Agripedia

लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीची उलाढाल ही सोयाबीन या मुख्य पिकावर असली तरी, गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनचे दर आणि आवकही स्थिरावलेली आहे.

Updated on 20 January, 2022 7:11 PM IST

लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीची उलाढाल ही सोयाबीन या मुख्य पिकावर असली तरी, गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनचे दर आणि आवकही स्थिरावलेली आहे. मध्यंतरी वाढत्या दरानुसार शेतकरी सोयाबीनची साठवणूक करायची विक्री हा निर्णय घेत होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून 22 हजार पोत्यांची आवक आणि 6 हजार 300 चा दर हाच कायम आहे. सध्या बाजारपेठेत लक्ष वेधत आहे तुरीचे पीक.

खरीप हंगामातील तूर हे अंतिम पीक आहे. मात्र, हंगामाच्या सुरवातीपासून तुरीच्या दरात हळुहळु का होईना वाढ ही होत आहे. 1 जानेवारीपूर्वी राज्यात हमीभाव केंद्र सुरु होण्यापूर्वी तुरीचे दर हे 5 हजार 800 पर्यंत होते. पण आता 6 हजार 500 पर्यंत पोहचलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष आता तुरीच्या दराकडे असून वाढत्या दरानुसारच तुरीचीही आवक ठरली जाणार आहे.

जुनं तेच सोनं असंच काहीस तुरीचं

सध्या बाजारपेठेत नवीन आणि जुन्या तुरीचीही आवक सुरु आहे. मात्र, जुन्या तुरीलाच अधिकचा दर आहे. कारण यामध्ये आर्द्रतेचे प्रमाण हे कमी असते 

तर तूर ही वाळलेली असते. त्यामुळे व्यापारी हे जुन्या तुरीलाच पसंती देतात. तर दुसरीकडे हंगामाच्या अंतिम टप्प्यात नवीन तुरीला अवकाळी पावसाचा फटका हा बसलेला आहे. यामध्ये नुकसान तर झालेच पण त्यानंतरही ऊन नसल्यामुळे तूर पूर्णपणे वाळलेली नाही. परिणाम यामध्ये 10 टक्केपेक्षा अधिकची आर्द्रता आहे. त्यामुळे जुन्या तुरीला 6 हजार 400 तर नवीन तुरीला 6 हजार 200 पर्यंतचा दर मिळत आहे.

आता कुठे हंगाम सुरु झाला आहे. बदलत्या दराप्रमाणे बाजारपेठेतील आवकचे आकडेही बदलणारच आहेत.

लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीची उलाढाल ही सोयाबीन या मुख्य पिकावर असली तरी, गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनचे दर आणि आवकही स्थिरावलेली आहे. मध्यंतरी वाढत्या दरानुसार शेतकरी सोयाबीनची साठवणूक करायची विक्री हा निर्णय घेत होते. 

English Summary: Soyabin rate and comming Stop Farmer concentration on kharip crop
Published on: 20 January 2022, 07:11 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)