Agripedia

आपला भारत देश हा कृषी प्रधान देश म्हणुन ओळखला जातो. पन मी जर आपल्या देशाला शेतकरी प्रधान देश म्हटलो तर काही अतिश्योक्तीं होणार नाही असं मला वाटत कारण की,देशात 78% जनसंख्या गावात राहतात आणि शेती हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे.म्हणूनच आपण सर्वांनी कृषी उत्पादन वाढविण्यासाठी विशेष लक्ष दिले पाहिजे. माती परीक्षणची उद्दीष्टे आपल्या शेतीची माती परीक्षण करून आपल्याला खालील माहिती मिळते:- ● मातीच्या सुपीकता बरोबरच, उपलब्ध असलेल्या घटकांची मात्रा देखील ज्ञात होते. ● मातीच्या गुणधर्मांच्या बाबतीत जास्तीत जास्त माहिती उपलब्ध होते त्याचा उपयोग आपण जास्त उत्पादनसाठी करू शकतो. ● खत व खाद्याचे निवड करण्यास सोपे होते. ● नापिक व रोगट मातीची माहिती मिळते आणि त्यानुसार आपण उपचार करू शकतो. ● मातीच्या गुणधर्मांच्या आधारे शेतीत उत्पादन घेऊ शकतो आणि इतर उपयुक्त योजनांची अंमलबजावणी देखील करू शकतो. ● माती परीक्षण करून आपण दीर्घकालीन भूमीचा वापर करु शकतो जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठीमाती परीक्षणाचा उपयोग होतो.

Updated on 07 July, 2021 12:51 PM IST

आपला भारत देश हा कृषी प्रधान देश म्हणुन ओळखला जातो. पन मी जर आपल्या देशाला शेतकरी प्रधान देश म्हटलो तर काही अतिश्योक्तीं होणार नाही असं मला वाटत कारण की,देशात 78% जनसंख्या गावात राहतात आणि शेती हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे.म्हणूनच आपण सर्वांनी कृषी उत्पादन वाढविण्यासाठी विशेष लक्ष दिले पाहिजे.

 

 

माती परीक्षणची उद्दीष्टे

 आपल्या शेतीची माती परीक्षण करून आपल्याला खालील माहिती मिळते:-

  • मातीच्या सुपीकता बरोबरच, उपलब्ध असलेल्या घटकांची मात्रा देखील ज्ञात होते.
  • मातीच्या गुणधर्मांच्या बाबतीत जास्तीत जास्त माहिती उपलब्ध होते त्याचा उपयोग आपण जास्त उत्पादनसाठी करू शकतो.
  • खत व खाद्याचे निवड करण्यास सोपे होते.
  • नापिक व रोगट मातीची माहिती मिळते आणि त्यानुसार आपण उपचार करू शकतो.
  • मातीच्या गुणधर्मांच्या आधारे शेतीत उत्पादन घेऊ शकतो आणि इतर उपयुक्त योजनांची अंमलबजावणी देखील करू शकतो.
  • माती परीक्षण करून आपण दीर्घकालीन भूमीचा वापर करु शकतो जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठीमाती परीक्षणाचा उपयोग होतो.

 

 

माती परीक्षणाचा उद्देश

मातीचा नमुना घेण्यापूर्वी आपण मातीचा नमुना कोणत्या उद्देशाने घेत आहात हे आपल्याला माहित असले पाहिजे.

पिकासाठी खताचे प्रमाण माहित करण्यासाठी पृष्ठभाग पासून 0-15 सें.मी. वरची 500 ग्रॅम.मातीचा  एक प्रतिनिधित्व नमुना घ्या.बाग किंवा झाडाच्या लागवडीसाठी, जमिनीत दोन मीटरपर्यंत खोल खोदून घ्या आणि माती सर्वेक्षण तज्ञाच्या सल्ल्यानुसार मातीच्या वेगवेगळ्या थरांचे नमुने घ्या.नापीक जमीन सुधारण्यासाठी एकतर माती-सर्वेक्षण तज्ञाची मदत घ्या किंवा ड्रिलच्या सहाय्याने कमीतकमी 1 मीटर पर्यंत 15-20 सें.मी.  च्या मध्यांतरातून अंदाजे एक किलो प्रतिनिधित्व नमुना गोळा करा.

 

 

 

 

 

मातीच्या नमुन्यासाठी आवश्यक साहित्य

  • मातीचे खोदकाम साधने कुदळ, पावडा, खुर्पी किंवा ऑगेर मातीचे नमुने अधिक खोलीवर नेण्यासाठी.
  • नमुना गोळा करण्यासाठी तगारी/कढई.
  • नमुना सुकविण्यासाठी कापड किंवा जुने वृत्तपत्र.
  • नमुने ठेवण्यासाठी स्वच्छ पॉलिथीन पाउच (500 ग्रॅम क्षमता).
  • नमुन्याबद्दल आवश्यक माहिती पत्रक.
  • मातीचा नमुना ठेवण्यासाठी स्वच्छ कापडी पिशवी घ्या. खाद्याच्या थैलीत नमुना ठेवू नका.

