Agripedia

विशिष्ट भाजीपाला पीक व त्यास योग्य जमिनीची निवड करतांना

Updated on 13 September, 2022 4:15 PM IST

विशिष्ट भाजीपाला पीक व त्यास योग्य जमिनीची निवड करतांना पिकांची फेरपालट हा मुद्दा गृहीत धरावा लागतो. वनस्पतिशास्त्रा विषयक साम्याच्या आधारे भाजीपाला पिकांची कुटुंबे (families) करण्यात येतात. पिकांची फेरपालट करताना ती माहिती उपयुक्त ठरते. कारण एकाच कुटुंबातील पिकांच्या अन्नद्रव्याच्या गरजा समानच असतात. तसेच त्या त्या कुटुंबातील पिकांवर येणारे रोग व किडीही समानच असतात. परिणामी या भाजीपाला कुटुंबाचा अभ्यास योग्य व परिणामकारक पीक फेरपालटीसाठी अत्यंत उपयुक्त ठरतो.

आपल्याकडील भाजीपाला पिकांचा समावेश खालील चार भाजीपाला कुटुंबामध्ये केला जातो. I) Crucifers or Brassicaceae (ब्रासीकाई )हे कोबी व मोहरीवर्गीय कुटुंब आहे. कोबी, मुळा, मोहरी, ब्रोकोली, फुलकोबी, ब्रुसेल्स स्प्राऊट्स, बॉक चॅाय , चायनीज कॅबेज इत्यादी पिकांचा समावेश होतो.

हे ही वाचा - कावळ्याच महत्व अधोरेखित करणारा लेख, अवश्य वाचा, शेवटच्या शब्दा पर्यंत

ही रब्बी हंगामातील पिके आहेत.II) Solanaceous (Solanaceae) सोलॅनेसी यामध्ये टोमॅटो, मिरची, ढोबळी मिरची, वांगी, पांढरा बटाटा, लाल बटाटा, तंबाखू, पिटयुनिया

इत्यादी पिकांचा समावेश होतो. एकाच ठिकाणी सोलॅनेसी पिकांची लागवड सतत केल्यास व्हर्टिसिलियम फ्युझेरियम यासारख्या बुरशी मातीत तयार होतात.III) Legumes (Leguminosae or Fabaceae) लेग्युमिनस सोयाबिन वाटाणा/मटार वर्गीय पिके इत्यादी पिकांचा समावेश होतो. पुढील पिकांकरिता मातीत नत्राचा साठा करणारी पिके म्हणून ही ओळखली जातात.IV) Cucurbits (Cucurbutaceae)कुकुरबिट्स् यामध्ये काकडी, स्क़्वॅश,भोपळा, कलिंगड, खरबूज, कारली, दोडका, दुधी यांचा समावेश होतो.

पिकांची निवड करताना या प्रमुख चार भाजीपाला कुटुंबांचा संदर्भ वापरावा लागतो. सलग, एकाच शेतात किंवा वावरात एकाच कुटुंबातील पिकांची लागवड टाळावी. चार वर्ष, चार भाजीपाला कुटुंबातील पिकांची फेरपालट खूप फायदेशीर ठरते. त्यामुळे पिकांकरिता जमिनीतील अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते तसेच रोग व किडींचे प्रमाणही खूपच कमी होते त्यामुळे उत्पादनात वाढ होतेच.ऊस, हळद, केळी यासारख्या पीकांनंतर भाजीपाला पिकांची लागवड ही विशेष फायद्याची ठरते तसेच भाजीपाला पीकांमुळे पुढील ऊस पीकांचे उत्पादनही लक्षणियरीत्या वाढते. 

पीक फेरपालटीचे फायदे - पीक फेरपालट ही एक प्राचीन कृषी पद्धती आहे. वर्षानुवर्षे प्रत्यक्ष अभ्यासाने यात बदल होत आलेले आहेत.1)जमिनीची सुपीकता वाढते २) पीकांचे उत्पादन वाढते३) मातीच्या पोषक तत्वांमध्ये वाढ होते४) रोग व कीडींना आळा बसतो5) मातीच्या संरचनेत सुधारणा होते.याप्रकारे पिकांचे नियोजन केल्यास, शेतीमधून नक्कीच जास्तीतजास्त उत्पन्न घेता येईल, पुढच्या भागात शेत जमिनीची मशागत यावर माहिती देण्यात येईल,फायद्याच्या शेतीचे ही सूत्रे शेतकरी बंधूंनी जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवावी.

English Summary: Soil preparation, crop rotation and its importance
Published on: 13 September 2022, 03:02 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)