Agripedia

देशात सर्वत्र शेवगाचे पिक (Drumstick Crop) बघायला मिळते, शेवगा एक महत्वपूर्ण भाजीपाला पिक आहे. राज्यात याची लागवड बऱ्याच भागात बघायला मिळते. अनेक शेतकरी शेवगा लागवड करून चांगली मोठी कमाई करत आहेत. जर शेतकरी बांधवांनी सुधारित पद्धतीने शेवगा लागवड केली तर यातून दर्जेदार उत्पादन प्राप्त केले जाऊ शकते. त्यामुळे आज आपण शेवगा लागवडीचे सुधारित तंत्रज्ञान (Improved technology of Drumstick cultivation) जाणून घेणार आहोत जेणेकरून शेतकरी बांधवांना शेवगा लागवडीचे आवश्यक ज्ञान भेटू शकेल आणि शेतकरी बांधव यातून चांगली मोठी कमाई करू शकतील. चला तर मग शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया शेवगा पिकाचे सुधारित लागवड तंत्रज्ञान.

Updated on 06 January, 2022 10:44 AM IST

देशात सर्वत्र शेवगाचे पिक (Drumstick Crop) बघायला मिळते, शेवगा एक महत्वपूर्ण भाजीपाला पिक आहे. राज्यात याची लागवड बऱ्याच भागात बघायला मिळते. अनेक शेतकरी शेवगा लागवड करून चांगली मोठी कमाई करत आहेत. जर शेतकरी बांधवांनी सुधारित पद्धतीने शेवगा लागवड केली तर यातून दर्जेदार उत्पादन प्राप्त केले जाऊ शकते. त्यामुळे आज आपण शेवगा लागवडीचे सुधारित तंत्रज्ञान (Improved technology of Drumstick cultivation) जाणून घेणार आहोत जेणेकरून शेतकरी बांधवांना शेवगा लागवडीचे आवश्यक ज्ञान भेटू शकेल आणि शेतकरी बांधव यातून चांगली मोठी कमाई करू शकतील. चला तर मग शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया शेवगा पिकाचे सुधारित लागवड तंत्रज्ञान.

शेवग्याविषयी महत्वपूर्ण माहिती

शेवग्याच्या झाडाला हिंदीत सहजन म्हणुन ओळखले जाते, इंग्लिश मध्ये याला Drumstic असं म्हणुन संबोधतात. शेवग्याचे शास्त्रीय नाव मोरिंगा ओलीफेरा असं आहे. शेवग्याचे झाड 18 फूट उंचीपर्यंत वाढते. याच्या झाडाला साधारणता तीन महिन्यात फुलोर यायला सुरुवात होते. याची लागवड केल्यापासून साधारणता सहा महिन्यांनी या पिकापासून उत्पादन मिळण्यास प्रारंभ होतो. शेवगा मध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म (Medicinal properties) आढळतात त्यामुळे त्याचे सेवन मानवी शरीरासाठी फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. शेवग्यात कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट, पाणी, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, मॅगनीज, सोडियम इत्यादी आवश्यक पोषक घटक मोठ्या प्रमाणात आढळतात त्यामुळे अनेक आहार तज्ञ शेवग्याचे आपल्या आहारात समावेश करण्याचा सल्ला देतात. या औषधी गुणधर्मांमुळे शेवग्याचा मोठ्या प्रमाणात मानवी आहारात समावेश झालेला दिसतो त्यामुळे शेवग्याला नेहमीच मोठी मागणी असते, म्हणून शेवग्याची लागवड शेतकरी बांधवांसाठी देखील खूपच फायदेशीर ठरत आहे.

