सोयाबीनची पेरणी/लागवड देशात तसेच महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर केली जाते.मागील दोन वर्षापासून सोयाबीनला भाव सुद्धा चांगला मिळत असल्याने शेतकर्यांचा सोयाबीन पिकाकडे कल जास्त दिसत आहे.सोयाबीनचे चांगले उत्पादन घेण्यासाठी जमिनीची पुर्वमशागत, वेळेवर पेरणी,योग्य वाणाची निवड,खत व्यवस्थापन,तण व्यवस्थापन या गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे असते. तर आपण या लेखात सोयाबीनचे तणनाशकाची माहिती घेणार आहोत.सोयाबीनच्या तणनाशकामधे दोन प्रकार पडतात.१) पेरणीनंतर लगेच ७२ तासाच्या आत फवारणी करणे.२) सोयाबीन १५ ते २५ दिवसाचे झाल्यानंतर फवारणी करणे.
पहिल्या प्रकारामधे सोयाबीनची पेरणी झाली की लगेच ७२ तासाच्या आत फवारणी करून तण व्यवस्थापन करता येते. यामधे कोणत्या तणनाशकाची फवारणी करता येते ते पाहू...१) डुपाँन्टचे स्ट्राँगआर्म - डुपाँन्टचे स्ट्राँगआर्म या रिझल्ट खुप चांगले आहेत.याची १२.४ ग्रॅमची पँकींग एक एकरसाठी वापरावी. या पँकींगचे एक एकरसाठी १० पंप करावे. फवारणी करताना जमीन ओलसर असणे खुप महत्वाचे असते. जमीन ओलसर नसल्यावर १०० टक्के तण व्यवस्थापन होत नाही .२) BASF-volor 32 - यामधे ( pendimethalin 30% +Imazethapyr 2% EC ) हा घटक असतो.याचे सोयाबीनसाठी एकरी एक लिटर तर मुगासाठी ८०० मिली तर हरभर्ऱ्यासाठी ५०० मिली प्रमाण आहे. ५० ते ६० दिवस तणांचे व्यवस्थापन करते.फवारणी करताना प्रमाणापेक्षा जास्त मात्रा घेउ नये कारण पिकावर याचे दुष्परिणाम होऊ शकतात
३) Authority - (sulfentrazone 28 % +clomazone 30 % wp) हा घटक असुन याची मात्रा एक एकरसाठी ५०० ग्रॅम आहे. २०० लिटर पाण्यामधे मिसळुन याची फवारणी करावी. पेरणीनंतर ४८ तासाच्याआत याची फवारणी करावी.याच्या फवारणी नंतर ४० दिवसापर्यंत तणांच व्यवस्थापन होते.सोयाबीन पेरणीनंतर पिक १५ ते २० दिवसाचे झाल्यावर कोनते तणनाशक वापरावे.१) Sijenta fusiflex ( सिजेन्टा फुसीफ्लेक्स् ) - Sijenta fusiflex यामधे Fomesafon 11.1% +Fluazifop-p-butyl 11.1% SL हा घटक आहे.सोयाबीन साठी याची मात्रा एक एकरसाठी ४०० मिली १५० लिटर पाण्यामधे मिसळुन फवारणी करावी. १६ लिटर पाण्यामधे ४० मिली या प्रमाणात वापरावे. हे तणनाशक ४ ते ५ दिवसात संंपुर्ण गवताचा नाश करते. गवत चार ते पाच पानावर असताना याची फवारणी करावी किंवा सोयाबीन २०-२५ दिवसाचे झाल्यावर याची फवारणी करावी.
तणनाशकासोबत कोणत्याही किटकनाशकाची किंवा टॉनिकची फवारणी करु नये. फवारणी करताना जमीनीत ओलावा असने खुप गरजेचे आहे. सोयाबीनमधे २० ते २५ दिवसापर्यंतच याची फवारणी करावी.२) Sadana saket : ( आदमा साकेत ) -Propaquizafop 2.5% + Imazethapyr 3.75 % W/W ME हा घटक आहे. याचा वापर फक्त सोयाबीनसाठी करावा.याची फवारणी पेरणीनंतर १८-२२ दिवसाच्या दरम्यान करावी लागते. गवत चार ते पाच पानावर आसताना याची फवारणी करावी.साकेत फवारणी ची मात्रा १५ लिटर पाण्यामधे ८० मिली तर एक एकरसाठी १८०-२०० लिटर पाण्यामधे ८०० मिली मिसळुन फवारणी करावी. याच्यासोबत मेनबुस्ट ३०० ग्रॅमची सुद्धा फवारणी करावी.फवारणी करताना जमीनीत ओलावा असने खुप गरजेचे आहे.
Published on: 24 June 2022, 09:04 IST