Agripedia

नमस्कार मंडळी लक्षात घ्या आजचा लेख हा तुम्हाला विचार करू लावणारा आहे व माझ्या शेतकरी मित्रांसाठी आहे. शेतीमध्ये जो शेती कसतो व उत्पादन घेतो तोच शेतकरी आहे. आपल्याला शेती उत्पादन हा पूर्णपणे पूर्णवेळ करायचा व्यवसाय आहे.आपल्या सांगितले जाते आपन अमुक वान लावा उत्पादन योग्य येईल पण केव्हा उत्पादन वाढेल? जेव्हा आपली शेती जमिनीचा पोत चांगला राहील तेव्हा!आपण काय करत आहे कि जमिनीचा विचारच करत नाही आहोत.

Updated on 09 February, 2022 3:43 PM IST

नमस्कार मंडळी लक्षात घ्या आजचा लेख हा तुम्हाला विचार करू लावणारा आहे व माझ्या शेतकरी मित्रांसाठी आहे. शेतीमध्ये जो शेती कसतो व उत्पादन घेतो तोच शेतकरी आहे. आपल्याला शेती उत्पादन हा पूर्णपणे पूर्णवेळ करायचा व्यवसाय आहे.आपल्या सांगितले जाते आपन अमुक वान लावा उत्पादन योग्य येईल पण केव्हा उत्पादन वाढेल? जेव्हा आपली शेती जमिनीचा पोत चांगला राहील तेव्हा!आपण काय करत आहे कि जमिनीचा विचारच करत नाही आहोत. 

आपल्याला पुर्वजा कडुन मिळालेली सुपिक माती आता पूर्वीसारखी सुपीक राहिली नाही. कारण तिच्याकडून फक्त घेणेच चालू आहे. तिला दिला जाणारा मोबदला जसे शेणखत, सेंद्रिय खत, हिरवळीचे खत इत्यादी हे अत्यल्प किंवा देणे साफ बंदच केले आहे. आज फक्त जास्तीत जास्त उत्पादन कसे काढावे ही स्पर्धा आपन सुरू
केलीआहे.सेंद्रिय खतांकडे झालेल्या दुर्लक्षांमुळे दिवसेंदिवस जमिनीचे आरोग्य बिघडत आहे. नव‌ नवीन पद्धतीने शेती करताना अंदाजित पद्धतीने पिकांना आवश्यक घटक मूलद्रव्यांचा पुरवठा केला जातो.त्याचा परिणाम उत्पन्नावर होऊन नुकसान होण्याची शक्यता असते. जमिनीचे आरोग्य राखून शेती उत्पादनक्षम आणि आर्थिकदृष्ट्या फायद्याची होण्यासाठी मातीसारख्या नैसर्गिक साधनसामग्रीचे संवर्धन व संरक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. परंतु गेल्या काही वर्षापासून आपल्या जमिनींची सुपीकता आणि उत्पादन क्षमता कमी झालेली आहे.

आपन उत्पादन घेताना आपण त्या पिकोंचे किती उत्पादन घेणार याबाबतचा विचार करतो, परंतु ती पिके ज्या जमिनीत उगवत असतो त्या मातीबद्दल आपण कधी विचार केला आहे का? आपल्या मातीची सुपिकता कमी होत चालला आहे व त्यामुळे उत्पादन घटत चालले आहे, हे माहिती असले तरी आपण मातीला तिची सुपीकता परत मिळवून देण्याकरिता काय उपाय केले पाहिजेत हे समजून घेतो का?हा ही एक यक्षप्रश्न आहे
मंडळी जेव्हा शेतकरी आपले स्वताच पॅटर्न राबवितो तो शेतकरी दरवर्षी एक सारखे पिक उत्पादन घेऊच शकत नाही.

ही उत्पादन घट कशी आली हे त्यालाच माहीत असते.खताचा असंतुलित वापर, जमीन सतत पिकाखाली ठेवणे, पाण्याचा अतिवापर यामुळे जमिनीचे आरोग्य बिघडत आहे. या कारणांमुळे उत्पादनवाढीत घट होऊन समस्याग्रस्त क्षेत्रात वाढ झाली आहे’.
त्याचा मुख्य परिणाम म्हणजे जमिनीची सुपीकताच कमी होत आहे. आपल्याकडील जमिनीची सुपीकता आणि जिवंतपणा कमी कशाप्रकारे झाली आहे. त्याचे साधे उदाहरण आहे की मृग नक्षत्रात पावसाचा येणारा सुगंध नाहीसा झाला आहे.हे तर मान्य करावे लागेल.म्हणून आपण मातीकडे काळजीपूर्वक पाहायला हवे व तिला योग्य तो आधार द्यायला हवा. आपण मातीचा प्रकार, तिचा कसरदारपणा, तिची सुपीकता या सर्वाबद्दल माहितीही करून घेतली तर आपण त्या मातीचा उत्तम उपयोग करून घेऊ शकतो. वेगवेगळया प्रकारची माती वेगवेगळया पिकांकरिता योग्य व चांगली असते.
मला हेच सांगायचे आहे कोणतीही गोष्ट हातातून निसटून गेली तर ति आपली रहातं नाही.जमीन ही स्थावर मालमत्ता असल्याने पिढयान् पिढया तिचा वापर होणार आहे तीची जोपासना करणे आपले कर्तव्य आहे. 

"अनमोल जमीन वाचवा वसुंधर वाचवा"
आज मातिला वाचवा उद्या माती तुम्हाला वाचवेल!
विचारांची दीशा बदला जिवनाची दशा आपोआप बदलेल
आपल्या मित्र
मिलिंद जि गोदे
Mission agriculture soil information
milindgode111@gmail.com
Agriculture development and technology
Group addmin

English Summary: some thind went wrong in farming thats find is very important
Published on: 09 February 2022, 03:43 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)