Agripedia

सोयाबीन पिक फुल अवस्थेत असताना योग्य काळजी घेणे गरजेचे असते.

Updated on 19 August, 2022 7:23 PM IST

सोयाबीन पिक फुल अवस्थेत असताना योग्य काळजी घेणे गरजेचे असते. सोयाबीन पीक फुल अवस्थेत असताना जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर सोयाबीनचे उत्पन्न कमी होऊ शकते. यासाठी फुल अवस्थेत असताना खालील काळजी घ्यावी.1) सोयाबीन पिक फुल अवस्थेत असताना पिकामध्ये कोळपणी, खुरपणी करू नये. कोळपणी,खुरपणी करताना सोयाबीन पिकाला धक्का लागून फुले गळण्याची शक्यता असते, यासाठी सोयाबीन पीक फुलोऱ्यात असताना अंतर मशागत करू नये.

2) रासायनिक खतांचा वापर करू नये. पिक फुलोऱ्यात असताना रासायनिक खतांचा वापर केल्यास फुलगळ होण्याची शक्यता असते. तसेच रासायनिक खत फुलोऱ्यात पडल्यावर फुले खराब होऊन गळून जातात...3) सोयाबीन फुल अवस्थेत असताना तणनाशकाचा वापर करू नये.Do not apply herbicides when soybeans are in flower. फुल अवस्थेत असताना तणनाशकाचा वापर केल्यास सोयाबीन पिकावर ताण येऊन सोयाबीन पिकाची फुलगळ होत असते.4) फुल अवस्थेत कीटकनाशकांचा वापर शक्यतो टाळावा. सोयाबीन पिक फुलअवस्थेच्या आधी आणि फुल अवस्थेच्या नंतर कीटकनाशकांचा वापर करावा..

5) फुल अवस्थेत सोयाबीन पिकाला पाण्याचा ताण पडून देऊ नये पाण्याचा ताण पडल्यास सोयाबीन पिकाची फुलगळ होत असते..6) अनेक शेतकरी सोयाबीन पिक फुलोऱ्यात असताना प्लॉटमध्ये जाऊन फवारणी खुरपणी कोळपणी करत असतात, पण सोयाबीन पीक फुलोऱ्यात असताना जर आपण प्लॉटमध्ये ये-जा केल्यास परागीकरण होण्यास प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे सोयाबीन पीक फुलोऱ्यात असताना शेतामध्ये जाणे टाळावे...

7) जास्त औषधांचे एकत्रीकरण करणे टाळावे. जर आपण जास्त औषधांचे एकत्रित करून फवारणी घेतली तर पिकामध्ये अतिरिक्त उष्णता निर्माण होऊन फुलगळ होण्याची शक्यता असते...8) सापरमेथ्रीन, लॅमडा, बिटा सायलोथ्रीन, असे गॅस पॉयझन हि शक्यतो टाळावे.9) फार फार मोठ्या प्रमाणात आळी व रसशोषक किडीचा प्रादुर्भाव जास्त झाल्यास फुल गळ होते किंवा अळ्यांनी फुले खाल्ली तर उत्पादनात फार

मोठ्या प्रमाणात घट येते त्या साठी लवकर अळी व किडी चे नियोजन करावे...जर आपण वरील पणे काळजी घेतली, तर निश्चित आपले सोयाबीन पीक चांगले येऊन उत्पन्न वाढेल.जर पिकाची फुलगळ झाल्यास सोयाबीन पिकाला शेंगा कमी लागतात, आणि शेंगा कमी लागल्यावर सोयाबीनचे उत्पन्न कमी होत असते. यासाठी फुल अवस्थेत वरील काळजी घेणे फायद्याचे ठरते.

English Summary: Special care should be taken when the soybean crop is in flower, there will be an increase in production
Published on: 19 August 2022, 07:23 IST