उसाच्या पिकाला माती परीक्षणानुसार रासायनिक खतांचा वापर करावा.ठिबकद्वारे खते देताना योग्य काळजी घ्यावी. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार पीक व्यवस्थापन करावे. ऊसाच्या लागवडीनंतर 45, 65 व 85 दिवसानंतर जिब्रेलिक एसिड ( 50 पीपीएम) व त्यामध्ये पाण्यात विरघळणारी विद्राव्य खते 12:61:00( मोनो अमोनियम फॉस्फेट) व 19:19:19मिसळूनफवारणी करावी.
त्यामुळे उसाच्या पानांची लांबी रुंदी वाढते. एकूणच प्रकाश संश्लेषण क्रिया वाढून अण्ण तयार करण्याचे प्रमाण वाढते. परिणामी फुटव्यांची जाडी वाढते. उसाला जर फर्टिगेशन करायचे असेल तर त्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते.या लेखात आपण उसाला फर्टिगेशन करताना काय काळजी घ्यावी? याबद्दल माहिती घेऊ.
उसाला फर्टिगेशन करताना घ्यायची काळजी
1-उसाची लागवड केल्यानंतर 15 दिवसांनी फर्टिगेशन सुरू करावे.
रासायनिक खतांचा प्रभावी परिणाम मिळवण्यासाठी हलक्या जमिनीत प्रत्येक चार दिवसांनी फर्टिगेशन करावे. मध्यम ते भारी जमिनीसाठी प्रत्येक आठवड्यात फर्टिगेशन करावे.
3- प्रत्येक चार दिवसांनी फर्टिगेशन करण्यासाठी वरील वेळापत्रकात आठवड्यासाठी दिलेली खतमात्रा अर्धी करून वापरावी.
4-खतांचे द्रावण करीत असताना सर्वप्रथम पांढरा पोटॅश,12:61:00 व सर्वात शेवटी अमोनियम सल्फेट, युरिया अनुक्रमे प्रति किलो खतांसाठी पाच,चार व तीन लिटर पाणी या प्रमाणात पूर्णपणे विरघळून घ्यावी
- दिलेली रासायनिक खते जमिनीत सारख्या प्रमाणात मिळण्यासाठी 50 ते 60 टक्के पाणी दिल्यानंतर बारा ते पंधरा मिनिटे फर्टिगेशन करून त्यानंतर दहा ते पंधरा मिनिटात परत पाणीद्यावे.
6- ह्युमिक ऍसिड दर महिन्यात दोन लिटर प्रति एकर प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून दहा ते बारा महिन्यांपर्यंत स्वतंत्ररीत्या वापरावे.
7- एकरी 40 किलो मॅग्नेशिअम सल्फेट दर महिन्यात पाच किलो किंवा 180 दिवसानंतर प्रति आठवडा 2किलो स्वतंत्ररित्या याप्रमाणे फर्टिगेशन करावे.
Published on: 07 December 2021, 02:05 IST