 

 

 

 

 

माती सॅम्पलिंग पद्धत

  • मातीचा रंग, प्रकार आणि नैसर्गिक उतार आणि खोली यांच्या आधारे शेताचे विभाजन केले पाहिजे.
  • मागील पिकाची कापणी झाल्यानंतर किंवा पुढील पिकाच्या लागवडी आधी मातीचा नमुना घ्या.
  • मातीच्या वरच्या थरावरील सेंद्रिय पदार्थ जसे की पाला पाचोळा, कोरडे पाने, फ़ांद्या इ. काढून टाकून सुमारे 20 सें.मी.  लांब आणि रुंद आणि 15 सें.मी.  खोल-आकाराच्या खड्डा करा व परत आधीसारखाच 15 सेमी. खोल करा व मातीचा एक मोठा थर कापून तगारीत/कढईत गोळा करा.
  • ड्रिलच्या मदतीने सरळ 15 सें.मी.  खोलीचे नमुना काढा आणि कढईत गोळा करा.
  • शेतात 8 ते 10 ठिकानाहून नमुने गोळा करा आणि सर्व नमुने एका सेटमध्ये गोळा करा.
  • या सर्व ठिकाणाहून गोळा केलेला नमुना जुन्या वर्तमानपत्रावर किंवा स्वच्छ कपड्यावर एकत्रित मिसळा आणि त्याचे चार भाग करा.
  • चतुर्भुज पद्धतीने या चार भागातून दोन भाग ठेवा आणि दोन वेगळे करा.
  • सुमारे 1 किलो नमुना शिल्लक होईपर्यंत वरील क्रियेची पुनरावृत्ती करा.
  • प्राप्त केलेल्या नमुन्यांची माहिती तयार केल्यानंतर, प्राप्त केलेली मातीचा नमुना व्यवस्थित वाळवून घ्या.
  • नमुना संबंधित माहिती पत्रकासह पॉलिथीनच्या पिशवीत कोरड्या मातीचा नमुना ठेवून पिशवी व्यवस्थित बांधून कपड्याच्या पिशवीत ठेवून जवळच्या माती परीक्षण प्रयोगशाळेस किंवा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना द्या.

 

 

 

मातीचा नमुना कसा बरं घेणार?

माती परीक्षणेसाठी अर्धा किलो मातीचा नमुना हा पूर्ण शेताचा नमुना प्रस्तुत करतो (क्षेत्र 1 ते 5 एकर पर्यंत असू शकते) म्हणूनच, नमुना योग्य प्रकारे घेणे आवश्यक आहे.मातीचा नमुना घेण्यासाठी माती काढण्याचा ट्यूब किंवा ऑगर वापरणे आवश्यक आहे.परंतु शेतकऱ्यांकडे त्यांची उपलब्धता नसल्यामुळे शेतकरी खूरपी किंवा कुदळ वापरू शकतात. मातीचे नमुने ठेवण्यासाठी स्वच्छ कढई व नमुना परीक्षणासाठी घेऊन जायला स्वच्छ कपड्यांच्या पिशव्या असाव्या. शेतातील मिश्रित नमुना घ्यावा. एकाच शेतीच्या पिकाच्या वाढीत असमानता असल्यास, मातीच्या रंगात भिन्नता असल्यास आणि जमीन उंच किंवा खोल असल्यास,शेताला वेगवेगळ्या भागात विभागले पाहिजे आणि वेगवेगळ्या भागांचे नमुने घेतले पाहिजेत,स्वतंत्रपणे.

भात, गहू, ज्वारी, हरभरा इत्यादी पिकांसाठी 6ते9 इंच खोलीचे नमुने घ्यावेत.  मका, कापूस, तूर, ऊस इत्यादी पिकांसाठी एक ते दीड फूट खोलीतुन सॅम्पल घ्यावेत. कारण त्यांची मुळे खोल आहेत.  बागेतून माती तपासण्यासाठी 2.5 ते 3 फूट खोल खड्डा खोदणे, खड्डाची एक बाजू साफ करणे, आणि वेगवेगळ्या थरांची माती वेगवेगळ्या बॅगमध्ये भरून ठेवणे.

एकाच जमिनीतून मिश्रित नमुना मिळण्यासाठी, शेताच्या क्षेत्रफळानुसार अनुसार, 5 ते 15 वेगवेगळ्या ठिकाणाचे थोडे- थोडे नमुना घेऊन एका ट्रेमध्ये ठेवले पाहिजे. 

त्यातून धूळ, भुसकट, गारगोटी, खडे स्वच्छ केले पाहिजेत.  आता माती खूप चांगली मिसळा आणि नमुन्यांचा ढीग बनवा, आणि चतुर्भुज पद्धतीने त्याचे चार भाग करा, दोन भाग घ्या आणि दोन भाग वेगळे करा.सुमारे 1 किलो नमुना शिल्लक होईपर्यंत वरील क्रियेची पुनरावृत्ती करा.

जर जमिनीत ओलावा असेल तर माती वाळवून स्वच्छ कपड्यांच्या पिशवीत भरावी.  माती भरल्यानंतर माहिती पत्रक ठेवून बॅगचे तोंड बांधून जवळच्या माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवा.

जर मातीचा पीएचमूल्य 6.0 पेक्षा कमी असेल तर जमीन अम्लीय आहे असे समजावे.जर ते 6.0ते 8.5 च्यादरम्यान असेल सामान्य असते आणि जर 8..5 पेक्षा जास्त असेल तर माती क्षारीय होण्याची शक्यता असते. आणि जर पीएच 9.0 पेक्षा जास्त असेल तर जमीन क्षारीय मानली जाईल.

 

 

 

 

 

मातीचा नमुना घेताना खबरदारी

पाऊस किंवा सिंचन झाल्यानंतर मातीचा नमुना घेऊ नका.  पिकाला खाद्य दिल्यावर व पीक कापणीनंतर वाचलेले कडबा वगैरे जळल्यानंतर लगेचच नमुना घेऊ नका. बांध,कालवे व नाल्याजवळील, झाडाच्या सावलीखालील भाग, कंपोस्ट खड्डे जवळील मातीचे नमुने गोळा करू नका.

 

English Summary: soil testing
Published on: 07 July 2021, 12:51 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)