सोयाबीन हे महाराष्ट्राचे महत्वाचे पीक आहे, सोयाबीन या पिकाला साधारणतः 45 ते 50 दिवसाचे पीक असताना गायत्री परफेक्ट+ 30 मिली ची फवारणी केली तर उत्पादनात 30% पर्यंत वाढ होऊ शकते सोयाबीन पिकावर गायत्री परफेक्ट+ ची फवारणी केल्यानंतर सोयाबीनची अनावश्यक होणारी कायिक वाढ कमी होते, पिकाला काळोखी येते,रसशोषण करणाऱ्या किडी व पांढऱ्या माशीचे
प्रमाण कमी होते, फुलगळ कमी होते, शेंग व दाणे पोसली जातात, त्यामुळे सोयाबीनचे उत्पन्न 25 ते 30%पर्यंत वाढू शकते.Soybean yield can increase by 25 to 30%. सोयाबीन या पिकाचे जास्तीत जास्त उत्पन्न घेण्यासाठी काय केले पाहिजे ते आता आपण पाहू.सोयाबीनची पेरणी करताना खतांचा बेसल डोस खूप महत्त्वाचा आहे. त्यासाठी एकरी 3 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट, 30 किलो पोट्याश,10 किलो बेनसल्फ अशी खताची मात्रा पेरणी करतानाच दिली पाहिजे.
खोड किडी साठी पेरणी पासून 10 ते 12 व्या दिवशीच 50%चे क्लोरोपायरीफॉस 50 मिली, निमार्क 30 ते 50 मीली, बाविस्टीन 30 ग्रॅम, सिलिकॉन स्टिकर 7 मिली अशी फवारणी करावी.20 व्या दिवशी तणनाशक आणि सिलिकॉन स्टिकर 7 मिली अशी फवारणी करावी.25 व्या दिवशी20%चे क्लोरो 50 मिलीमामेकटींन बेंझोइट 10 ग्रॅम,* *19/19/19 70 ग्रॅमसिलिकॉन स्टिकर 7 मिलीअशी फवारणी करावी35 व्या दिवशी* *12/61/00 60 ग्रॅम, चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएन्ट 25 ग्रॅमसिलिकॉन स्टिकर 7 मिली अशी फवारणी करावी.45 ते 50 दिवसाच्या सोयाबीन ला इमामेकटींन बेंझोइट 10 ग्रॅम
गायत्री परफेक्ट+ 30 मिली, सिलिकॉन स्टिकर 7 मिलीआणि 00/00/50 60 ग्रॅम अशीफवारणी केली तर उत्पन्नात 25 ते 30 टक्के वाढ होते.सोयाबीन या पिकाला वर सांगितलेल्या फवारण्या वेळेवर करणे अत्यन्त महत्वाचे असते. त्याशिवाय 50 ते 80 व्या दिवसापर्यंत वेळोवेळी सोयाबीन पिकावरील बुरशी आणि अळीचे नियंत्रण करावे.50व्या दिवशी एकरी अर्धी बॅग अमोनियम सल्फेट हे खत द्यावे. 50 ते 55 व्या दिवशी पाऊस असला तर ठीक नाहीतर पाण्याची व्यवस्था असल्यास 1 वेळ हलके पाणी द्यावे.
श्री शिंदे सर
9822308252
Published on: 28 August 2022, 06:20 IST