अगदी ढोबळमानाने विचार केल्यास मातीमध्ये २५% हवा , २५ % पाणी , ४५ % खनिजे आणि ५% सेद्रिय कर्ब असल्यास अशी माती शेतीसाठी सर्वात चांगली मानता येईल. साधारणता सध्याच्या घडीला माती परीक्षांणानुसार १ % सेद्रिय कर्ब असल्यास अत्यंत जास्त असा शेरा मिळतो. म्हणजेच ५ % सेद्रिय कर्ब ही सध्या जवळपास कोणत्याच शेतकऱ्यांच्या आवाक्यातली गोष्टं दिसत नाही. कसा कुस्ती लढणार सेद्रिय शेतीचा पहेलवान ?सेद्रिय कर्बचे कार्य – एक महत्वाची बाब म्हणचे , पिके (झाडे) सेद्रिय कर्बचा उपयोग अनद्राव्य म्हणून करतच नाहीत. तर सेद्रिय कर्ब हे मुख्यत्वे मातीतील जिवाणूंचे खाद्य आहे. म्हणजेच जीवाणू सेद्रिय कर्ब खाऊन , मातीतील अनद्रव्य झाडांना उपलब्ध करून देतात. उदारणार्थ शेण खतातील नत्र अमोनिया (NH3) ह्या स्वरुपात असून Nitrobactor कुळातील बाक्टेरिया त्याचे रुपांतर Nitrate किवा Nitrite (NO३ / NO२) मध्ये करून पिकांना पचनीय स्वरुपात आणून देतात.
इतर सर्व अन्नद्रव्यच्या उपलब्धते साठी झाडे जमिनीतील सुक्ष्म-जीवनवरच अवलंबून असतात. सेंद्रिय कर्ब मातीचे भौतिक गुणधर्म जसे कि मातीची पाणी धारण क्षमता, भुसभुशीतपणा इ. सेंद्रिय कर्ब च्या उपलब्धते प्रमाणे बदलते. साधारणता असे मानले जाते कि २ ते ५ % पर्यंत सेंद्रिय कर्ब असणाऱ्या (जंगलातील चहाच्या पुडी सारखी माती ) १ चमचाभर मातीमध्ये पृथ्वीवरील लोकसंख्ये पेक्षा जास्त जीवाणू असू शकतात.सेंद्रिय कर्ब कमी होण्याची मुख्य कारणे – सध्या आपल्या मातीमध्ये सेंद्रिय कर्ब इतक्या मोठ्या प्रमाणावर कमी (०.१ ते १ %) असण्याचे मुख्य करण – व्यावहारिक शेतीमध्ये रासायनिक खतांचा अतिरेकी वापर , जमिनीत कुजणाऱ्या गोष्टींचे कमी होणारे प्रमाण , पिक पलटणी न करणे , मातीची मशागत मोठ्या प्रमाणावर करणे आणि जमिनीला विश्रांती न देणे ही दिसतात.
नैसर्गिक शेती मध्ये जिथे जमिनीची मशागत कमीत कमी केली जाते अशा ठिकाणी सेंद्रिय कर्बाचे प्रमाण जास्त आढळून येते. पण व्यवहारिक दृष्टिकोनातून बघताना जमिनीची मशागत न करणे हा पर्याय तरी आता शक्य दिसत नाही.कोकणात जिथे पावसाचे आणि हवेतील आर्द्रतेचे प्रमाण जास्त आहे तेथे एखादी गोष्ट कुजून त्याचे रूपांतर सेंद्रिय कार्बा मध्ये लवकर होईल ह्याविरुद्ध विदर्भ किंवा मराठवाड्यामध्ये मातीतील ओलावा कमी असल्यामुळे एखादी गोष्ट कुजण्यासाठी जास्त वेळ लागेल. मातीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवण्यासाठी हवामानानुसार काही गोष्टींचा अभ्यास करून शेतीतील आंतरमशागती किंवा शेती करण्याच्या पद्धतीत सुधारणा कराव्या लागतील विद्राव्य खतांची वैशिष्ट्ये : पिकांना ठिबक सिंचनमधून व फवारणीद्वारा दिली जाणारी विद्राव्य खते कशी असावीत त्यांची वैशिष्टे पुढीलप्रमाणे आहेत.
१ पाण्यात पूर्णतः विरघळणारी खते (विद्राव्य) – ही खते एक – दोन किंवा तीन (बहू) पोषक अन्द्राव्याचे असलेले असून ती पाण्यात टाकली असता ताबडतोब विरघळतात. हे बहुमुल्य अन्द्राव्याचे द्रावण सिंचनाच्या पाण्यासोबत देणाऱ्या क्रियेलाच फर्टीगेशन असे संबोधिले जाते.२ विद्राव्य खतांचा वापर- ठराविक सिंचन पद्धतीतून (ठिबक अथवा सूक्ष्म तुषार) नगदी पिकाच्या उत्पादनासाठी शेतात व तसेच संरक्षित वातावरण निर्माण करता येईल अशा ग्रीन हाउस, शेड नेट मध्ये वाढविल्या जाणाऱ्या पिकांसाठी केला जातो. ही खते फुलशेती भाजीपाला, फळबाग, बागेतील / घरात येणाऱ्या कुंड्यातील सुशोभीत झाडांकारीता वापरता येतात३ ठिबक सिंचामध्ये : पिकांची मुळे ठराविक क्षेत्राममध्येच वाढतात. या करिता तेथील माती परीक्षण वरचेवर करणे आवश्यक आहे . त्या माध्यमात पिकांच्या वाडीबरोबरच पोषक द्रव्य्रांचे प्रमाण सतत घटक असल्या कारणाने त्यांचा ठिबक सिचनातून ठराविक प्रमाणात नेहमी खते योग्य राहील.
४ खतांचे प्रामाण : जास्त झाल्यास व पाण्याचा पुरवठा मर्यादित असल्यास खतांचा क्षारभार जमिनीत वाढेल व त्यामुळे झाडांतील अन्नरस उलट प्रवाही होऊन अति क्षारामुळे जमिनीत शोषला जाईल व झाडाची वाढ खुंटून ती मरू शकतात.५ विद्र्व्य खतांची तीव्रता : ठिबक सिंचनातून खते देतांना खतांचा क्षारभार (सोल्ठ इंडेक्स) किती आहे याचा विचार करणे गरजेचे आहे. जर सर्वच खते अति क्षाराची दिली तर झाडांना ती खते शोषून घेण्याकरिता लागणारा दाब (Osmotic Pressure, Turgure pressure) पुरेसा नसेल तर झाडांना मुळाकडे आधिक उर्जा द्यावी लागेल आणि त्यामुळे फुलधारणा, होणेस विलंब होतो.साहजिकच त्यामुळे फळाच्या काढणीस विलंब होतो बहार अकाली पुढे जातो त्या खतांची तीव्रता (Concentration) अति प्रमाणात असल्यास झाडांची मर होण्यांची शक्यता आहे विद्राव्य खतांचा क्षारभार ४० ते ५० दरम्यान ठेवला तर ती सर्व पोषकद्रव्ये मुळाच्या केशतंतू विनासायास पिकांना पूर्णत: उपलब्ध होतात.
Published on: 19 July 2022, 05:00 IST