तूर हे एक प्रमुख कडधान्य पीक आहे. तुरीची लागवड महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते. बरेच शेतकरी तुरीची लागवड अजूनही परंपरागत पद्धतीने करतात.
परंतु जर ठिबक सिंचन चा वापर करून योग्य खत व्यवस्थापन आणि तुरी पिकासाठी लागणाऱ्या अजून इतर काही व्यवस्थापनातील महत्त्वाच्या गोष्टी जर काटेकोरपणे पाळल्या तर तुरीचे हेक्टरी 40 क्विंटल उत्पादन शक्य आहे. जर महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर बारा लाख हेक्टर क्षेत्र हे तुरी खाली आहे. हेक्टरी तुरीची उत्पादकता 937 किलो आहे. कोरडवाहू क्षेत्रांमध्ये देखील तुरीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. तसेच पाण्यासाठी हे पीक अतिसंवेदनशील आहे. त्यामुळे जमिनीतील ओल कमी झाली तसेच जेव्हा तुर पिकाला फुले लागण्याचा कालावधी असतो तेव्हा जर पाण्याचा ताण बसला तर पिकात मोठ्या प्रमाणात फुलगळ होते. हा अनुभव प्रत्येक शेतकऱ्याला येतोच. त्यामुळे पाणी व्यवस्थापन करणे फार महत्वाचे आहे. तूरीला गरजेनुसार आणि पीक वाढीच्या कालावधीमध्ये पाणी व्यवस्थापन काटेकोर करणे गरजेचे आहे.
तूर पिकाचे काटेकोर व्यवस्थापनात ठिबक सिंचनाचे भुमिका
प्रामुख्याने ठिबक सिंचनाचा वापर हा तूर पिकासाठी खूपच फायद्याचा ठरू शकतो. कारण जर ठिबकचा वापर केला तर तूर पिकासाठी विद्राव्य खतांचा वापर करता येतो. पारंपरिक पद्धतीमध्ये बरेच शेतकरी रासायनिक खते फोकून देतात. त्यामुळे रासायनिक खतांची नासाडी तर होतेच परंतु पिकांना लागणारे आवश्यक घटक मिळत नसल्याने त्याचा उत्पादनावर परिणाम होतो. त्यामुळे ठिबक सिंचनाचा वापर केला तर रासायनिक खतांचे पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार व पिकांच्या गरजेनुसार व्यवस्थित व्यवस्थापन करता येते. विद्राव्य खतांचा वापर केला तर ठिबक द्वारे विद्राव्य खते दिल्यास खतांची कार्यक्षमता पंच्याण्णव टक्के वाढते.
एवढेच नाही तर 25 टक्क्यांपर्यंत विद्राव्य खतांच्या वापरात बचत देखील होऊ शकते. ठिबकचा वापर केला तर विद्राव्य खतांचा मात्रा ठिबक द्वारे विभागून देता येतात, त्याचा परिणाम हा पिकांच्या उत्पादन वाढीवर होतो.
तुरीच्या अधिक उत्पादन व खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी ठिबकद्वारे काही शिफारसी
तुरीचे अधिक उत्पादन मिळविण्यासाठी व रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढावी यासाठी ठिबक सिंचनाद्वारे काही शिफारसी करण्यात आल्या आहेत यामध्ये शिफारशीच्या एकशे पंचवीस टक्के नत्र (31.25 किलो / हेक्टरी ), 100% स्फुरद ( 50 किलो / हेक्टरी फास्फोरिक आम्लाच्या माध्यमातून ) आणि 100 टक्के पालाश ( 30 किलो / हेक्टरी ) पाच वेळा विभागून देण्याची शिफारस करण्यात आली आहे.
रासायनिक खतांच्या मात्रा व द्यायचा कालावधी
शिफारसी नुसार खतमात्रा देतांना 10% शिफारशीत नत्र, स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळी द्यावे. 20 टक्के शिफारशीत नत्र, स्फूरद, पालाश पेरणीनंतर 60 दिवसांनी द्यावे.
तर 25 टक्के शिफारशीत नत्र, स्फुरद, पालाश पेरणीच्या 80 द्यावे व 25% शिफारशीत नत्र, स्फुरद, पालाश पेरणीनंतर शंभर दिवसांनी द्यावे.
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:पाणी प्या परंतु बसूनच! यामुळे होतात आरोग्याला खूपच काही फायदे, वाचा आणि घ्या जाणून
नक्की वाचा:कांद्याने केला वांदा! कपाशी उपटून लावला कांदा अन आता म्हणतोय कांदा नको रे बाबा
Published on: 25 April 2022, 09:08 IST