पुन्हा एकदा शेती व माती या संदर्भात लेख आपल्या सेवेत.आपल्याला माहीती असेल माती ही जिवाणू आणि बुरशी यांची जननी आहे. व यांना जोडणारा एक जैविक घटक असतो आणि त्यांचा . जमिन सुपिकते साठी फार महत्वाचा आहे. उन्हाळयाच्या दाहक उष्णतेमध्ये जमिनीच्या वरच्या थरात असलेला हा सजिव घटक नेहमी सुत्पावस्थेत असतो मृगाच्या पहिल्या पावसाचे थेंब जमिनीवर पडताच ते सुत्पावस्थेत बाहेर पडून जमिन सुपिक करण्याच्या आपल्या कार्यास वेगाने सुरवात करतो.
आपल्याला उत्पन्न देणे हे एवढेच जमिनिचे कार्य नाही राव तर तुमच्याबरोबरच कोटयावधी जिवांचा तिला सांभाळ सुध्दा करावयाचा आहे
हे आपण विसरलो आहे.जमिन ही रसायनांमुळे प्रदुषित होउुन अन्न सुरक्षा आणि आरोग्याचा प्रश्न हा भविष्यात निर्माण होणारच आहे.
शेती मध्ये उत्पादन आपण घेत आहोत तिचा कस राखण्यात आपण कमी पडलो. आपल्याला रासायनिक खते व किटक नाशकांमुळे उत्पादनात वाढ झाली खरी पण नत्र, स्फुरद आणि पालाश युक्त खतांची जमिनीची गरज पूर्ण होऊ शकली नाही. ज्यामुळे जमिनीचा पोत टिकण्यास मदत होते ते सेंद्रिय पदार्थ जमीनीत टाकण्याचे प्रमाण कमी झाले. पर्यायाने जमिनीचे आरोग्य बिघडणेस मदत झाली. सुपीक असलेल्या जमिनी नापीक होत चालल्या.
खतांच्या असंतुलीत व बेसुमार वापरामुळे जमिनीत जैविक घटकांचा विनाश होऊन जमिनी मृतावस्थेत जात आहे.पीक उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. परिणामी शेतीबाबत म्हणजेच मातीच्या आरोग्याबाबत जनजागृती करणे महत्वाचे आहे.
विज्ञान व तंत्रज्ञानातून कितीही प्रगती साधली तरी एकदा नष्ट झालेली माती पुन्हा निर्माण करू शकत नाही हे वास्तव आहे.
आपल्या मुलभूत गरजा मातीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. आज च्या युगात मातीविना शेती यासारख्या विविध पद्धती जरी विकसित केल्या असेल तरीही जगाचे पोट भरण्याची ताकत या मध्ये नाहीआहे.
सुपीक जमिनीमध्ये निसर्गाची ही निरोगी अन्नसाखळी अखंडित चालू असते. मात्र जेव्हा रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा अमर्याद वापर होतो तेव्हा ही अन्नसाखळी तुटते आणि जमिनीमधील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी होऊ लागते. शेतजमिनीमधील सेंद्रिय कर्बाचे झपाटय़ाने कमी होत असलेले प्रमाण हा सध्या शेती साठी संवेदनशील विषय आहे. थोडं पण महत्वाचं आहे आजचा विषय
विचार बदला जिवन बदलेल
मिलिंद जि गोदे
Mission agriculture soil information
9423361185
Published on: 10 February 2022, 04:16 IST