Agripedia

भारतात मोठ्या प्रमाणात काजुची लागवड केली जाते. काजू एक प्रमुख सुका मेव्याचा पदार्थ आहे. याची लागवड शेतकरी बांधवांसाठी फायद्याचा सौदा सिद्ध होताना दिसत आहे. याची लागवड करून अनेक शेतकरी बांधव चांगली मोठी कमाई करत आहेत. राज्यात देखील याची लागवड लक्षणीय नजरेस पडते. राज्यातील कोकणात याची लागवड विशेषता बघायला मिळते. काजू पिकासाठी भारतातील वातावरण अनुकूल असल्याचे सांगितले जाते. राज्यात देखील काजू पिकाला अनुकूल वातावरण मिळते. कोकण विभागात असलेले वातावरण काजू पिकासाठी पोषक असल्याचे सांगितले जाते. काजूची मागणी दिवसेंदिवस वधारत असल्याने याची लागवड शेतकरी बांधवांसाठी खूपच फायदेशीर ठरत आहे. जर काजूची सुधारित तंत्रज्ञानाने लागवड केली गेली तर यापासून दर्जेदार उत्पादन प्राप्त केले जाऊ शकते म्हणून आज आपण काजूच्या सुधारित तंत्रज्ञान लागवडीविषयी जाणून घेणार आहोत चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी.

Updated on 09 January, 2022 12:56 PM IST

काजूच्या लागवडीसाठी उपयुक्त जमीन

काजूची लागवड ही उष्ण कटिबंध प्रदेशात केल्यास त्यापासून दर्जेदार उत्पादन प्राप्त केले जाऊ शकते. काजू लागवड करण्यासाठी जमिनीची पूर्वमशागत चांगल्या पद्धतीने करणे गरजेचे असते. जमिनीची पूर्वमशागत करण्यासाठीजमीन व्यवस्थीत नांगरून त्यानंतर फळी मारून जमीन समतल करणे गरजेचे असते. पूर्वमशागत झाल्यानंतर शेतातून अनावश्यक कचरा गोळा करून शेता बाहेर फेकला पाहिजे. शेत साफ केल्यानंतर काजू लागवड केली पाहिजे. त्यामुळे काजूच्या पिकात अनावश्यक तण वाढत नाहीत. काजुची लागवड करण्याआधी मातीचे परीक्षण करणे गरजेचे असते मातीचे परीक्षण करून कमी असलेले पोषक तत्व जमिनीत टाकल्यास काजुच्या पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन प्राप्त केले जाऊ शकते.

काजु लागवड कशी

काजु एक बारामाही पीक आहे, काजुचे झाड तीन वर्षात उत्पादन देण्यास सज्ज होते. काजू पेरणीसाठी उत्कृष्ट बियाणे वापरणे आवश्‍यक असते. काजू चे बियाणे पेरणी करण्यापूर्वी तीन दिवस उन्हात सुकविणे महत्त्वाचे असते तसेच पेरणी करण्यापूर्वी एक दिवस आधी काजूचे बी आणि पाण्यात भिजवून ठेवावे लागतात.

काजु पिकासाठी तापमान आणि पाणी व्यवस्थापन

काजू लागवडीसाठी आवश्यक तापमान 25 ते 30 डिग्री सेल्सिअस दरम्यान असणे आवश्‍यक असते. तसेच काजूच्या चांगल्या वाढीसाठी चांगला सूर्यप्रकाश मिळणे देखील गरजेचे असते असे सांगितले जाते की काजूच्या वाढीसाठी कमीत कमी सहा तास चांगला सूर्यप्रकाश काजू पिकाला मिळाला पाहिजे. काजू पिकाला संतुलित प्रमाणात पाणी देणे महत्त्वाचे असते. काजू चे झाड जेव्हा प्रारंभिक अवस्थेत असते तेव्हा त्याला पाणी देणे महत्त्वाचे असते. काजुचे झाड हे वीणापाणि देखील चार महिन्यापर्यंत जगू शकते.

English Summary: start cashew farming and earn more profit
Published on: 09 January 2022, 12:54 IST