शेतकरी मित्रांनो अल्प कालावधीत तयार होणाऱ्या पिकांची लागवड करून अनेक शेतकरी बांधव चांगली मोठी कमाई करत आहेत. कलिंगड व खरबूज देखील अल्प कालावधीत तयार होणारे एक वेल वर्गिय फळपीक आहे, कलिंगड व खरबूज ची मागणी बाजारात मोठ्या प्रमाणात बनलेली असते याची मागणी विशेषतः उन्हाळ्यात लक्षणीय असते. त्यामुळे कलिंगड व खरबूज लागवड जर शास्त्रीय पद्धतीने व सुयोग्य व्यवस्थापन करून केली गेली तर यापासून दर्जेदार उत्पादन प्राप्त केले जाऊ शकते. आज आपण कलिंगड व खरबूज लागवड विषयी काही महत्त्वपूर्ण बाबी अभ्यासणार आहोत. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया या विषयी सविस्तर.
कलिंगड व खरबूज लागवडीतील काही महत्वपूर्ण बाबी
कृषी तज्ञांच्या मते कलिंगड व खरबूज लागवडीसाठी सर्वोत्तम काळ हा फेब्रुवारी महिन्याचा मानला जातो. फेब्रुवारी महिन्यात या पिकांची लागवड केल्यास यापासून दर्जेदार उत्पादन प्राप्त केले जाऊ शकते. जर फेब्रुवारी महिन्यात कलिंगड लागवड केली तर एकरी बारा टन एवढे दर्जेदार उत्पादन शेतकरी बांधवांना प्राप्त होऊ शकते, आणि जर याच महिन्यात खरबूज लागवड केली तर यापासून 22 टन एवढे उत्पादन सहजरीत्या प्राप्त केले जाऊ शकते. शेतकरी मित्रांनो जर आपणासही कलिंगड व खरबूज ची लागवड करायची असेल तर आपणास जमिनीची पूर्वमशागत आतापासूनच सुरू करावी लागेल. जमिनीची पूर्वमशागतीमध्ये सर्वप्रथम आपणास जमीन व्यवस्थित नांगरून घ्यावी लागेल. या पिकाच्या चांगल्या वाढीसाठी आणि यातून दर्जेदार उत्पादन यशस्वीरीत्या संपादन करण्यासाठी एकरी दोन ते तीन टन जुने चांगल्या क्वालिटीचे कुजलेले शेणखत जमिनीत मिसळणे गरजेचे असते. कलिंगड व खरबूज पिकाला पाणी देताना विशेष काळजी घ्यावी लागते शेतात पाणी जास्त होता कामा नये आणि कमी पडता कामा नये याची विशेष खबरदारी बाळगली तर यातून चांगले उत्पादन प्राप्त करता येते.
कलिंगडची लागवड सरी-वरंबा पद्धतीने केली जाते यासाठी गोठ अथवा बेले चांगले बांधले गेले पाहिजे. गोट ते गोट अंतर तीन मीटर असले तर पिकाच्या वाढीला चालना मिळते. 60 सेंटिमीटर अंतरावर कलिंगड व खरबूज लागवड केली गेली पाहिजे. कलिंगडची रोपे नर्सरी मधुन घ्यावीत यामुळे पिके लवकर काढणीसाठी तयार होतात. कलिंगड व खरबूज लागवड करताना त्यांच्या सुधारित जातींची निवड करावी जेणेकरून त्यापासून दर्जेदार उत्पादन मिळू शकते. कलिंगड व खरबूज पिकासाठी ठिबक सिंचन प्रणालीद्वारे पाणी भरल्यास पाण्याची बचत होते शिवाय यामुळे पिकाची नासाडी होत नाही. ठिबक सिंचन प्रणालीद्वारे द्रवरूप खते सुद्धा दिली जातात त्यामुळे खतांचा अनिर्बंध वापर कमी करता येतो, परिणामी पैशांची बचत होते आणि उत्पादन खर्चात सहाजिकच कपात होते. कलिंगड व खरबूज पिकासाठी ठिबक सिंचन प्रणाली विकसित करण्यासाठी एकरी 80 हजार रुपये खर्च येत असल्याचे सांगितले जाते तसेच मल्चिंग पेपर साठी एकरी 12 हजार रुपये खर्च हा अपेक्षित असतो.
कलिंगड व खरबूज पिकातून दर्जेदार उत्पादन प्राप्त करण्यासाठी याची आगात लागवड केली पाहिजे. कलिंगड प्रति एकरी 22 टन उत्पादन देण्यास सक्षम असते तर खरबूज पासून 12 टन एकरी उत्पादन प्राप्त केले जाऊ शकते. कलिंगड बाजारात 15 ते 16 रुपये प्रति किलो दराने विकला जातो. तसेच खरबूज 20 ते 22 रुपये प्रति किलो या दराने विकला जातो. त्यामुळे कलिंगड व खरबूज लागवड शेतकऱ्यांसाठी नक्कीच फायद्याचा सौदा सिद्ध होऊ शकतो.
Published on: 17 January 2022, 01:06 IST