Agripedia

लसूण हे आपल्या सर्वांच्या आहारातील एक महत्वाचा मसाल्याचा पदार्थ आहे त्याविना जवळपास कुठलीच भाजी आपल्या स्वयंपाकघरात बनत नाही, म्हणुनच लसूणची मागणी वर्षभर बाजारात बनलेली असते. आज आपण अशाच महत्वपूर्ण लसूणच्या जातीविषयी जाणुन घेणार आहोत

Updated on 10 September, 2021 10:28 AM IST

लसूण हे आपल्या सर्वांच्या आहारातील एक महत्वाचा मसाल्याचा पदार्थ आहे त्याविना जवळपास कुठलीच भाजी आपल्या स्वयंपाकघरात बनत नाही, म्हणुनच लसूणची मागणी वर्षभर बाजारात बनलेली असते. आज आपण अशाच महत्वपूर्ण लसूणच्या जातीविषयी जाणुन घेणार आहोत

भारतात सर्वदुर लसूणची लागवड केली जाते, आणि शेतकरी लसूण शेतीमधून बऱ्यापैकी उत्पन्न घेतात. मध्य प्रदेश मध्ये पण लसूणची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते, एवढेच नाही तर मध्य प्रदेश राज्यात रतलाम जिल्ह्यात एक गाव आहे रिया वन तिथे गावाच्या नावाप्रमाणेच रिया वन नामक लहसूनच्या वाणीची लागवड केली जाते.

हो, शेतकरी मित्रांनो रिया वन ही एक लसूणची जात आहे. रिया वन गावाचे शेतकरी सांगतात की ही लसूणची वाण सर्वोत्कृष्ट आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे लसूणची एक गाठ जवळपास 100 ग्राम वजनाची बनते आणि एका लसूणच्या गाठीत 6-13 यादरम्यान कळ्या असतात.

रिया वन नामक वाणची कटिंग करणे असते सोपे म्हणुन वाचतो खर्च

रिया वन जातीच्या लसूनचा वरचे आवरण कागदासारखे जाड असते आणि बाकी लसूणच्या जातींपेक्षा जास्त पांढरे असते. रिया वन या जातीची मुळे कापणीला सोपे असते कारण की यांची मुळे वरती असतात.

.ह्याची कटिंग खुप सफाईने केली जाते. बाकी लसूणच्या जातीपेक्षा रिया वनची कटिंग आणि सफाई करने सोपे असते म्हणुन लेबर खर्च कमी होतो.

बाजारात इतर लसूणचा दर 8000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत असतो, आणि जर रिया वन जातीच्या लसूणचा दर बघितला पिक सीजन मध्ये 10000 ते 21000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत असतो.

रिया वन नामक जातींच्या एका गाठच वजन असते 100 पासुन 125 ग्राम पर्यंत

रतलाम मध्ये एकूण 30000 हेक्टर च्या आसपास शेतजमीन लागवंडीखालील आहे त्यातील जवळपास 18000 हेक्टर शेतजमीन तर फक्त लसूणच्या लागवडिखालील आहे. रियावन जातीच्या लसूण मध्ये अन्य जातींच्या लसूणपेक्षा अधिक मेडिसिनल कॉन्टेन्ट जसे की, ऑइल आणि सल्फर जास्त प्रमाणात असते.

 

आणि सर्व्यात महत्वाची गोष्ट रियावन लसूण हा जवळपास एक वर्ष टिकतो तर इतर लसूण हे फक्त 7 ते 8 महिनेच टिकतात. कल्टीवेशन जर चांगले केल असेल तर एका गाठीचे वजन हे जवळपास 100 ते 125 ग्रामपर्यंत असते. एक एकर क्षेत्रात लसूण लागवडीसाठी जवळपास 35000 ते 40000 पर्यंत खर्च येतो आणि उत्पादन जर बघितले तर प्रति एकरी 40 ते 50 क्विंटल पर्यंत होते.

 

English Summary: speciel species of garlic growth production of garlic
Published on: 10 September 2021, 10:28 IST