Agripedia

सोयाबीन पिकावरील मोझॅक हा विषाणूजन्यरोग असून

Updated on 13 September, 2022 4:18 PM IST

सोयाबीन पिकावरील मोझॅक हा विषाणूजन्यरोग असून तो सोयाबीन मोझॅक व्हायरस नावाच्या विषाणूमुळे होतो.लक्षणे व परिणाम: रोगग्रस्त झाडांच्या पानांच्या शिरा पिवळया पडतात तसेच फिक्कट हिरवे व पिवळसर हिरवे रंगाचे पट्टे पानांवर दिसून येतात. झाडांची पाने गुंडाळली जातात. पानांवरील पेशी नष्ट होतात व

झाड वाळते. त्यानंतर रोगग्रस्त झाडापासून तयार होणारे बियाणे आकाराने लहान व सुरकतलेले असते Then the seeds produced from the diseased plant are small in size and shriveled व त्याची उगवण क्षमता कमी होते.

हे ही वाचा - भाकरीचे प्रकार व भाकरी खाण्याचे फायदे !

साधारणपणे ३० से. पेक्षा जास्त तापमान या रोगास पोषक असून या हवामानात रोगाची लक्षणे ठळकपणे दिसून येतात.

रोगाचा प्रसार : या रोगाचा प्रसार प्रामुख्याने मावा या किडीव्दारे तसेच बियाणेव्दारे होतो.रोग व्यवस्थापन : १) विषाणूविरहित चांगल्या प्रतीचे बियाणे पेरणीसाठी वापरावे.२) रोगाची लक्षणे दिसताच विषाणूजन्य रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत.३) विषाणूजन्य रोग प्रभावित क्षेत्रातील सोयाबीन बियाण्यासाठी वापरु नये.

४) या विषाणुजन्य रोगाचा प्रसार प्रामुख्याने मावा या किडीव्दारे होत असल्याने मावा या किडीच्या नियंत्रणासाठी मोनोक्रोटोफॉस या किटकनाशकाची १५ मि.ली. १० लि. पाण्यात किंवा इमिडाक्लोरोपिड १७.८ टक्के एस. एल. या किटकनाशकाची ४ मि.ली. प्रति १० लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी.

 

HITECH KISAN

In Service Of Farmer

English Summary: Soybean crop virus disease management advice
Published on: 13 September 2022, 08:00 IST