Agripedia

शेतकरी बांधवांनो जर आपणास कमी क्षेत्रात अधिक उत्पन्न (More income in less area) कमवायचे असेल तर आजची बातमी आपल्या साठी विशेष आहे. आज आम्ही आपल्यासाठी खास अशा पिकाच्या लागवडीविषयी माहिती घेऊन आलो आहोत ज्याद्वारे आपण कमी क्षेत्रात लाखो रुपयांची कमाई करू शकता. आम्ही ज्या पिकाबद्दल बोलत आहोत ते पिक आहे अद्रकचे. शेतकरी बांधवांनो तर आपल्याकडे कमी क्षेत्र असेल तर आपण अद्रक लागवड (Ginger cultivation) करून कमी क्षेत्रात देखील अधिक उत्पन्न प्राप्त करू शकता. मात्र यासाठी योग्य नियोजनाची आवश्यकता भासणार आहे.

Updated on 02 January, 2022 9:23 PM IST

शेतकरी बांधवांनो जर आपणास कमी क्षेत्रात अधिक उत्पन्न (More income in less area) कमवायचे असेल तर आजची बातमी आपल्या साठी विशेष आहे. आज आम्ही  आपल्यासाठी खास अशा पिकाच्या लागवडीविषयी माहिती घेऊन आलो आहोत ज्याद्वारे आपण कमी क्षेत्रात लाखो रुपयांची कमाई करू शकता. आम्ही ज्या पिकाबद्दल बोलत आहोत ते पिक आहे अद्रकचे. शेतकरी बांधवांनो तर आपल्याकडे कमी क्षेत्र असेल तर आपण अद्रक लागवड (Ginger cultivation) करून कमी क्षेत्रात देखील अधिक उत्पन्न प्राप्त करू शकता. मात्र यासाठी योग्य नियोजनाची आवश्यकता भासणार आहे.

देशात अद्रकची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते राज्यात देखील याची लागवड आपल्या नजरेस पडते याच्या लागवडीतून अद्रक उत्पादक शेतकरी चांगली मोठी कमाई देखील करत आहेत. अद्रकची मागणी (Demand for ginger) ही गेल्या काही दिवसापासून लक्षणीय वधारली आहे, त्यामुळे या पिकाची लागवड आपणास लखपती बनवू शकते. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया अद्रक लागवडीतील काही महत्त्वाच्या बाबी, तसेच अद्रक लागवडीतील अर्थकारण देखील आज आपण समजून घेणार आहोत.

अद्रकविषयी थोडक्यात….(Briefly about ginger)

अद्रकचा मुख्य वापर हा आपल्या स्वयंपाक घरात (In the kitchen) बघायला मिळतो. चहापासून ते वेगवेगळ्या पदार्थात अद्रकचा वापर केला जातो यामुळे पदार्थांना चांगली चव प्राप्त होते. शिवाय अद्रक मध्ये असलेले औषधी गुणधर्म (Medicinal properties) आपणास अनेक रोगांपासून संरक्षण देतात तसेच अद्रक रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी (To boost the immune system) देखील कारगर सिद्ध होते.

कशी होते लागवड (How was planting)

शेतकरी मित्रांनो अद्रक ची लागवड बियाणे द्वारे केली जात नाही, तर याची लागवड ही कंद लावून केली जाते. यासाठी आधीच्या हंगामातील (Season) अद्रकच्या कंदाचा वापर केला जातो. आद्रकला दोन ते तीन तुकड्यात तोडले जाते तोडताना कमीत कमी तीन-चार अंकुर त्या तुकड्याला असतील याची खात्री बाळगणे महत्त्वाचे ठरते. या तोडलेल्या कंदाचा लागवडीसाठी वापर केला जातो. याची लागवड पपई पिकात (In the papaya crop) आंतरपीक म्हणून किंवा कुठल्याही इतर फळबाग पिकात आंतरपीक म्हणून देखील केली जाऊ शकते.

तसेच याची लागवड ही स्वतंत्ररीत्या देखील केले जाऊ शकते, मात्र जर आपल्याकडे कमी क्षेत्र असेल तर आपण दुसऱ्या इतर पिकात याची आंतरपीक म्हणून लागवड करू शकता. एक हेक्‍टर क्षेत्रात अद्रक लागवड करण्यासाठी आपणास सुमारे 15 किलो अद्रक च्या कंदाची आवश्यकता भासणार आहे. मात्र जर आपण आंतरपीक (Intercrop) म्हणून याची लागवड करणार असाल तर आपणास कमी कंदाची आवश्यकता लागेल. अद्रकची लागवड करताना रोप ते रोप अर्थात कंद ते कंद अंतर 25 सेमी दरम्यान असावे. तसेच बेल्यातील अंतर 40 सेंटीमीटर दरम्यान असावे. आपण जर एवढे अंतर मेंटेन केले तर यातून भरघोस उत्पादन प्राप्त होऊ शकते. अद्रकचे कंद पाच सेंटीमीटर जमिनीत पुरले गेले पाहिजेत आणि त्यावर माती अथवा शेणखत टाकून झाकणे महत्त्वाचे असते.

अद्रक शेतीचे गणित (The Mathematics of Ginger Farming)

शेतकरी मित्रांनो जर आपणास कमी कालावधीत (In a short period of time) अधिक नफा कमवायचा असेल तर अद्रक ची लागवड आपल्यासाठी एक वरदान सिद्ध होऊ शकते कारण की अद्रकचे पीक केवळ नऊ महिन्यात काढणीसाठी तयार होते. शेतकरी मित्रांनो आपणास अद्रकच्या पिकातून हेक्‍टरी 200 क्विंटल अद्रक चे उत्पादन (Production of Ginger) भेटू शकते. म्हणजे एका एकर क्षेत्रात आपणास 120 क्विंटल उत्पादन मिळते. अद्रक उत्पादक शेतकऱ्यांच्या मध्ये एका हेक्टर क्षेत्रात अद्रक लागवडीसाठी सुमारे आपणास आठ लाख रुपये (Eight lakh rupees) मोजावे लागतात. आता आपण प्रॉफिट विषयी बोलूया शेतकरी मित्रांनो जर समजा आपण एक हेक्टर क्षेत्रात अद्रक लागवड केली आहे यातून आपणास 200 क्विंटल अद्रक मिळणार आहे अद्रक ला बाजारात 80 रुपये किलोने दर मिळत असतो, मात्र आपण 60 रुपये किलो बाजारभाव पकडू, म्हणजे आपणास एक हेक्‍टर क्षेत्रातून 25 लाखांचे उत्पन्न होते, खर्च वजा जाता आपणास 15 लाख रुपये हेक्‍टरी निव्वळ नफा (Net profit) राहू शकतो. 

English Summary: start ginger farming and earn 15 lakh from one hector farmland lean more about it
Published on: 02 January 2022, 09:23 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)