Agripedia

रब्बी हंगामात ज्वारीची पेरणी वेळेवर करण्यासाठी जमिनीची खोल नांगरट व पूर्वमशागत करणे गरजेचे असते.

Updated on 22 September, 2022 9:03 PM IST

रब्बी हंगामात ज्वारीची पेरणी वेळेवर करण्यासाठी जमिनीची खोल नांगरट व पूर्वमशागत करणे गरजेचे असते. यानंतर चौकोनी आकाराचे वाफे तयार करून घेतल्यास मॉन्सूनच्या शेवटच्या टप्प्यातील किंवा परतीच्या पावसाचे पाणी चांगल्या प्रकारे मुरते. त्याचा फायदा ज्वारी पिकाच्या वाढीसाठी होतो. अनेक ठिकाणी पाऊस झाल्यामुळे नांगरणी केलेल्या

शेतातील मातीची ढेकळे विरघळली असतील. काही ठिकाणी मातीची ढेकळे विरघळली नसल्यास ती फोडून घ्यावीत.If the soil lumps are not dissolved in some places, they should be broken. त्यानंतर ३ ते ४ कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन तयार करावी.

हे ही वाचा - हळदीची पाने पिवळी पडण्याची समस्या, कारणे आणि त्यावरील उपाय

शेवटच्या पाळी पूर्वी प्रति एकरी ४ ते ६ गाड्या शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीवर पसरावे. जमिनीत पाणी मुरविण्याकरीता कुळवाच्या पाळ्या व इतर मशागतीची कामे उतारास

आडवी करावीत. यामुळे शेतात पडणाऱ्या पावसाचे पाणी मूलस्थानी जिरण्यास मदत होते, रब्बी ज्वारीच्या उत्पादन वाढीसाठी मूलस्थानी जल व्यवस्थापन हे पंचसूत्री तंत्रातील सर्वांत महत्त्वाचे आणि पहिले तंत्र आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीला किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाचे पाणी मुरविण्यासाठी जमिनीची बांधणी करावी.

त्यानंतर मजुरांच्या साह्याने १० × १० चौ.मी. आकाराचे वाफे तयार करावे किंवा २.७० मीटर अंतरावर सारा यंत्राने सारे पाडून घ्यावेत त्यानंतर दर २० मीटर अंतरावर बळिराम नांगराच्या साहाय्याने दंड टाकावेत. यामुळे वाफे तयार करण्यासाठी आवश्यक मजुरीत बचत होऊ शकते. सोईस्कर अशा कोणत्याही तंत्राने वाफे तयार करून घेतल्यास पडणाऱ्या पावसाचे पाणी मुरण्यास मदत होईल.

English Summary: Sow sorghum like this in Rabi, you will get huge income
Published on: 21 September 2022, 05:08 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)