भारतातील शेतकरी आता आधुनिकतेची कास धरून पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देताना दिसत आहेत. आता शेतकरी बांधव नवनवीन औषधी वनस्पतींची लागवड करत आहेत तसेच फळबाग लागवड करून आपले उत्पन्न दुपटीने वाढविण्याच्या दिशेने कार्य करत आहेत. औषधी वनस्पतींची तसेच फळबाग पिकांची लागवड शेतकऱ्यांना फायदेशीर देखील ठरत आहे. जर आपलाही फळबाग लागवड करण्याचा विचार असेल, तर थाई ॲप्पल बोराची लागवड आपल्यासाठी एक फायद्याचा सौदा सिद्ध होऊ शकते. आज आपण थाई एप्पल बोर लागवडीविषयी महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया एप्पल बोर ची माहिती.
शेतकरी मित्रांनो बाजारात अनेक प्रकारचे बोर उपलब्ध आहेत मात्र सर्वात जास्त मागणी ही अप्पल बोरची असते विशेषता थाई ॲप्पल बोरची, त्यामुळे याची शेती एक फायद्याचा सौदा सिद्ध ठरू शकते. थाई एप्पल बोरला अनेक शेतकरी शेतकऱ्यांचे सफरचंद असे म्हणून देखील संबोधतात. ज्या शेतकऱ्यांकडे कमी शेतजमीन आहे, त्या शेतकऱ्यांसाठी थाई एप्पल बोरची लागवड करण्याची शिफारस केली जाते. थाई एप्पल बोर मध्ये विविध प्रकारचे पोषकतत्वे आढळतात जे की आपल्या शरीरासाठी उपयुक्त असल्याचे सांगितले जाते म्हणून थाई एप्पल बोर फक्त शेतकऱ्यांसाठीच नव्हे तर ग्राहकांसाठी, सामान्य व्यक्तींसाठी देखील एक वरदान सिद्ध होताना दिसत आहे.
थाई एप्पल बोर लागवडीविषयी महत्वपूर्ण बाबी
थाई एप्पल बोर एक हंगामी फळ म्हणून ओळखले जाते. हे एक विदेशी फळ आहे. याचे उगमस्थान थायलंड हा देश असल्याचे सांगितले जाते. हे फळ चवीला खुप रुचकर असते. याचा आकार हा सफरचंदसारखा असतो, आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे याची लागवड ही भारतात मोठ्या प्रमाणात अलिकडे बघायला मिळत आहे, याचे सर्वात मोठे कारण म्हणजे भारतीय हवामान या फळासाठी अनुकूल असल्याचे सांगितले जाते. भारतात या पिकासाठी असलेले पोषक वातावरण, व त्यापासून मिळणारे दर्जेदार उत्पादन यामुळे शेतकऱ्यांचा थाई अँपल बोर लागवडिकडे कल वाढताना दिसत आहे. शिवाय अनेक शेतकरी याची लागवड करून चांगली मोठी कमाई करत आहेत. हे फळ आपल्या सामान्य बोरपेक्षा आकाराने अधिक मोठे असते याच्या एका झाडापासून वार्षिक जवळपास 50 किलोपर्यंत उत्पादन प्राप्त होते.
लागवड नेमकी कशी
थाई अँपल बोर लागवड ही इतर अनेक फळांप्रमाणे कलम पद्धतीने केली जाते. याची लागवड भारतात सर्वदूर केली जाऊ शकते. आपण पहिल्यांदा याच्या लागवडीसाठी रोपवाटिकेतून रोपे विकत आणून लागवड करू शकता. हे रोप रोपवाटिकेत जवळपास 40 रुपयांना मिळून जाते. जास्त आदर्ता असलेल्या भागात याची लागवड करणे टाळावे अन्यथा उत्पादनात घट होऊ शकते. याची लागवड जुलै-ऑगस्ट महिन्यात केली जाऊ शकते, तसंच फेब्रुवारी-मार्च महिन्यात देखील याची लागवड करता येते.
Published on: 27 December 2021, 01:46 IST