शेवगा लागवडीसाठी जमीन आणि हवामान

शेतकरी मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, शेवगा लागवड जवळपास सर्व प्रकारच्या जमिनीत केली जाऊ शकते. याची लागवड कोरडवाहू जमिनीत देखील केली जाऊ शकते. परंतु असे असले तरी याची लागवड कोरड्या चिकन माती असलेल्या सुपीक जमिनीत (In fertile soil with dry chicken soil) केली असता यापासून दर्जेदार उत्पादन प्राप्त होते. शेवग्याचे पिक गरम हवामानात देखील सहजरीत्या वाढू शकते आणि त्यातून चांगले उत्पादन देखील मिळू शकते. शेवगा लागवडीतील सर्वात महत्त्वपूर्ण बाब म्हणजे या पिकाला जास्त पाण्याची आवश्यकता नसते, तसेच या पिकाला थंड हवामान मानवत नाही. त्यामुळे याची लागवड थंड प्रदेशात तसेच बर्फाळ प्रदेशात बघायला मिळत नाही. या पिकाला दव अजिबात सहन होत नाही म्हणून ज्या ठिकाणी जास्त थंडी असते त्या ठिकाणी देखील याची लागवड केली जाऊ शकत नाही. कृषी वैज्ञानिकांच्या मते, या पिकाला फुलोर येण्यासाठी 25 ते 30 डिग्री सेल्सिअस तापमानाची आवश्‍यकता असते. एकंदरीत शेवगा पीक हे गरम हवामानात चांगल्या पद्धतीने वाढते व यापासून चांगले उत्पादन देखील मिळते.

कशी केली जाते शेवगा लागवड

शेतकरी मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की शेवगा दोन पद्धतीने लावला जातो. शेवग्याचे पीक हे डायरेक्ट बियाणे मार्फत देखील लावले जाऊ शकते तसेच याची लागवड नर्सरीत रोपे तयार करून देखील केली जाऊ शकते. कृषी वैज्ञानिक आधी शेवग्याची रोपे तयार करून मग याची लागवड करण्याची शिफारस करतात. शेतकरी मित्रांनो जर आपणास एक हेक्टर क्षेत्रात शेवग्याची लागवड करायचे असेल तर आपणास सुमारे 700 ग्रॅम बियाणे लागू शकतात. शेवग्याची बियाणे पेरल्यापासून सुमारे एक महिन्यात रोपे लागवडीसाठी तयार होतात. शेवग्याची लागवड जून ते सप्टेंबर या महिन्यात केल्यास त्यापासून चांगले दर्जेदार उत्पादन प्राप्त होते. शेवगा लागवडीसाठी खड्डे तयार करताना विशेष काळजी घेतली पाहिजे. वावरातून सर्व प्रकारचे तन काढून टाकले पाहिजे, त्यानंतर 2.5×2.5 मीटर अंतरावर 45 × 45 × 45 सेंटी मीटर आकाराचे खड्डे बनवून शेवगा लागवड करण्याची शिफारस केली जाते.

शेवग्याचे उत्पादणाचे गणित

शेवगा लागवड केल्यापासून सुमारे सहा महिन्यानंतर यापासून उत्पादन मिळण्यास सुरवात होते एकदा लागवड केली की या झाडापासून सुमारे सात वर्षापर्यंत लगातार उत्पादन घेतले जाऊ शकते. दर वर्षी उत्पादन निघाल्यानंतर शेवग्याच्या झाडालाजमिनीपासून तीन फूट अंतरावर तोडणे गरजेचे असते. जर आपण शेवग्याच्या सुधारित जातीची लागवड केली असेल तर यापासून वर्षातून दोनदा उत्पादन मिळते.आणि अशा जातीच्या शेवग्याची काढणी ही फेब्रुवारी ते मार्च आणि सप्टेंबर ते ऑक्टोबर यावेळी केली जाते. एका शेवग्याच्या झाडापासून एका वर्षात सुमारे 50 किलो ग्रॅमशेवगा प्राप्त केला जातो.

English Summary: start drumstick improved farming and earn more profit
Published on: 06 January 2022, 10:44 IST