निसर्गाचा अनियमितपणा आणि वातावरणात होत असलेल्या बदलामुळे शेती व्यवसायात अनेक अडचणी वाढत चाललेल्या आहेत जे की शेतीमधील उत्पादन वाढवायचे असेल तर काही तरी पर्याय शोधून काढला पाहिजे.शेतीला जोडव्यवसाय म्हणून आपण आजही पशुपालन शेतीकडे आपला कल ओळवतो मात्र रोपवाटिका करणे हा एक उत्पनाचा असा मार्ग आहे ज्यामध्ये दिवसेंदिवस उत्पादनात आणि उत्पनात वाढ होणार आहे आणि यामधून शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती सुद्धा मजबूत होणार आहे.
काळाच्या ओघानुसार रोपवाटिका करणे हा एक नवीन पर्याय शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहे. रोपवाटिका करायची असेल तर यासाठी योग्य नियोजन पाहिजे. यापूर्वी शेतकरी बियाणे वापरून रोपे तयार करत असतात जे की यास खूप वेळ जायचा आणि तंत्रज्ञान माहीत नसल्याने नुकसानही होयचे. रोपवाटिका करताना कोणते योग्य नियोजन करावे याची आज आपण माहिती बघणार आहोत.
योग्य व्यवस्थापन:-
तुम्ही नर्सरी उभा करण्याआधी सर्वात पहिल्यांदा लक्षात घेतले पाहिजे की कोणत्या भागात कोणते पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते तसेच कोणत्या प्रकारची भाजीपाला पिके व फळझाडे आहेत याचा विचार केला पाहिजे.जसे की कोकण भागात आंबे, नारळ, सुपारी, काजु, कोकम यांची रोपवाटिका केली पाहिजे. पश्चिम महाराष्ट्र भागात मोसंबी, लिंबू , बोरी, डाळिंब, केळी तर विदर्भमध्ये संत्रा तसेच मराठवाड्यात संत्रा मोसंबी आणि खानदेशात केळी अशा प्रकारे त्या त्या भागात फळांच्या जातीची रोपवाटिका केली पाहिजे. यामुळे एक फायदा होतो की कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही आणि वाहतुकीचा खर्च सुद्धा कमी लागतो.
किडिची नियंत्रण:-
यासाठी तुम्ही एक चांगल्या प्रकारचे ग्रीन हाऊस किंवा शेड हाऊस उभा करावे आणि काळ्या प्लास्टिक च्या ट्रे मध्ये बियाणांची उगवण करावी लागणार आहे. शेड हाऊस किंवा ग्रीन हाऊस मध्ये बियाणांची उगवण क्षमता जास्त असते.ग्रीन व शेड हाऊस मध्ये वायु जीवन नियंत्रित करता येत असल्याने रोपांची वाढ चांगल्या प्रकारे तसेच निरोगीदायी होते. जर तुम्ही गादी वाफ्यावर कलम किंवा बियाणे उगवण्यासाठी टाकली तर माती मधील रोग किंवा जिवाणू त्यावर येऊन बसतील त्यामुळे उत्पादन क्षमता कमी होते. त्यामुळे कोकोपीठ वापरून ट्रे मध्ये तुम्ही रोपे किंवा कलमे तयार करावी.
अशी करावी जोपासना:-
तुम्ही उभा केलेल्या नर्सरी मध्ये पाण्याची क्षमता चांगल्या प्रकारे असावी तसेच हवामानाचे नियंत्रण करता यावे. ग्रीन हाऊस उभा करताना त्यामध्ये हवा खेळती राहावी याची सर्वात पहिल्यांदा काळजी घ्यावी तसेच सूर्यप्रकाशाच्या सुर्यकिरणांचे नियंत्रण करावे. किती परिसर लागणार आहे याचे सुद्धा नियोजन व्यवस्थित पद्धतीने करावे.
मागणीनुसार करावा पुरवठा:-
एकदा रोप तयार झाले की शेतकऱ्यांपर्यंत ते कसे पोहचवायचे याची चांगल्या प्रकारे व्यवस्था करावी कारण रोपांची वाहतूक करताना रोपांना हानी पोहचते. रोपे विकल्यानंतर शेतकऱ्यांना ते कसे लावायचे तसेच खतांचे नियोजन व पाणी नियोजन इ. सर्व सेवा माहिती पुरवली पाहिजे तरच उत्पादनात वाढ होते.
Published on: 10 December 2021, 01:40 IST