BT कापसाला मध्यम व भारी जमीन खुप मानवते.त्यासाठी अशाच जमिनीत कापसाची लागवड करावी. तसेच सिंचन सुविधा नसलेल्या हलक्या जमिनीत कापुस लागवड शक्यतो टाळावी.जमिनीच्या प्रकारानुसार समतल पेरणी,जमिनीच्या उताराला आडवी पेरणी,सरी वरंबा पध्दतीने मशागत इ. मुलस्थानी जलसंधारण तंत्राचा अवलंब करावा. कोरडवाहू क्षेत्रामध्ये बिगर बी.टी.कपाशीच्या सरळ वाणांची अतिघन पध्दतीने लागवड केल्यास बी.टी. वाणा इतकेच उत्पादन मिळू शकते.सरळ वाणांचे बियाणे घरच्या घरी तयार करुन त्याचा वापर करावा. बीबीएफ यंत्राचा वापर करुन पेरणी करावी, जेणेकरुन पावसाचे पाणी साठवून ठेवण्यास मदत होऊन ओलावा अधिक काळ टिकतो व अतिपावसाच्या वेळी पाण्याचा निचरा होण्यास मदत होते.
यामुळे बियाणे, खत व मजुर खर्चात बचत होते. कापूस पिकात भूईमूग (1:1), मूग किंवा उड़ीद (1:1), सोयाबीन (1:1 किंवा 2:1) या आंतरपीक पध्दतीचा अवलंब करावा.आपल्या विभागामध्ये कृषि विद्यापीठाने शिफारस केलेल्या योग्य कालावधीमध्ये पेरणी केल्यास कीड व रोग यांचा प्रादुर्भाव टाळता येतो.तण नियंत्रणासाठी पेरणीपुर्व तणनाशकांचा वापर करावा.लाल्या रोगाच्या प्रादुर्भावाचे प्रमाण कमी होण्यासाठी फुलोऱ्याच्या वेळेस 2 टक्के युरिया आणि बोंडे धरताना 1 टक्का युरिया अधिक 1 टक्का मॅग्नेशियम सल्फेट आणि 1.5 टक्का म्युरेट ऑफ पोटॅशची फवारणी करावी. कीड–रोग सर्वेक्षण प्राप्त सल्ल्यानुसार कीड़-रोग नियंत्रणासाठीं उपाययोजनाकराव्यात.कीड नियंत्रणाच्या दृष्टीने इंग्रजी टी (T) आकाराच्या एकरी 15 ते 20 पक्षी थांब्यांचा वापर करावा.
शेंदरी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी जनुक विरहीत ,आश्रीत कापुस (रेफ्युजी) किंवा दोन महिन्यांनी भेंडीची आश्रित पीक म्हणुन कापुस पिकाभोवती लागवड करावी.पीक उगवणीनंतर 45 दिवसांनी घरच्या घरी तयार केलेल्या 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी त्यानंतर पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी एकरी 4-5 पिवळया चिकट सापळ्यांचा वापर करावा.कापुस पिकास नाडेप कंपोस्ट खत, गांडूळ खत, बायोडायनामिक खत इ. सेंद्रिय खतांचा वापर करावा.शेतावरच स्वतः तयार केलेलों स्वस्त व प्रभावी जैविक कोड / रोग नियंत्रण औषधे जसे निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, जिवामृत, अमृतपाणी, बिजामृत इ.चा वापर करुन खर्चात बचत करावी. शक्य तेथे शेततळ्याच्या माध्यमातून पाण्याची साठवण करावी व पावसात खंड पडल्यास संरक्षित सिंचनासाठी साठवण केलेल्या पाण्याचा उपयोग करावा.उगवण,पाते लागणे,फुले लागणे,बोंड धरणे व बोंड भरणे या वाढीच्या महत्वाच्या अवस्थेत
पिकास पाणी द्यावे . 30 ते 35 ट्क्के बोंडे फुटल्यानंतर वेचणी करण्यापेक्षा 50 ते 60 टक्के बोंडे फुटल्यानंतर वेचणी करावी.स्वच्छ कापूस वेचणी व कापसाची प्रतवारी राखण्यासाठी कापूस वेचणी, साठवण व हाताळणी या प्रक्रियांवर भर दिल्यास कापसाची प्रत चांगली मिळून चांगला दर मिळु शकतो. शेंदरी बोंडअळी डिसेंबर महिन्यात पन्हाट्यांमध्ये कोषावस्थेत जात असल्यामुळे नोव्हेंबर महिन्यात कापसाची वेचणी झाल्याबरोबर पन्हाट्या आणि इतर पालापाचोळा शेताबाहेर काढून त्यापासुन कंपोस्ट खत तयार करावे.यामुळे शेंदरी बोंडअळीचा जीवनक्रम खंडीत होण्यास मदत होते.कापसाचा खोडवा घेण्याचे टाळावे.शतक-यांनी एकत्र येऊन शेतकरी गटांव्दारे बियाणे, खते, कीटकनाशके, सिंचन साधने इ. निविष्ठा खरेदी केल्यास पुरवठादाराकडून वाजवी दरात कृषि निविष्ठांचा पुरवठा होऊ शकतो.
प्रा.दिलीप शिंदे(सर)
9822308252
Published on: 10 July 2022, 07:38 IST