसाठी आहे जेमहात्मा गांधी रोजगार हमी योजनेत सहभाग होऊ शकले नाहीत.

सर्वसामान्य लाभार्थ्यांसाठी जॉब कार्ड असेल तर एकूण खर्चाच्या 75 टक्के अनुदान हे तीन वर्षात मिळते. तर अनुसूचित जाती आणि जमाती मध्ये लाभार्थ्यांसाठी 90 टक्के अनुदान तीन वर्षात विभागून दिले जाते. यामध्ये एक एकर तुतीची लागवड बंधनकारक राहणार आहे.

 अशा पद्धतीने करू शकता अनुदानासाठी अर्ज

  • रेशम संचालनालयाची संकेतस्थळ mahasilk.maharashtra.gov.inयावर साईन अप मध्ये न्यू यूजर वर क्लिक करावे.
  • त्यानंतर आय ॲग्री केल्यानंतर स्टॅक होल्डर मध्ये farmer mulberry/Tasar वर क्लिक करावे.
  • त्यानंतर लाभार्थ्यांनी सर्व माहिती भरून शेवटी स्वतःच पासपोर्ट साईजचा फोटो,आधार कार्ड व बँक पासबुकची फोटो कॉपी अपलोड करावी.
  • शेवटी सबमिट केल्यानंतर शेतकऱ्यांच्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन झाल्याचे कम्प्युटरच्या स्क्रीनवर एसएमएस येईल.
  • ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर संबंधित जिल्हा रेशीम कार्यालय जाऊन सातबारा, 8अ चा उतारा, त्यांचे च्या पहिल्या पानाची झेरॉक्स, जॉब कार्ड नोंदणी शुल्कासह देउन नोंदणी पूर्ण करावी.

( माहिती स्त्रोत- टीव्ही नाईन मराठी)

English Summary: subsidy scheme for silk productive farmer take benifit
Published on: 04 December 2021, 10:21 IST