Agripedia

कापूस पिकास खरोखर सोनीया चे दिवस आले असे म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही.

Updated on 29 July, 2022 12:33 PM IST

कापूस पिकास खरोखर सोनीया चे दिवस आले असे म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही.ह्या वर्षी कापसाचे दर १४३७५ रू प्रती क्विंटल पर्यंत कधी पोहोचले ते कळलंच नाही. सुरूवात ६००० रूपयांनी सुरूवात झाली नंतर मात्र दरवाढीने वेग घेतला. गत हंगामात कापूस पिकाचे अति पाऊस आणि गुलाबी बोंड अळी च्या प्रादूर्भावाने उत्पादनात मोठी घट आली. कापूस पिकाचे उत्पादन कमी झाल्याने तसेच देशांतर्गत आणि देशाबाहेर मागणी वाढल्याने कापूस पिकाचे दर न भूतो न भविष्यती असे वाढले. कापूस पिकाचे उत्पादन जरी कमी झाले तरी जादा दरामुळे शेतकऱ्यांना कापूस पिका पासून

चांगला आर्थिक फायदा झाला त्यामुळे शेतकरी समाधानी असून कापूस लागवडी कडे कल दिसुन येत आहे. सध्याची परिस्थीती आणि शेतकऱ्यांचा कल बघून कापूस पिकाचे १o - १२ % क्षेत्र वाढेल असे वाटते. शेतकऱ्यांचा कल ही कापूस पिका कडे असल्याचे चर्चेतून जाणवते.शेतकरी मित्रांनो, कापूस पिकाचे उत्पादन कसे वाढेल ह्यावर गांभीर्याने विचार करून पिकाचे व्यवस्थापन करावे.Consider this seriously and manage the crop. ह्या करीता तज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे. आपल्या कडील साधनानुसार योग्य जातींची निवड करावी. सिंचनाची सोय असल्यास कापूस पिकासाठी ठिबक सिंचनाचा वापर करावा. 

ठिबक सिंचनाच्या वापरामुळे कापूस पिकाचे उत्पादन वाढते हे सिद्ध झाले असुन बरेच शेतकरी ठिबक सिंचनाचा वापर करीत आहेत.राज्यात सर्व पिकांमध्ये सर्वात जास्त ठिबक सिंचनाचा वापर कापूस पिकासाठी होत आहे. महाराष्ट्र राज्यात कापूस पिकासाठी ५.२८ लाख हेक्टर क्षेत्रावर ठिबक सिंचनाचा वापर होत आहे.कापूसमधील ठिबक सिंचनाचे निष्कर्ष आश्चर्यकारक आहेत, ठिबक वर शेतकऱ्यांनी एकरी १५ ते २० क्विंटल पर्यंत उत्पादन घेतले आहे.म्हणून ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे त्यांनी कापसाचे अधिक उत्पादन घेण्यासाठी कापूसमध्ये ठिबक सिंचनाचा अवलंब करणे खुप फायदेशीर आहे.

म्हणून ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे त्यांनी कापसाचे अधिक उत्पादन घेण्यासाठी कापूसमध्ये ठिबक सिंचनाचा अवलंब करणे खुप फायदेशीर आहे.ठिबक सिंचन तंत्रज्ञानाचा वापर करून कापसाची उत्पादकता वाढते हे सिद्ध झाले आहे.कापूस पिका बाबतीत माहीती हवी असल्यास संपर्क साधावा.कापूस पिकाचे अधिक उत्पादन घेण्याकरीता शेतकरी बंधूंना जैन इरिगेशन कडून हार्दीक शुभेच्छा!

 

डॉ.बी.डी.जडे,9422774981     

वरीष्ठ कृषीविद्या शास्त्रज्ञ,    

जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.

English Summary: Sonia's days came for the cotton crop
Published on: 29 July 2022, 12:33 IST