पूर्वीच्या काळात शेती पद्धतीला नैसर्गिक मोकळीक वाव होती. पण आता सध्याच्या शेतीपद्धतीमुळे जमिनीचे भौतिक, जैविक गुणधर्म वापरा मुळे खूप जास्त बिघडले आहे. रासायनिक खताच्या कमी आणि जास्त वापरामुळे पिकांची अनैसर्गिक वाढ होताना दिसते. यामुळे रोग राई, किडीचे चे प्रमाण वाढताना जाणवते. नियंत्रण करण्यासाठी मग रासायनिक किटकनासकांचा व बुरशीनाशकांचा वापर खूप प्रमाणात होऊ लागला. या सर्व बाबींमुळे पिकाच्या रचनेत बदल होऊन अनेक समस्या निर्माण झाल्या. पिकाची खूप वाढ, पाने फुले कमी येणे, गळ होणे, फुले, फळे न येणे या समस्या निर्माण होऊ लागल्या. पुन्हा या समस्या सोडवण्यासाठी संजीवकाचा वापर होऊ लागला. पाणी व्यवस्थापन चूकिचे पद्धतीने होऊ लागले.
ज्या जमिनीमध्ये २५% हवा, २५% पाणी, २५% खनिज पदार्थ, ५% सेंद्रिय पदार्थ त्याच जमिनी पोथ व पिकाचे जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी योग्य आहे. परंतु, जास्तखत व पाणी व्यस्थापनामुळे जमिनीचा पोथ खराब झाली. सेंद्रिय खताचा कमी वापर आपण कमी प्रमणात करत असतो, आणि रासयनिक खताचा जास्त वापर झाल्यामुळे जिवाणूंची संख्या कमी होऊ व जमिनी नापीक होऊ लागल्या. जमिनीतील सेंद्रिय कर्ब, सेंद्रिय आम्ल कमी झाल्यामुळे जमिनीचा सामू बिघडत आहे.
पीक पोषणासाठी आवश्यक अन्नद्रव्यांचा पुरवठा करीत असताना दोन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यातील पहिली बाब म्हणजे पिकांचे संतुलित पोषण योग्य पद्धतीने हवे. दुसरी गोष्ट म्हणजे या आवश्यक अन्नद्रव्यांचा पुरवठा विविध स्रोत वापरून करणे महत्त्वाचे ठरते. अन्न द्रव्यांच्या उपलब्ध विविध घटकांचा कुशलतेने वापर करावा. या पद्धतीनुसार अन्न द्रव्यांचा पुरवठा केल्यामुळे पिकांना आवश्यक सर्वच म्हणजे मुख्य, दुय्यम व सूक्ष्म अशा सर्वच अन्न द्रव्यांचा संतुलित पुरवठा तर होतोच; परंतु त्यासोबतच जमिनीची सुपीकता वाढविण्यास आणि टिकवून ठेवण्यास देखील मदत होते.
अन्नद्रव्यांचा पुरवठा करण्यासाठी निरनिराळे स्रोत वापरण्याची गरज आहे. प्रामुख्याने शेणखत, कंपोस्ट, गांडूळखत, हिरवळीची खते, निंबोळी पेंड, मासळी खत, कोंबडी खत इत्यादी तसेच रासायनिक खते आणि पिकांचे अवशेष उदा. मूग, हरभरा, सोयाबीन यांचे कुटार, गव्हांडा इत्यादी सर्व अन्न द्रव्यांचे स्रोत यांचा अंतर्भाव करण्याची गरज आहे. फक्त रासायनिक खतेच वापरल्यास जमिनीचे आरोग्य चांगले राहत नाही, तसेच सेंद्रिय खतांमधून आवश्यक तेवढ्या प्रमाणात अन्नद्रव्यांचा पुरवठा होऊ शकत नाही. परिणामी या दोन्ही संसाधनांचा एकमेकास पूरक असा एकात्मिक वापर फायद्याचा आढळून आला आहे. दीर्घ काळखत प्रयोगावरून ही गोष्ट दिसतआहे.
