Agripedia

राज्यात ज्वारीची बर्‍यापैकी शेती नजरेस पडते. राज्यातील अनेक शेतकरी बांधव रब्बी हंगामात ज्वारी पेरणी करत असतात. ज्वारीची लागवड विशेषता जनावरांसाठी वैरण तसेच मानवासाठी धान्य या दुहेरी उद्देशाने केली जाते. ज्वारीचा चारा जनावरांसाठी विशेष उपयोगी असल्याने राज्यातील अनेक पशुपालक शेतकरी याची मोठ्या प्रमाणात शेती करताना बघायला मिळतात. ज्वारीची लागवड ज्या ज्या विभागात केली जात आहे तेथील मजूर वर्गाचे तसेच गरीब लोकांचे ते एक प्रमुख अन्नधान्य असते. अलीकडे ज्वारीची मागणी शहरी भागात देखील वाढत आहे.

Updated on 03 February, 2022 10:01 PM IST

राज्यात ज्वारीची बर्‍यापैकी शेती नजरेस पडते. राज्यातील अनेक शेतकरी बांधव रब्बी हंगामात ज्वारी पेरणी करत असतात. ज्वारीची लागवड विशेषता जनावरांसाठी वैरण तसेच मानवासाठी धान्य या दुहेरी उद्देशाने केली जाते. ज्वारीचा चारा जनावरांसाठी विशेष उपयोगी असल्याने राज्यातील अनेक पशुपालक शेतकरी याची मोठ्या प्रमाणात शेती करताना बघायला मिळतात. ज्वारीची लागवड ज्या ज्या विभागात केली जात आहे तेथील मजूर वर्गाचे तसेच गरीब लोकांचे ते एक प्रमुख अन्नधान्य असते. अलीकडे ज्वारीची मागणी शहरी भागात देखील वाढत आहे.

ज्वारी मध्ये असलेले औषधी गुणधर्म मानवी शरीरासाठी उपयोगी असल्याने ज्वारीच्या भाकरी आता शहरात देखील मोठ्या प्रमाणात खाल्ल्या जात असल्याने याची मागणी वाढल्याचे सांगितले जात आहे. ज्वारीचे पीक काळा सुपीक मातीत तसेच मध्यम काळया मातीत चांगले वाढते व यापासून चांगले दर्जेदार उत्पादन शेतकरी बांधवांना मिळत असते. महाराष्ट्र आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यात ज्वारीचे पीक चवळी तूर उडीद मूग मटकी या पिकात आंतरपीक म्हणून शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात लागवड करत असतात. रब्बी हंगामात लावल्या जाणाऱ्या ज्वारीत हरभऱ्याचे आंतरपीक विशेष लाभदायक असल्याने रब्बी हंगामातील ज्वारीत राज्यात मोठ्या प्रमाणात हरभरा पिक घेतले जाते.

ज्वारीची लागवड राज्यात तिन्ही हंगामात केली जाते. मात्र रब्बी हंगामात ज्वारीचे उत्पादन दर्जेदार प्राप्त होत असल्याने पाण्याचा साठा मुबलक असलेल्या भागात याची लागवड रब्बी हंगामातच करण्यास शेतकरी बांधव पसंती दर्शवितात. आज आपण रब्बी हंगामातील ज्वारीची काढणी करताना कोणती काळजी घेणे अपरिहार्य ठरणार आहे याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या महत्वपूर्ण माहिती विषयी.

रब्बी हंगामातील ज्वारीची काढणी करताना या गोष्टींची घ्या काळजी

ज्वारीचे पिक साधारणतः 110 ते 130 दिवसांमध्ये परिपक्व बनत असते, त्यामुळे 110 ते 130 दिवसांमध्ये ज्वारीची काढणी केली जाते. ज्वारीचे पीक जातीनिहाय थोड्या फार कमी अधिक दिवसात संपूर्ण विकसित होत असते. ज्वारी काढणीच्या वेळी ज्वारीच्या कणसातील दाणे टणक होत असतात. पूर्ण विकसित झालेल्या ज्वारीचे दाणे दाता खाली दाबले असतात टच असा आवाज येतो तसेच पूर्ण विकसित झालेली ज्वारी चवीला पिठाळ लागत असते. त्याचप्रमाणे ज्वारीचे बारकाईने निरीक्षण केल्यास दाण्याच्या टोकाकडील भागाजवळ काळा ठिपका आढळून येतो.

ज्वारीच्या पिकावर अशी लक्षणे दिसताच ज्वारी पूर्ण विकसित झाली असल्याचे समजावे आणि लागलीच तिची काढणी करावी. ज्वारी काढणी केल्यानंतर 8 ते 10 दिवस ज्वारीचे कणसे उन्हात वाळवून घेण्याचा सल्ला कृषी वैज्ञानिक देत असतात. ज्वारी संपूर्ण सुकल्यानंतर ज्वारीची मळणी करावी. मळणी झाल्यानंतर ज्वारी उफणनी करून घ्यावी. एवढी प्रक्रिया झाल्यानंतर व ज्वारी साठवणुकीस ठेवण्यापूर्वी पुन्हा उन्हात वाळवावी. ज्वारी उन्हात वाळल्यानंतर ज्वारी बाजारात विक्री करण्यासाठी पाठवावी. ज्वारीचे 50 किलोची पोते पॅक करून विक्रीसाठी पाठवावे जेणेकरून विक्रीसाठी कुठलीच अडचण निर्माण होणार नाही.

English Summary: Special care to be taken while harvesting sorghum during Rabi season; If we take care of this method, the production will increase
Published on: 03 February 2022, 10:01 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)