Agripedia

देशात अलीकडे औषधी वनस्पतींची शेती मोठ्या प्रमाणात केली जात आहे. तसेच अनेक शेतकरी नेहमी मागणी मध्ये असलेल्या वनस्पतींची लागवड करून बक्कळ पैसा अर्जित करत आहेत. पारंपरिक पीक पद्धतीत हजारो रुपयांचा खर्च शेतकरी बांधवांना करावा लागतो आणि त्यातून प्राप्त होणारे उत्पन्न अगदी कवडीमोल असते, त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी नगदी पिकांची तसेच औषधी पिकांची लागवड फायदेशीर ठरते. म्हणून आज आम्ही आमच्या खास वाचक शेतकरी मित्रांसाठी अशाच एका औषधी वनस्पतीची शेतीची माहिती घेऊन आलो आहोत. आम्ही ज्या वनस्पती विषयी बोलत आहोत त्या वनस्पतीचे नाव आहे बोंसाई प्लांट. या झाडाला अलीकडे गुडलक म्हणून संबोधले जाते. त्यामुळे अनेक लोक या झाडाला आपल्या घरात लावत असतात. आणि म्हणूनच जर आपण बोनसाई प्लांटची लागवड केली तर याच्या विक्रीतून आपण चांगली बक्कळ कमाई करू शकता.

Updated on 13 January, 2022 2:05 PM IST

बोनसाई प्लांट हे एक शोभेचे झाड आहे याच्या व्यतिरिक्त याला ज्योतिष शास्त्रात आणि अंक शास्त्रात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. संपूर्ण जगात वास्तुशास्त्राला मोठे महत्त्व आहे आणि वास्तुशास्त्रानुसार घराची मांडणी केली जाते,  वास्तूशास्त्रमध्ये सुद्धा बोनसाई प्लांटला अनन्य साधारण असे महत्व प्राप्त आहे. त्यामुळे या झाडाची मागणी बारामाही बनलेली असते, म्हणून या झाडाची लागवड करून शेतकरी बांधव चांगले उत्पन्न कमवू शकतात. एवढेच नाही तर या लागवडीसाठी केंद्र सरकार शेतकऱ्यांना प्रोत्साहित देखील करत आहे त्या अनुषंगाने केंद्र सरकार द्वारे या झाडाची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना अंशिक मदत देखील केली जाते.

सुरुवातीला आपण या झाडाची लागवड अवघ्या वीस हजार रुपयात करू शकता नंतर जसजशी मागणी वाढत जाईल तसतसे आपण या झाडाची लागवड मोठ्या प्रमाणात करून चांगली कमाई अर्जित करू शकता. या झाडाची लागवड करून आपण दोन पद्धतीने पैसे कमवू शकता. पहिल्या प्रकारात आपण अवघ्या काही रुपयाची इन्व्हेस्टमेंट करून यातून चांगला पैसा कमवू शकता. मात्र असे असले तरी याला थोडा उशीर लागतो. बोंसाई प्लांटची आपण जर लागवड केली तर यातून उत्पन्न प्राप्त होण्यास पाच वर्षाचा कालावधी लागतो कारण की बोलताय प्लांट पूर्ण विकसित व्हायला पाच वर्षाचा अवधी लागतो. आपण बोनसाई प्लांटची लागवड करून पाच वर्षात याची विक्री करू शकता. शेतकरी मित्रांनो या व्यतिरिक्त आपण लगेच देखील कमाई करू शकता यासाठी आपणास नर्सरी मधून बोनसाई प्लांट विकत घ्यावे लागतील. विकत घेतलेले बोनसाय प्लांट आपण चढ्या दरात बाजारात विक्री करू शकता. यातून देखील चांगला मोठा पैसा कमावला जाऊ शकतो.

या गोष्टीची असते आवश्यकता

या झाडाची लागवड करण्यासाठी वाळूमिश्रित माती किंवा वाळू, मातीची भांडी आणि काचेची भांडी, 100 ते 150 चौरस फूट जमीन किंवा छप्पर, स्वच्छ खडे किंवा काचेच्या गोळ्या, पातळ वायर, झाडांवर पाणी शिंपडण्यासाठी स्प्रे बाटली, शेड तयार करण्यासाठी जाळीची आवश्यकता असेल.  छोट्या प्रमाणावर सुरुवात केल्यास सुमारे 5 हजार रुपये लागतील. तसेच याची मागणी थोडी वाढवल्यास आपण 20,000 रुपय खर्च करून मोठ्या प्रमाणावर याची लागवड करू शकता.

लाखो रुपयांचे मिळू शकते उत्पन्न

शेतकरी मित्रांनो जर आपणास एक हेक्‍टर क्षेत्रात बोन्साय प्लांटची शेती करायची असेल तर आपण सुमारे पंधराशे ते दोन हजार बोन्साय प्लांटची लागवड करू शकता. आपण 3 × 2.5 या अंतरावर या झाडाची लागवड करू शकता. आपण जर या आंतरावर लागवड केली तर आपले एक हेक्टर क्षेत्रात पंधराशे झाडे बसतील. तसेच या झाडाच्या लागवडीत आपण आंतरपीक देखील घेऊ शकता. चार वर्षात एक हेक्‍टर क्षेत्रातून चार लाख रुपयांपर्यंत कमाई केली जाऊ शकते. बोंसाई प्लांटची एकदा लागवड केली की 40 वर्षे उत्पादन देण्यास हे झाड सक्षम असते.

English Summary: start bonsai plant farming ad earn good profit
Published on: 13 January 2022, 02:05 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)