सुक्ष्मजीवांच्या द्वारा स्रवल्या जाणा-या आम्लांचा समावेश हा (ऑरगॅनिक केमिस्ट्रि) सेंद्रिय-रसायनशास्रात होतो. सुक्ष्मजीवांच्या व्दारा स्रवल्या गेलेल्या आम्लांत कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन ह्या तिघांचा समावेश असल्याने ते सेंद्रिय आम्ल म्हणुन ओळखले जातात. ज्यावेळेस जमिनीत हे अॅसिड सूक्ष्मजीवांद्वारा स्रवले जातात, त्यावेळेस जीवाच्या सभोवतली असलेल्या पाण्यात हे अॅसिड विरघळतात, मात्र त्यातील पुर्ण हायड्रोजन हा आयन स्वरुपात नसल्याने त्यातील काही भाग हा पाण्यात मुक्त अशा हायड्रोजन आयन (५ ते १० टके हायड्रोजन केवळ मोकळा होतो) च्या स्वरुपात जावुन सामु कमी करतो. सामु कमी झाल्याने, जमिनीत स्थिर झालेल्या तसेच मातीच्या कणांत असलेल्या अन्नघटकांना मोकळे पिकास उपलब्ध होतील अशा
करुन स्वरुपात रुपांतरीत करण्याचे कार्य सहज रित्या मात्र सावकाश होते. हिच क्रिया रसायनांद्वारे वेगात होते, मात्र, उपलब्ध स्वरुपात रुपांतरीत झालेले घटक पुन्हा नविन घटकांच्या निर्मितीसाठी सज्ज होतात.
सेंद्रिय आम्ल त्यांच्या संपर्कात येणाऱ्या धनभार असलेल्या घटकांचे चिलेशन करुन त्यांना ईतर कोणत्याही घटकासोबत नव्याने अभिक्रिया करुन एखादा विकास उपलब्ध होणार नाही असा नविन पदार्थ तयार करण्यापासुन थांबवुन ठेवतात.
आपण ग्लुकोनेट खते सध्या वापरतो, ती देखिल सेंद्रिय आम्लांसोतच चिलेट - केली असल्याने ग्लुकोनेट म्हणतात. शिवाय ई डि टि ए हा देखिल सेंद्रिय आम्लाचाच एक प्रकार आहे. ग्लुकोनेट, ई डि टि ए आणि सायट्रिक अॅसिड हे शब्द आपण सगळ्यांनी कुठेतरी ऐकलेले आहेत, म्हणुन त्यांचा येथे उदाहरण समजण्यास सोपे जावे म्हणुन उल्लेख केलेला आहे.
सेंद्रिय आम्ले जी सुक्ष्मजीवांच्या व्दारा स्रवली जातात, ती चिलेशन, विरघळवणे आणि सामु कमी करणे ह्या क्रियांच्या व्दारा मातीत असलेल्या खतांचे, आणि त्यांच्या स्थिर स्वरुपाचे रुपांतर पिकास उपलब्ध होईल अशा स्वरुपात करतात.
ह्यांची कार्य करण्याची पध्दत ही सावकाश आणि कमी तिव्रतेची असल्या कारणाने
आणि जमिनीत वारंवार वरुन खतांचा वापर सतत होत असल्या कारणाने हि अशी जैविक उत्पादने देखिल कदाचित वारंवार वापरत राहवीच लागणार आहेत. फरक ईतका नक्की पडु शकतो की पुर्वी जे दर ३० दिवसांनी वापरावे लागणार होते ते कदाचीत ६० दिवसांनी वापरावे लागेल.
संकलन - विजय भुतेकर, चिखली
Published on: 18 December 2021, 05:49 IST