जगात तसेच भारतात शेती करण्याची पद्धत हि बदलत चालली आहे. बदलत्या काळानुसार शेतीमध्ये अमूलाग्र बदल घडून येत आहे. कृषी वैज्ञानिक अनेक शोध लावत आहेत. उत्पादन वाढावे आणि परिणामी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे म्हणुन अनेक औषधंचा शोध लावला जात आहे. एवढेच नाही तर भारत सरकार तसेच राज्यातील सरकार शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी वैज्ञानिक प्रयोग करत आहे.
असे असले तरी शेतकरी बांधव आजही कोणाच्या सांगण्यावरून तसेच माहितीचा अभाव असल्यामुळे व काहीतरी नवीन प्रयोग म्हणून नको ते देशी जुगाड करत असते आणि त्यामुळे फायदा तर कमी होतो पण नुकसान होण्याचे चांसेस अधिक असतात. असाच एक देशी जुगाड अथवा एक्सपेरियमेंट मराठवाडा प्रांतात शेतकरी करतांना दिसत आहेत. सध्या मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकरी कांद्याला चमक यावी, क्वालिटी वाढावी म्हणून चक्क देशी दारूचा फवारा मारत आहेत. शक्यतो ह्या गोष्टीचा आपणास विश्वास बसनार नाही मात्र हे शंभर आना खरं आहे आणि ह्याचा प्रयोग उस्मानाबाद जिल्ह्यातील काही तालुक्यात सर्रास केला जात आहे. जिल्ह्यातील हा प्रयोग सध्या चर्चेचा विषय देखील बनला आहे.
काय आहे शेतकऱ्यांचे म्हणणे
शेतकऱ्यांचे मते, देशी दारू कांद्यावर फवारल्याने कांद्याला एक वेगळी चमक येते, आणि एवढेच नाही तर यामुळे कांद्यावर रोगांचा प्रकोप देखील कमी होतो. फक्त उस्मानाबाद जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात देखील देशी दारूचा पिकासाठी सर्रास वापर केला जात आहे. फक्त कांद्यासाठीच नाही तर कोथिंबीर पिकासाठी देखील देशी दारूचा फवारा हा मारला जातो.
खांदेशातील अनेक भागात कोथिंबीर लागवड केली जाते आणि तिथे शेतकरी देशी दारू कोथिंबीर पिकाला नेहमी मारत असतात. कांदा उत्पादक शेतकरी असा दावा करतात की, देशी दारुमुळे कांद्याला चकाकी येते शिवाय यामुळे अनेक किडी ह्या मरतात, त्यामुळे रोगापासून देशी दारू कांदा पिकाचा बचाव करते. पण शेतकऱ्यांचा ह्या दाव्याला शेतकरी नेते फेटाळून लावत आहेत. त्यांच्या मते शेतकरी हे अफवान्ना बळी पडत आहेत आणि त्यामुळे ते असे करत आहेत. शेतकरी नेते देशी दारूच्या फवारणी करण्याला समर्थन नाही देत आहेत.
काय सांगतात वैज्ञानीक
कृषी वैज्ञानिक ह्यांच्या मते, देशी दारू अथवा अल्कोहोल फवारल्याने पिकाला फायदा होतो असे कुठलेही सायंटेफिक प्रमाण नाही आहे.
तसेच ह्यावर आजवर कुठलाही प्रयोग केला गेलेला नाही. शेतकरी सोसिएल मिडियावर आलेल्या व्हिडिओवर विश्वास ठेवतात आणि तसे अनुकरण करतात. कृषी वैज्ञानिक सांगतात की, अल्कोहोल मध्ये इंसेक्ट अर्थात किड मारण्याचे घटक नाहीत. पिकाच्या वाढीसाठी पोषक तत्व आणि किडीना मारण्यासाठी पेस्टीसाईडची गरज पडते. म्हणून देशी दारू मारल्याने पिकाला काही फायदा पोहचत नाही.
Published on: 22 November 2021, 06:14 IST