खरीप हंगामातील शेवटचे पीक म्हणून तुरीकडे पाहिले जाते. सध्या तुरीची आवक सुरू झाली असली तरी खरा हंगाम हा मार्चमध्येच सुरू होणार आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून खरेदी केंद्र सुरू झाली असली तरी येथील हमीभावापेक्षा अधिकचा दर तरीला मिळेल असाच अंदाज व्यापारी व्यक्त करीत आहेत. गेल्या महिन्याभरात दरात झालेली वाढ आणि सोयाबीन, कापसाप्रमाणेच तुरीचे घटलेले उत्पन्न यामुळे दरात वाढ होईल मात्र, शेतकऱ्यांना याकरिता काही वेळेची प्रतीक्षा करावी लागणार आहे
शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नाही. मात्र, ऐन हंगामात तुरीची आवक कमी राहिली तर दरात वाढ निश्चित मानली जात आहे.
महाष्ट्रात सर्वाधिक लागवड क्षेत्र तूर हे देशपातळीवर घेतले जाणारे पीक आहे. ४४ लाख हेक्टर सरासरी क्षेत्र असले - तरी पैकी एकट्या महाराष्ट्रात १२ लाख ७७ हजार हेक्टरावर हे पीक घेतले जात आहे. वाढत्या क्षेत्राप्रमाणेच उत्पादनातही वाढ होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती, पण अखेरच्या टप्प्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकाचे नुकसान तर झालेच,
पण ढगाळ वातारणामुळे मर रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला होता. हंगामात केवळ तूर पीकच जोमात होते, पण अखेरच्या टप्प्यात या पिकाचीही अवस्था सोयाबीन अन् कापसाप्रमाणेच झाली.
यामुळे दरात होणार वाढ
गेल्या १५ दिवसांपासूनच नव्या तुरीची आवक सुरू झाली आहे. या दरम्यानच्या काळातच ५ हजार ते ५ हजार ८०० पर्यंतचे दर आता थेट ६ हजार ३०० पर्यंत पोहचलेले आहेत. सध्या तुरीने हमी भावापर्यंत मजल मारली आहे, पण भविष्याचा विचार केला
तर यंदा तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटलेले आहे. शेतकऱ्यांनी जी सोयाबीन आणि कापसाबाबत भूमिका घेतली होती तीच तुरीबाबत घेतली तर दर निश्चित वाढणार आहेत.
गेल्या १५ दिवसांपासूनच नव्या तुरीची आवक सुरू झाली आहे. या दरम्यानच्या काळातच ५ हजार ते ५ हजार ८०० पर्यंतचे दर आता थेट ६ हजार ३०० पर्यंत पोहचलेले आहेत.
Published on: 15 January 2022, 06:29 IST