सध्या रब्बी हंगाम डोक्यावर आला आहे. बरेच शेतकरी रब्बी हंगामामध्ये विविध प्रकारच्या भाजीपाला वर्गीय पिकांची लागवड करतात. भाजीपाला पिकासाठी योग्य वाण निवडून तसेच रोपवाटिका तयार करावेत. तसेच शिफारशीत जाती व पद्धतींचा अवलंब केल्याने फायदा होतो. या लेखात आपण रब्बी हंगामामध्ये लागवड करण्यात येत असलेल्या विविध भाजीपाला वर्गीय पिकांचे व्यवस्थापनाविषयी माहिती घेऊ.
रब्बी हंगामामध्ये विविध भाजीपाला वर्गीय पिकांची व्यवस्थापन कसे करावे?
अ)वांगी-
1- जाती- वैशाली, प्रगती, कृष्णा, सुवर्णा एबीव्ही-1
2- बियाण्याचे प्रमाण- हेक्टरी 600 ग्राम
3- लागवड कालावधी- 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर. महत्त्वाचे म्हणजे नियोजित लागवडीपूर्वी 20 ते 25 दिवस आगोदर गादीवाफ्यावर रोपे तयार करून घ्यावीत.
4-लागवड पद्धत-60×75 सेंटीमीटरकिंवा 60×60सेंटी मीटर अंतरावर लागवड करावी
5- खत व्यवस्थापन- लागवडी वेळी 75 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 50 किलो पालाशची खतमात्रा द्यावी.लागवडीनंतर 30 दिवसांनी 75 किलो नत्राची मात्रा द्यावी.
) टोमॅटो-
1- जाति- देवगिरी,परभणी, यशश्री,पुसा रुबी, राजश्री आणि एटीएच-1
2- बियाण्याचे प्रमाण- हेक्टरी 500 ग्रॅम
3- लागवड कालावधी-15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर पर्यंत. त्याआधी 20 ते 25 दिवस गादीवाफ्यावर रोपे तयार करून घ्यावी.
4- लागवड पद्धत-60×45किंवा 60×60 सेंटीमीटर अंतरावर रोपे लावावी.
5- खत व्यवस्थापन-लागवडी वेळी 50 किलो नत्र, 50 किलो प्रत्येकी स्फुरद व पालाश द्यावे.उर्वरित 50 किलो नत्राची मात्रा लागवडीनंतर 30 दिवसांनी द्यावे.
इ) मेथी-
1- मेथीच्या जाती-पुसा अर्लीब्रांचींग, आरएमटी1, कस्तुरी.
2-बियाण्याचे प्रमाण- 25 ते 30 किलो बियाणे प्रति हेक्टर
3- लागवड पद्धत- बी फेकून किंवा 25 सेंटीमीटर अंतरावर आणि 3×2 मीटर आकाराचे सपाट वाफे करून करावी
4- खत व्यवस्थापन- लागवडी वेळी 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद, 50 किलो पालाश द्यावे. मेथी कापणीनंतर 50 किलो नत्राची मात्रा द्यावी.
ई) पालक-
1- जाती- ऑल ग्रीन,पुसा, ज्योती परित
2- बियाणे प्रमाण - आठ ते दहा किलो प्रती हेक्टर
3- लागवड पद्धत-10×10 सेंटीमीटर अंतरावर बी पेरावे किंवा 3×2 मीटर आकाराचे सपाट वाफे करून पेरणी करवी.
4- खत व्यवस्थापन-लागवडीवेळी 80 किलो नत्र, 40 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश द्यावे.
उ) कोबी-
1- कोबीच्या जाती-गोल्डन एकर,प्राइड ऑफ इंडिया, अर्ली ड्रमहेड
2- बियाण्याचे प्रमाण - 500 ते 600 ग्रॅम प्रति हेक्टरी बियाणे
3- लागवड कालावधी- 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर पर्यंत
4- लागवड पद्धत-60×60किंवा 45×45सेंटीमीटर अंतरावर रोपांची लागवड करावी. त्या आधी 25 दिवस रोपवाटिकेत रोपे तयार करून घ्यावी. लागवडीपूर्वी कार्बनडेंझिमएक ग्रॅम प्रति लिटर या द्रावणात रोपे बुडवून लावावीत.
5- खत व्यवस्थापन-160 किलो नत्र, 80 किलो स्फुरद व 80 किलो पालाश
Published on: 17 October 2021, 02:10 IST