Agripedia

लदरवर्षी या किडिचा प्रादुर्भाव दिसुन येतो व या किडीच्या व्यवस्थापनासाठी

Updated on 05 July, 2022 1:31 PM IST

लदरवर्षी या किडिचा प्रादुर्भाव दिसुन येतो व या किडीच्याव्यवस्थापनासाठीट्रायझोफाॕस,प्रोफेनोफाॕस, लॕम्बडा साहायलोथ्रीन, किंवा आणखी काही अंतरप्रवाही किटनाशके फवारतो.पण खरच हा चक्रभुंगा नियंत्रणात येतो का.आपण फवारल्या नंतर आपण एखाद्या वेळेस प्रादुर्भावग्रस्थ खोड फोडुन पाहिले का की चक्रभुंगा अळी मेली का नाही. हे आपण केव्हाच बघत नाही.क्त किटनाशक फवारुन समाधान मानतो. मित्रहो ही किड पानाच्या देठाच्या आत किंवा खोडाच्या आतुन खाणारी आहे तिच्या पर्यंत किटनाशक पोहचणे बहुतेक शक्य होत नाही.

फक्त किटनाशक फवारुन समाधान मानतो. मित्रहो ही किड पानाच्या देठाच्या आत किंवा खोडाच्या आतुन खाणारी आहे तिच्या पर्यंत किटनाशक पोहचणे बहुतेक शक्य होत नाही.आता पर्यंत मी बरेच निरिक्षणे घेतली कुठलेही किटनाशक या किडीसाठी प्रभावी नसल्याचे दिसुन येते.मग काय करायचे - आधी या किडीचे नुकसान जानुन घेऊ. ही किड पिक 20-25 म्हणजे 5-6 पानाचे झाल्यावर नर - मादी भुंग्याचे मिलन झाल्यावर कोवळ्या देठावर किंवा खोडावर दोन चक्र काप करुन म्हणजे करकुंडा पाडुन मादी मधात एक पिवळसर अंड घालते व लांबुन अंडी घातलेले पान किंवा खोड सुखलेले दिसुन येते. 

अशाप्रकारे एक मादीभुंग तीच्या जिवनात 70-80 अंडी घालते म्हणजे तेव्हढेच झाड बाधीत करते. हे अंड 7-8 दिवसांनी उबवते व अळी तयार होऊन 3-4 दिवसांनी मुख्य खोडात सिरते (म्हणजे ती 8-12 दिवस पानाच्या देठातच असते).पुढे खोडात शिरल्यावर खोड पोखरत पिक पक्व होईपर्यंत झाडाच्या बुडापर्यंत पोहचते व परत जमिनीपासून 1-2 इंचावर काप करते व झाड सोंगनी करतांना अलगत मोडून येते. या मुळे शेंगा भरत नाही दाने बारीक होतात. आशा प्रकारे ही किड नुकसान करते. मग व्यवस्थापन कसे करायचे जसे साप बाहेर असेल तोपर्यंतच आपण त्याला पकडू शकतो किंवा मारु शकतो, एकदा का तो बिळात गेल्यावर काहिच करु शकत नाही तसेच या किडीचे आहे जो पर्यंत

अंड्यात व देठात आहे तोपर्यंतच ही किड आपण नियंत्रणात आणु शकतो ती खोडात शिरल्यावर काहीच करु शकत नाही .तेव्हा ज्या शेतक-यांची शेती कमी आहे किमान त्यांनी तरी हा प्रयोग करुन पाहायला हरकत नाही.तो म्हणजे चक्रभुंग्यामुळे सुकलेले पान करकुंड्यासह तोडुन घेऊन नस्ट करने. तुम्ही म्हणाल हे शक्य आहे का. करुन बघायला काय हरकत आहे. पट्टा पद्धत आसेल तर आणखी सोपे जाते, सुरुवात एक एकराने करा किती वेळ लागतो ते बघा. एका बाईच्या मजुरीत एक एकर होते असे दर आठवड्याला चार -पाच आठवडे पिक जरड होईपर्यत केले तर 100% चक्रभुंगा चे व्यवस्थापन होईल. करुन बघा शक्य आहे. पटल तर करा नाही तर किटनाशक फवारा.

English Summary: Soybeans have got chakrabhunga then just do this work and get income
Published on: 05 July 2022, 01:31 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)