पिकातून चांगले उत्पादन (Production) प्राप्त करण्यासाठी मातीचे आरोग्य, आणि हवामान चांगले लागते यासोबतच मातीमध्ये आवश्यक पोषक घटक देखील असणे महत्त्वाचे असते अन्यथा पिकातून चांगले उत्पादन कधीच प्राप्त होऊ शकत नाही. पिकाच्या वाढीसाठी पोषक घटकांची गरज असते, त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक आहे नायट्रोजन (Nitrogen), याशिवाय पिकांची वाढ जवळपास अशक्य असते. त्यामुळे कुठलाही पिकाच्या चांगल्या वाढीसाठी नायट्रोजन मोठ्या प्रमाणात आवश्यक असते. त्यामुळे पिकांच्या वाढीसाठी शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात युरियाचा (Uria) वापर करत असतात, कारण की युरिया मध्ये नायट्रोजनचे प्रमाणे सर्वात अधिक असते.
कृषी वैज्ञानिकांच्या मते (According to agricultural scientists) युरिया मध्ये जवळपास 46 टक्के एवढी नायट्रोजन असते. पण अनेकदा युरियाची टंचाई निर्माण होते आणि म्हणून पिकावर याचा विपरीत परिणाम होतो आणि यामुळे उत्पादनात कमालीची घट होते. त्यामुळे यावर समाधान म्हणुन उत्तर प्रदेश राज्यात एक अनोखा प्रयोग केला जात आहे येथील शेतकरी नायट्रोजनच्या कमतरता पूर्ण करण्यासाठी युरिया ऐवजी गोमूत्र चा वापर करताना दिसत आहेत. उत्तर प्रदेश राज्यातील गहू उत्पादक शेतकरी गव्हाच्या जोमदार वाढीसाठी आणि चांगल्या दर्जेदार उत्पादनासाठी गोमुत्राची (Cow urine) गव्हाच्या पिकावर फवारणी करत आहेत.
शेतकरी विज्ञान शुकला आपल्या गव्हाच्या पिकावर फवारत आहेत गोमूत्र (Farmer Vigyan Shukla is spraying cow urine on his wheat crop)
उत्तर प्रदेश राज्यातील बांधा मध्ये राहणारे शेतकरी विज्ञान शुक्ला नेहमीच्या युरिया टंचाईच्या समस्येने पुरते कंटाळले होते, त्यामुळे त्यांनी या समस्येवर कायमचे निदान लावण्याचे ठरवले त्यानुसार त्यांनी आपल्या गव्हाच्या पिकावर युरिया ऐवजी गोमूत्राची फवारणी (Cow urine spray) केली तसेच त्यांनी जैविक खतांचा पिकांसाठी वापर करणे सुरू केले आहे. विज्ञान यांच्या मते गोमूत्राचा वापर केल्यास युरिया प्रमाणेच पिकांना चांगल्या प्रमाणात नायट्रोजन मिळून जाते. त्यामुळे पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन प्राप्त होईल असा देखील दावा त्यांनी यावेळी केला, तसेच त्यांनी या वेळी इतर शेतकऱ्यांना जैविक शेती (Organic farming) करण्याचा सल्ला दिला व झिरो बजेट फार्मिंगला प्रोत्साहित करणे काळाची गरज बनली आहे असे देखील त्यांनी यावेळी नमूद केले.
शेतकरी मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की विज्ञान हे पूर्णता जैविक शेती करतात. पिकांना ते जैविक खत खाद्य देतात तसेच जैविक खतांची निर्मिती देखील ते स्वतः आपल्या घरीच करतात. विज्ञान स्वतः वर्मीकंपोस्ट जैविक कीटकनाशक (Organic Pesticides) तयार करतात. विज्ञान यांना कृषी क्षेत्रात चांगल्या कार्यासाठी अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांना राष्ट्रीय पुरस्कार जगजीवनराम (Jagjivan Ram Award) प्रदान करण्यात आला आहे, तसेच त्यांना अनेक स्थानिक पुरस्कार देखील प्राप्त झाले आहेत. विज्ञान इतर शेतकऱ्यांना देखील मार्गदर्शन करतात.
Published on: 01 January 2022, 08:40 IST