Agripedia

सध्या अख्खा महाराष्ट्र थंडीने गारठतआहे. तसेच वातावरणात दाट धुके देखील पसरत आहे वातावरणामध्ये धुक्याचे प्रमाण वाढले तर पिकाचे नुकसान होते.

Updated on 28 January, 2022 5:42 PM IST

सध्या अख्खा महाराष्ट्र थंडीने गारठतआहे. तसेच वातावरणात दाट धुके देखील पसरत आहे वातावरणामध्ये धुक्याचे प्रमाण वाढले तर पिकाचे नुकसान होते.

कांदा पिकाच्या बाबतीत बोलायचे झाले तर त्यामुळे कांदा पिकाची शेंडे पिवळी पडण्यास सुरुवात होते. धुक्यामुळे कांदा पिकावर मावा, करपा या दोन रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होण्याची दाट शक्यता असते.धुक्यापासून कांदा पिकाचे नुकसान होऊ नये यासाठी कोणती उपाययोजना करावी याबाबतची माहिती या लेखात घेऊ.

 अशा पद्धतीने धुक्यात कांदा पिकाची काळजी घ्यावी…..

  • हिवाळ्याच्या दिवसात कांद्याच्या पातीवर जे मोठ्या प्रमाणात दव साठलेले असते, ते काढणे गरजेचे असते. यासाठी प्रेशर पंपाच्या सहाय्याने पाण्याची फवारणी करू शकतात. त्यामुळे पातीवरील धुके नाहीसे होऊन जाईल.
  • धुकेज्या वेळी पडत असेल त्याच वेळी पिकावर फवारणी घेणे गरजेचे असते. दुपारी फवारणी घेऊ नये तसेच पिकावर बुरशीनाशकांची फवारणी करू शकतात.
  • तसेच सिलिकॉन बेस स्टीकर ची पाण्यात मिसळून फवारणी करू शकतात.
  • ज्या शेतकऱ्यांचा कांदा स्प्रिंकलर किंवा रेन पाईप वर आहे त्यांनी सकाळच्या धुक्याच्या वेळात पाच ते दहा मिनिटांसाठी स्प्रिंकलर सुरू करावी.
  • धुक्यावर पूर्वीपासून चालत आलेला एक उपाय म्हणजे पूर्वीच्या काळी शेतकरी लिंबाच्या पानांचा सहायाने कांद्याच्या पातीवरील धुके झटकायची. हा देखील उपाय उत्तम आहे.
  • तसे पाहिल्यास कांदा पिकाला रोजच्या रोज फवारणीची आवश्‍यकता नसते. परंतु रोजच जर धुके पडत असेल तर तीन दिवसांतून एकदा बुरशीनाशकाची फवारणी करावी. शक्यतो द्रव्य स्वरुपातील बुरशीनाशकाचा वापर करावा.
English Summary: some useful tips for save onion crop from winter fog and managanemt
Published on: 28 January 2022, 05:42 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)