Agripedia

कीटकांच्या डोळ्यांच्या रचनेचा विचार करून योग्य त्या रंगाचा चिकट सापळा पिकांमध्ये वापरल्याने खूप फायदा होतो.त्यामध्ये रसशोषक किडींसाठी पिवळे,फुलकिडेआणि पाने पोखरणाऱ्या आळीसाठी निळे आणि उडद्या भुंगेरे व काही डेकुन वर्गिया किडी पांढऱ्या गाचे चिकट सापळे या साठी उपयुक्त असतात.

Updated on 04 March, 2022 4:46 PM IST

कीटकांच्या डोळ्यांच्या रचनेचा विचार करून योग्य त्या रंगाचा चिकट सापळा पिकांमध्ये वापरल्याने खूप फायदा होतो.त्यामध्ये रसशोषक किडींसाठी पिवळे,फुलकिडेआणि पाने पोखरणाऱ्या आळीसाठी निळे आणि उडद्या भुंगेरे व काही डेकुन वर्गिया किडी पांढऱ्या गाचे चिकट सापळे या साठी उपयुक्त असतात.

या लेखामध्ये आपण पीकसंरक्षणासाठी चिकट सापळेयांचे प्रमाण आणि वापर यांची माहिती घेऊ.

पीक सर्वेक्षण,कीडनियंत्रणासाठी चिकट सापळेचे प्रमाण

  • पंधरा बाय 30 सेंटिमीटर आकाराचा चिकट सापळाहा प्रत्येक 100 चौरस मीटर साठी एक सापळाकीडनियंत्रणासाठीमहत्त्वाचाआहे. प्रत्यक्ष हजार चौरस मीटर साठीकीडसर्वेक्षणासाठी एक सापळा
  • मिरची, वांगी,टोमॅटो,भेंडी इत्यादी भाजीपाला पिकांसाठी प्रति दहा चौरस मीटर याप्रमाणे 100 ते 400 सापळे प्रति एकरआवश्यक असतात.
  • 30 बाय 40 सेंटिमीटरआकाराचा चिकट सापळाहाकापूस,सोयाबीन,मुग,उडीदआणिचवळी या पिकांसाठी छत्तीस तेऐंशीसापळे प्रति एकरहे प्रमाण उपयुक्त आहे.

सापळेयांचा रंग व आकर्षक होणाऱ्या पिकानुसार प्रमुख कीड

  • पिवळे चिकट सापळे-मावातुडतुडे, पांढरीमाशी,फुलकिडे,फळपोखरणारी अळी,फळमाशी,काकडी पिकावरील भुंगेरे,उडद्याभुंगेरेव इतर प्रकारचे भुंगेरे,कोबी पिकावरील पांढरी फुलपाखरू इत्यादीं साठी पिवळे चिकट सापळे उपयुक्त आहेत.
  • पिवळे व निळे चिकट सापळे-फुलकिडे, मावा किडीसाठी मध्यम प्रमाणात आकर्षित करण्यासाठी हे सापळे उपयुक्त आहेत.त्यासोबतचफुलकिडेआणि पाने पोखरणाऱ्याअळीचे पतंग यासाठीनिळे चिकट सापळे उपयुक्त असतात.पांढरा चिकट सापळ्यांचा उपयोग हा उडद्या भुंगेरे व काही ढेकुन वर्गीय किडीसाठी उपयुक्त आहे.

चिकट सापळे वापरताना घ्यायची काळजी

  • पांढरीमाशी व तुडतुडेयांसाठी चिकट सापळे लावताना त्यांची उंची पिकाच्या उंचीपेक्षा 15 सेंटीमीटर कमी उंचीवर लावावेत.
  • मावा व फुलकिडेसाठी पिकाच्या समकक्ष उंचीवर 15 सेंटिमीटर पिकापेक्षा जास्त उंचीवर लावावेत.
  • पिकांच्या ओळीपासून वीस सेंटीमीटर अंतरावर लावावेत.
  • वाऱ्याचा वेग व दिशा लक्षात घेऊन लावावेत किंवा अत्यंत वेगाने वारे वाहत असल्यास त्यावेळे पुरते काढून घ्यावेत.
  • उत्तर पूर्व म्हणजेच ईशान्य व नैऋत्य दिशेला सूर्याच्या दिशेने तिरकस लावावे
  • दर सात ते दहा दिवसांनी कीटकांनी माखलेले सापळे ओल्या कापडा ने पुसून घेऊन कोरडे करावेत.पुन्हा एरंड तेल किंवा पांढरा ग्रीस यापैकी एक चिकट पदार्थ लावावा.
  • आंतरमशागत करताना सापळ्यांना बैलाचा किंवा बखर,डवऱ्याचा धक्का लागणार नाही याची काळजी घ्यावी.
English Summary: sticky trap is very useful and crucuial in crop protection from insect
Published on: 04 March 2022, 04:46 IST