शिफारशीत कीटकनाशक योग्य मात्रेमध्ये घेऊन सांगितल्याप्रमाणे द्रावण तयार करावे. फवारणी करताना हातपंपाला (नॅपसॅक स्पेअर) हॉलो कोन नोझल वापरावे. कंपनीच्या पंपाला सर्वसाधारण हे नोझल असते. पंपाचे नोझल घट्ट करावे. या नोझलमधून ४० ते ८० पीएसआय दाब उत्पन्न होऊन फवान्याचे कवरेज मिळते. या पंपाने सर्वसाधारण पीकवाढीच्या अवस्थेनुसार ३५० ते ५oo लिटर पाणी प्रति हेक्टर लागेल. पीक मोठे असल्यास व दोन ओळींतील जागा संपूर्ण झाकल्यास पावर पंपाचा वापर करावा. या पंपातून प्रतिमिनीटo.५ ते ५ लिटर द्रावण बाहेर पडू शकते.
या पंपाच्या होस पाइपला चार अॅडजस्टमेंट आहेत. त्यानुसार हवेचा दाब कमीजास्त घरून पिकाचा घेर व पानाच्या आकारमानानुसार द्रावण पडण्याचा वेग आपल्या चालण्याच्या वेगानुसार नियंत्रित करावा. सर्वसाधारण या पावर पंपाने प्रतिहेक्टर १७५ ते २oo लिटर पाणी लागेल. पावर पंपाला शिफारशीत कीटकनाशकांची मात्रा तीन पट करावी. फवारणी करताना हवेच्या दिशेने फवारणी करावी. हवेचा वेग (५ किमी प्रतितासपेक्षा) जास्त असल्यास द्रावण उडून जात असल्यास फवारणी टाळावी. पावसाची शक्यता असल्यास फवारणी टाळावी.
फवारणी करताना पंपाचे नोझल (लांस) पिकापासून सहा इंच दूर धरल्यास चांगले कवरेज मिळेल. फवारणी केल्यावर त्यावर कमीत कमी ६ तासांपर्यंत पाऊस नसावा; अन्यथा पानावरील/झाडावरील कीटकनाशक धुऊन जाऊन फवारणी निष्प्रभ होते. फवारणीच्या दिवशी पाऊस येण्याची शक्यता असल्यास व फवारणी करणे आवश्यक असल्यास फवारणीच्या द्रावणामध्ये चिकट द्रव्य (स्टिकर) वापरावे. त्यामुळे कीटकनाशक पानावर/झाडावर जास्त वेळ चिकटून राहून हलका पाऊस आल्यास धुऊन जाणार नाही.
याउलट प्रखर उन्हात उच उच्च तापमानामुळे कीटकनाशकाचे झाडावर पडण्यापूर्वी विघटन होण्याची शक्यता असते; त्यामुळे प्रखर उन्हात उद्य तापमानात फवारणी करण्याऐवजी सकाळी किंवा सायंकाळी फवारणी करावी. कीटकनाशके खरेदीपूर्वी पिकाच्या फवारणी क्षेत्रावर किती पाणी ते जाणून घ्यावे. त्यानुसार फवारणीची मात्रा काढावी.
सर्वसाधारण या पावर पंपाने प्रतिहेक्टर १७५ ते २oo लिटर पाणी लागेल. पावर पंपाला शिफारशीत कीटकनाशकांची मात्रा तीन पट करावी. फवारणी करताना हवेच्या दिशेने फवारणी करावी.
संकलित लेख
कृषिवाणी
Published on: 12 April 2022, 05:05 IST