मार्च महिन्याला सुरुवात होऊन आज तीन दिवस झालेत, मागील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून उन्हात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे भाजीपाला वर्गीय पिकांची उन्हाळ्यात मोठी मागणी बघायला मिळू शकते तसेच भाजीपाल्याला उन्हाळ्यात चांगला दर देखील मिळू शकतो. शेतकरी बांधवांना अनेकदा पारंपरिक पिकातून उत्पादन खर्च काढणे देखील मुश्कील होऊन बसते. अशा परिस्थितीत जर शेतकरी बांधवांनी पारंपारिक पिका समवेतच मागणी मध्ये असलेल्या भाजीपाला पिकांची लागवड केली तर अल्प कालावधीत लाखो रुपयांचा नफा मिळू शकतो. शेतकऱ्यांना आपले उत्पन्न वाढविण्यासाठी पारंपरिक पिकात समवेतच अल्प कालावधीत काढणीसाठी तयार होणाऱ्या नगदी पिकांची किंवा भाजीपाला वर्गीय पिकांची लागवड करणे गरजेचे झाले आहे. शेतकरी बांधव पारंपरिक पिकात समवेत भाजीपाला वर्गीय पिका समवेतच फळबाग पिकांची देखील लागवड करू शकतात.
परंतु भाजीपाला वर्गीय पिके अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी विशेष फायद्याची ठरू शकतात कारण की भाजीपाला वर्गीय पिके अल्पकालावधीत काढणीसाठी तयार होतात तसेच या पिकांसाठी फारसा उत्पादन खर्च देखील करावा लागत नाही त्यामुळे भाजीपाला वर्गीय पिके अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी विशेष फायद्याची सिद्ध होऊ शकतात. भाजीपाला वर्गीय पिकांची लागवड स्वातंत्र्य केली जाऊ शकते तसेच आंतरपीक म्हणून इतर पारंपारिक पिकासमवेत देखील केली जाऊ शकते. आज आपण मार्च महिन्यात कोणत्या भाजीपाला पिकांची लागवड केली जाऊ शकते याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.
कडीची लागवड
डॉक्टरांच्या मते, आपल्या शरीरातील पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी नेहमीच काकडीचे सेवन करायला हवे. काकडी भारतीय स्वयंपाक घरात नेहमीच बघायला मिळते, काकडी सॅलडच्या रूपात कच्चीच खाल्ली जाते. काकडीच्या जातींमध्ये स्वर्ण आगते, स्वर्ण पौर्णिमा, पुसा उदय, पूना काकडी, पंजाब सिलेक्शन, पुसा संयोग, पुसा बरखा, काकडी 90, कल्याणपूर हिरवी काकडी, कल्याणपूर मध्यम आणि काकडी 75 इ. जातीचा समावेश आहे. काकडीच्या सततच्या मागणीमुळे शेतकरी बांधव याची लागवड करून चांगला नफा कमवू शकतात.
दुधी भोपळा
लौकी अर्थात दुधी भोपळा भारतीय स्वयंपाक घरात मोठ्या प्रमाणात नजरेस पडत असतो. याची लागवड मार्च महिन्यात देखील केली जाऊ शकते, या महिन्यात याची लागवड करून चांगले दर्जेदार उत्पादन प्राप्त केले जाऊ शकते. उन्हाळ्यात बाजारात दुधी भोपळ्याला मागणी आपोआप वाढते. याशिवाय याची लागवड करणे देखील इतर भाजीपाला वर्गीय पिकांपेक्षा खूप सोपी आहे. या वनस्पतीला वाढीसाठी आधार आवश्यक आहे, यासाठी मंडपाची उभारणी करावी लागते. याचे रोप तुम्ही तुमच्या घराच्या छताजवळ किंवा झाडांजवळ लावू शकता.
फुलकोबीची शेती
मार्च महिन्यात फुलकोबीची लागवड करता येणे शक्य आहे. याच्या अनेक सुधारित जाती आहेत ज्या मार्च महिन्यात लावल्या जातं असतात. याच्या सुधारित जातींमध्ये अर्ली व्हर्जिन, पुसा काटिकी, पुसा दीपाली, समर किंग, पावस इत्यादींचा समावेश होत असतो.
Published on: 02 March 2022, 10:52 IST