Agripedia

आपन शेतीच्या दृष्टीने विचार केला असता आपल्या मातीचा वरचा फक्त चार इंचाचा थर शेतीसाठी उपयुक्त असतो.

Updated on 07 January, 2022 4:31 PM IST

आपन शेतीच्या दृष्टीने विचार केला असता आपल्या मातीचा वरचा फक्त चार इंचाचा थर शेतीसाठी उपयुक्त असतो. त्याला इंग्रजीत टॉप सॉईल असे म्हणतात. कारण याच थरामध्ये पिकांच्या वाढीसाठी लागणारी सर्व पोषकद्रव्ये सामावलेली असतात. जर मातीच्या संवर्धनाच्या उपाययोजना केल्या नाहीत तर पाण्यासोबत ते पोषकद्रव्ये सुद्धा वाहून जातात. परिणामी जमीनीची सुपिकता कमी होते. पिकांची उत्पादकता घटते आणि शेतकर्यााला रासायनिक खते आदी बाह्य साधनांचा आधार घ्यावा लागतो.

 काही ठिकाणी मातीचा थर हा मर्यादीत असतो, अशा ठिकाणी होणारी धूपेमुळे हळूहळू संपूर्ण मातीचा थरच वाहून जातो अशा ठिकाणी भविष्यात पुन्हा शेती करणेच अशक्यप्राय होऊन बसते.

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मृदा संधारणेची कामे केलेली नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात गाळ प्रवाहासोबत वाहून आणला जातो आणि धरणात येऊन साठतो. गेल्या काही वर्षात अशा प्रकारे हजारों टन गाळधरणात झालेले आहे. परिणामी धरणाची पाणी साठवणुकीची क्षमता मोठ्या प्रमाणात घटलेली आहे. याचे गंभीर परिणाम आपल्याला नजीकच्या काळात भोगावे लागणार आहेत. यामुळे माती संधारण गरजेचे बनले आहे.

आपण मातीचा प्रकार, तिचा कसदारपणा, तिची सुपीकता या सर्वाबद्दल माहिती करून घेतली तर आपण त्या मातीचा उत्तम उपयोग करून घेऊ शकू. वेगवेगळया प्रकारची माती वेगवेगळया पिकांकरिता योग्य व चांगली असते हे सर्व जर आपण जाणून घेतले तर आपल्या शेतीकरता ते अनेक मार्गानी उपयुक्त ठरेल.

वनस्पती व पिकांची चांगली वाढ होण्याकरिता उत्तम जमीन लागते हे सर्वाना माहीतच आहे. पिकांची उत्तम मशागत, उत्तम खते, चांगले बियाणे बी पेरण्याची पद्धत इत्यादी बरोबर तिथल्या मातीचेही चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे. आता ही माती म्हणजे काय त्याची थोडक्यात माहिती घेऊ या.

मातीच्या पातळ थरात पृथ्वी आच्छादलेली आहे. माती निर्माण होण्याची निसर्गातली प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची व शतकानुशतके चाललेली असते. पाऊस, थंडीवारा यांच्या मा-याने खडक झिजून झिजून शेवटी त्यांचे मातीमध्ये किंवा जमिनीत रूपांतर होते. जमीन वाढणा-या झाडांना आधार देते. त्यांना पोषक अन्नद्रव्य पुरवत जमिनीत सूक्ष्म जीवजंतू राहतात.

ज्यायोगे मातीमध्ये हवा व पाणी खेळते राहण्यास मदत होते. मातीचे चार प्रमुख घटक आहेत. खनिज द्रव्य सेंद्रिय द्रव्ये जल व वायू वनस्पतींची उत्तम वाढ होण्याकरिता हे चारही घटक ठरावीक प्रमाणात असावेत. त्याचबरोबर यात कीटकांची टरफले प्राणिमात्रांचे अवशेष हेही मिसळून राहतात.

मातीच्या निर्मितीला निर्जीव खडक व अनेक सजीव कारणीभूत आहेत. वनस्पती व प्राणी मेले की कुजतात व त्यांचा अंशसुद्धा मातीत मिसळतो. साधारणत: २.५ सें.मी. मातीचा थर तयार होण्यासाठी ६५० वर्षे लागतात.

पृथ्वीवरील जमीन आहे तेवढीच राहणार तिच्यात वाढ होणार नाही म्हणून उपलब्ध असलेली अनमोल जमीन जपून व काळजीनेच वापरली पाहिजे.

जमिनीबरोबरच मातीही अनमोल आहे. शेतीमध्ये जमिनीतली माती कोणत्या प्रकारची आहे. यााला खूप महत्त्व आहे. जमीन चांगली असेल तर उत्पन्न चांगले मिळेल. वेगवेगळया प्रदेशानुसार मातीचा रंग वेगवेगळा असतो. आज जमिनीतून जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी शेतकरी विविध मार्गाचा अवलंब करतात, पण नंतर जमिनीची जोपासना करत नाहीत.

मातीमध्ये वेगवेगळया प्रकारचे जीवजंतू, गांडूळ, साप इतर काही सजीव वास्तव्य करतात. त्या-त्या प्रदेशाच्या भूभागानुसार व हवामानानुसार फळपिके आणि इतर पिके घेतली जातात व शेती केली जाते. निसर्गत: जमिनीत झाडे, गवत उगवत असतात.

पूर्वी शेतकरी शेतातल्या मातीचा कस वाढावा म्हणून झाडाचा पाला, शेतातला टाकाऊ कचरा, माशांची कुट्टी, राख, कोळसा, शेण, कोंबडीची विष्टा, शेळी-मेंढीच्या लेंडया टाकत असत व सुपीकता वाढवत असत. परंतु आज शेतकरी शेतीमध्ये मोठया प्रमाणात रासायनिक खतांचा व फवारण्याचा वापर करतात. त्यामुळे उत्पन्न ठरावीक मर्यादेपर्यंत वाढते, पण नंतर मात्र जमीन नापीक व्हायला सुरुवात होते व उत्पन्नात घट होते.

शेतकरी वेगवेगळया रासायनिक खतांचा वापर करून जमीन बनवत आहे. परंतु या जमिनी खरोखरच सुपीक आहेत? याचा विचार करणे गरजेचे आहे. कारण सर्वच उत्पादन क्षम जमिनी सुपीक नसतात.जमिनीची सुपीकता वाढवणे आणि टिकवणे या गोष्टी शाश्वत शेती उत्पादनासाठी फार महत्त्वाच्या आहेत. दरवर्षी शेतातल्या जमिनीतली माती पावसाच्या पाण्याने वाहून जाते. त्यासाठी काही तरी नियोजन करायला हवे. माती वाहून जाऊ म्हणून बांधबंदिस्ती करायला हवी हे सर्व जण करत नाहीत.

 

मिलिंद जि गोदे

विचारांची दीशा बदला जिवनाची दशा आपोआप बदलेल

कृषी विकास व तंत्रज्ञान समुह

English Summary: Soil conservation needs form Farmer
Published on: 07 January 2022, 04:31 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)