Agripedia

भारतात ह्यावेळी शेतकरी बांधवांनी रब्बी हंगामाची पिकांच्या पेरणीची तयारी सुरु केली आहे. खरीप नंतर सर्वात जास्त लागवड ही ह्या हंगामात केली जाते. गहु देखील रबी हंगामाचे एक महत्वाचे पिक आहे. आणि भारतात गव्हाचे उत्पादन आणि कन्सपशन म्हणजे वापर सर्वात जास्त आहे, त्यामुळे गव्हाची लागवड ही शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरते. असे असले तरी गहु उत्पादक शेतकऱ्यांनी काही गोष्टींची काळजी घेणे महत्वाचे ठरते, शेतकरी बांधव शास्त्रीय पद्धतीने गहु लागवड करून चांगली तगडी कमाई करू शकतात.

Updated on 21 October, 2021 2:52 PM IST

त्यामुळे आज आम्ही आमच्या वाचक शेतकरी मित्रांसाठी काही खास टिप्स घेऊन आलो आहोत ज्यामुळे शेतकरी बांधवांचे उत्पादन वाढेल. चला तर मग वेळ न दवडता जाणुन घेऊया गहु लागवडी विषयी काही स्पेशल टिप्स.

 गहु उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी काही टिप्स

»गहु लागवड करताना गव्हाच्या सुधारित जातींची निवड करा. जर गव्हाच्या सुधारित जातींची निवड केली तर त्यापासून मिळणारे उत्पादन हे दुसऱ्या जातींच्या उत्पादनपेक्षा जास्त असते.  त्यामुळे अनेक कृषी वैज्ञानिक शेतकऱ्यांना नेहमी नवीन, रोग प्रतिरोधक आणि जास्त उत्पादन देणाऱ्या जाती निवडण्याचा सल्ला देतात.

बागायती आणि चांगल्या पावसाच्या भागात गहु लागवड करायचा असेल तर, DBW 303, WH 1270, PBW 723 ह्या जातींची लागवड करता येऊ शकते असे अनेक गहु उत्पादक शेतकरी सांगतात. ह्या वाणी आगात गहु लागवडीसाठी योग्य असल्याचे सांगितले जाते.

»बागायती आणि पसात पेरणीसाठी, DBW 173, DBW 71, PBW 771, WH 1124, DBW 90 आणि HD 3059 ह्या जाती निवडाव्यात असा सल्ला दिला जातो. पण शेतकऱ्यांनी तरीही आपल्या जमिनीनुसार वाण निवडावी आणि कृषी वैज्ञानिकचा सल्ला घ्यावा.

»उन्हाळी हंगामात किंवा पसात गहु लागवडीनंतर जर लागवड करायची असेल तर HD 3298 जातीची निवड करता येऊ शकते.

»आणि ज्या ठिकाणी पाऊस हा मध्यम स्वरूपाचा असेल त्या ठिकाणी गव्हाची wh 1142 ही वाण चांगली असल्याचे सांगितले जाते.

»गहु लागवड जर रब्बी हंगामात वेळेवर करायची असेल आणि बागायती वावर असेल तर 25 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर हा काळ योग्य असल्याचे सांगितले जाते.

»रबी हंगामात पसात गहु पेरणीचा कालावधी 25 नोव्हेंबर ते 25 डिसेंबर चांगला असतो.

»आणि त्याही पेक्षा उशिरा पेरणी 25 डिसेंबर च्या पुढे करता येते.

»गहू पेरणीच्या 15 ते 20 दिवस आधी शेण 4 ते 6 टन/एकर या दराने शेतात टाकावे. शेणखत चांगल्या प्रतीचे वापरावे जेणेकरून जमिनीची सुपीकता चांगली वाढते.

English Summary: some important tips for wheat productive farmer
Published on: 21 October 2021, 02:52 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)