एकात्मिक अन्नद्रव्ये पद्धतीचा वापर .
१) या पद्धतीमध्ये निरनिराळ्या निविष्ठांचा वेगवेगळ्या पिकांना,विविध अवस्थांमध्ये अन्नद्रव्यांचा पुरवठा करतानाअचूक, आणि काटेकोर पद्धतीने वापर करीत असताना माती आणि पाणी परीक्षण तंत्रज्ञानाचा वापर करणे खूप महत्त्वाचे आहे. उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण, कमतरता असलेली अन्नद्रव्ये इत्यादींचे योग्य निदान करूनच खतांचा वापर फायदेशीर ठरतो.
२) ठिबक सिंचनाच्या माध्यमातून विद्राव्य स्वरूपाची खते पिकाच्या गरजेनुसार दिल्यामुळे अन्नद्रव्यांची कार्यक्षमता खूप मोठ्या पटीने वाढविता येते. खताचा योग्य प्रकार, गरजेनुसार मात्रा, वापरण्याची योग्य पद्धत, ठिकाण आणि योग्य वेळ इत्यादी बाबींचे काटेकोर पालन करून अन्न द्रव्यांचा पुरवठा शाश्वत शेतीसाठी गरजेचा आहे.
३) जमिनीची सुपीकता वाढविण्याच्या दृष्टीने एकात्मिक अन्नद्रव्ये पद्धतीस फार महत्त्व आहे. सध्या रासायनिक खतांच्या अयोग्य आणि जास्त वापरामुळे आणि सेंद्रिय खतांच्या अभावामुळे जमिनीच्या सुपीकतेत मोठी घट येऊन अन्नद्रव्यांच्या प्रमाण कमी कमी होत आहे .
संतुलित पोषण महत्त्वाचे –
१) सेंद्रिय आणि असेंद्रिय निविष्ठांचा वापर जैविक खतांसोबत करून पीक उत्पादनामध्ये निश्चितपणे वाढ होते,उत्पादनाची प्रतही सुधारते. हळूहळू जमिनीची सुपीकता वाढते आणि रासायनिक खतांवरील निर्भरता काही प्रमाणात कमी होते.
२) शेतावरच उपलब्ध काडीकचरा, कुटार इत्यादी घटकांचा वापर केल्याने एकूण खतांवरील खर्चात बचत करता येते.
३) सेंद्रिय खते वापरल्यामुळे दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकास मिळून पिकांचे संतुलित पोषण होते आणि उत्पादनाची गुणवत्ता वाढते. एक टन शेणखत जमिनीत मिसळल्यास सहा ते सात किलो नत्र, तीन ते चार किलो स्फुरद व सात-आठ किलो पालाश जमिनीला मिळतो. या सोबतच एक किलो गंधक, २५० ग्रॅम मँगेनिज, १०० ग्रॅम जस्त, ७५ ग्रॅम लोह, २५ ग्रॅम बोरॉन आणि दोन ग्रॅम मॉलिब्डेनम इतकी अन्नद्रव्ये जमिनीला मिळतात.
४) शेणखताचा नेहमीवापर केल्यास सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता जमिनीत जाणवत नाहीत. याशिवाय मोठ्या प्रमाणात जमिनीला सेंद्रिय पदार्थ मिळतो आणि जमीन आरोग्य उंचावते.
सुपीकता निर्देशांक कमी होण्याची कारणे.
जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी कमीहोत आहे.
जमिनीतील सामु मध्यम ते जास्त विम्लतेकडे वाढत चालला आहे.सखोल पिक पद्धतींचा वापर.असमतोल अन्नद्रव्यांचा वापर.अमर्याद सिंचनाचा वापर .रासायनिक खते देण्याची चुकीची पद्धत, वेळ.जमिनीचे बिघडत चाललेले भौतिक गुणधर्म आणि कमी होत चाललेली सूक्ष्मजिवाणुची संख्या.
लेख संकलित आहे.
Published on: 02 May 2022, 10:48 IST