Agripedia

शेतीच्या क्षेत्रात सर्वात मोठा रोल असतो तो धरणी मातेचा, आपल्या काळ्या आईचा. शेतीतुन चांगले दर्जेदार उत्पादन प्राप्त करण्यासाठी माती हि पोषक असली पाहिजे, मातीचे आरोग्य हे चांगले असले पाहिजे. आता अनेक शेतकरी माती परीक्षण करतात, आणि त्यानुसार पिकांची लागवड करतात, तसेच ज्या पोषक घटकांची कमतरता आहे त्यांची पूर्तता करतात आणि चांगले विक्रमी उत्पादन प्राप्त करतात.

Updated on 16 December, 2021 12:57 PM IST

शेतीच्या क्षेत्रात सर्वात मोठा रोल असतो तो धरणी मातेचा, आपल्या काळ्या आईचा. शेतीतुन चांगले दर्जेदार उत्पादन प्राप्त करण्यासाठी माती हि पोषक असली पाहिजे, मातीचे आरोग्य हे चांगले असले पाहिजे. आता अनेक शेतकरी माती परीक्षण करतात, आणि त्यानुसार पिकांची लागवड करतात, तसेच ज्या पोषक घटकांची कमतरता आहे त्यांची पूर्तता करतात आणि चांगले विक्रमी उत्पादन प्राप्त करतात.

माती परीक्षणाचे एवढे महत्व असताना देखील अजूनही अनेक शेतकरी माती परीक्षण करण्याला कंटाळा करतात, आणि त्यामुळे उत्पादनात घट घडून येते, शिवाय लाखोंचा खर्च देखील अनेकदा वाया जातो. माती परीक्षणाचे हेच फायदे लक्षात घेऊन आज आपण माती परीक्षण कसे केले जाते, माती परीक्षण करताना कोणती काळजी घेतली पाहिजे तसेच माती परीक्षण का करावे ह्या प्रश्नाचे उत्तर जाणुन घेणार आहोत.

 

सर्व्यात आधी माती परीक्षणमुळे होणारा फायदा जाणुन घेऊ

»माती परीक्षण केल्यामुळे जमिनीत कोणत्या पोषक घटकांची कमतरता आहे हे समजते.

»आवश्यक ते पोषक घटक वाढवण्यासाठी योग्य ते नियोजन करता येते, परिणामी उत्पादन वाढते.

»खतांचा अपव्यय वापर टाळता येतो परिणामी लागवड खर्च कमी करता येतो.

»जमिनीत कोणते पीक योग्य ठरेलं हे समजते, त्यामुळे जमिनीच्या पोतनुसार पीकपद्धती ठरवता येते.

»एकंदरीत माती परीक्षणमुळे सुधारित पीक पद्धती ठरवता येते आणि यामुळे खर्चात बचत होते आणि उत्पादनवाढीसाठी मदत होते.

 

माती परीक्षण करताना घ्यावयाची काळजी

»माती परीक्षण करताना आधुनिक उपकरणांचा वापर करावा.

»माती परीक्षण हे ओलावा असताना करू नये, म्हणजे मातीचे नमुने हे जमिनीत ओलावा असताना घेऊ नये.

»मातीचे नमुने खत लावल्यानंतर लगेचच घेऊ नये, खत लावल्यानंतर चार महिन्यांनी नमुने घ्यावे.

»पीक लागवड करण्याआधी मातीचे नमुने घेण्याचा सल्ला दिला जातो.

»लागवड करण्याआधी माती परीक्षण केल्याने पोषक घटकांची माहिती समजते, त्यामुळे खतांची मात्रा ठरवण्यास मदत होते.

»मातीचा नमुना पूर्वमशागत करण्याच्या आधी घेणे सर्व्यात योग्य मानले जाते.

»मातीचा नमुना बांधवरून, खताच्या जागेवरून,विहिरीच्या ढीगवरून घेऊ नये.

»वेगवेगळ्या मातीचे नमुने एकत्रित करू नये.

झाडाखालून, पाण्याच्या जागेवरून नमुना घेणे टाळावे.

English Summary: soil testing is most important for make more crop yeild soil testing and some caring tips regarding that
Published on: 16 December 2021, 12:57 IST