शेती क्षेत्रात बदलत्या काळानुसार अमुलाग्र बदल करणे महत्त्वाचे असते. सध्या पारंपरिक पिकांची लागवड करण्यापेक्षा फळबाग पिकांची अथवा नेहमी डिमांड मध्ये असलेल्या झाडांची लागवड करणे फायद्याचे असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आज आपण आपल्या वाचक मित्रांसाठी महोगणी झाडाच्या लागवडीविषयी महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलो आहोत. महोगणीच्या झाडाची लागवड करून शेतकरी राजा चांगली मोठी कमाई करू शकतात. शेतकरी मित्रांनो कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते जर आपण एक एकर क्षेत्रात 120 महोगणी च्या झाडांची लागवड केली तर आपणास बारा वर्षात सुमारे एक कोटी रुपयांची कमाई सहजरित्या होऊ शकते. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया याच्या लागवडी विषयी काही महत्त्वपूर्ण बाबी.
कोणत्या भागात केली जाऊ शकते लागवड
मित्रांनो तसं बघायला गेलं तर महोगणीची लागवड प्रत्येक ठिकाणी केली जाऊ शकते मात्र असे असले तरी ज्या प्रदेशात वारंवार वादळी वारे हजेरी लावत असतात अशा प्रदेशात महोगनी लागवड करण्याची शिफारस केली जात नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे या झाडांची उंची ही जवळपास 40 फुटा पासून ते 200 फुटांपर्यंत असते, म्हणून ज्या प्रदेशात जास्त वादळी हवा चालत असतात त्या प्रदेशात याची लागवड जर केली गेली तर झाडे पडण्याची आशंका कायम असते म्हणून याची लागवड अशा प्रदेशात करणे टाळावे. मित्रांनो महोगणीचे झाड 200 फुटापर्यंत जरी वाढत असले तरी भारतात महोगणी चे झाड फक्त 60 फूट उंचीपर्यंत वाढू शकते. या झाडांची मुळे जास्त खोलवर रुजत नाहीत त्यामुळे याची लागवड भारतात सर्वत्र केली जाऊ शकते मात्र याची लागवड डोंगराळ प्रदेशात केली जाऊ शकत नाही.
याची लागवड सुपीक चिकन माती असलेल्या जमिनीत केली गेल्यास याचे झाड चांगले वाढते, त्यामुळे यापासून चांगल्या क्वालिटीचे लाकूड प्राप्त होते. महोगनीच्या झाडाची लागवड ज्या जमिनीत पाण्याचा चांगला निचरा होत नाही तसेच पावसाचे पाणी ज्या जमिनीत साचते अशा जमिनीत महोगनी झाडांची लागवड करू नये यामुळे झाडांची नासाडी होण्याची शक्यता वर्तवली जाते. महोगणी च्या झाडाची लाकडे टिकण्यास चांगले असल्याचे सांगितले जाते. या झाडापासून तयार करण्यात आलेले फर्निचर दीर्घकाळ टिकत असल्याने याची बाजारात मोठी मागणी असते.
या झाडाच्या लाकडांना पाण्याचा देखील कुठलाच विपरीत परिणाम होत नाही त्यामुळे या झाडाच्या लाकडापासून मोठ्या प्रमाणात दरवाजा, खिडक्या, कपाट, फर्नीचर, लाकडाच्या शोभेच्या वस्तू इत्यादी वस्तूंची निर्मिती केली जाते. त्यामुळे बाजारात या लाकडांची सदैव मागणी असते. म्हणून महोगणी झाडाची लागवड करून शेतकरी राजा चांगला मोठा नफा कमवू शकतात.
Published on: 19 January 2022, 09:16 IST