Agripedia

वर्षभर सातत्याने दर्जेदार आणि अधिक उत्पादन मिळविण्यासाठी हरितगृहामध्ये भाजीपाला पिके घेतली जातात. महाराष्ट्रामध्ये हरितगृहातील भाजीपाल्यामध्ये रंगीत ढोबळी मिरची लागवडीचे प्रमाण सर्वाधिकआहे.

Updated on 06 May, 2022 9:24 AM IST

वर्षभर सातत्याने दर्जेदार आणि अधिक उत्पादन मिळविण्यासाठी हरितगृहामध्ये भाजीपाला पिके घेतली जातात. महाराष्ट्रामध्ये हरितगृहातील भाजीपाल्यामध्ये रंगीत ढोबळी मिरची लागवडीचे प्रमाण सर्वाधिकआहे.

1) आवश्यक वातावरण :- रंगीत ढोबळी मिरची लागवडीस हरितगृहामधील तापमान किमान 18 अंश सेल्सिअस व कमाल 35 अंश सेल्सिअस व आवश्यक असते. या पिकासाठी योग्य सापेक्ष आद्रता 50 ते 75 टक्‍क्‍यांपर्यंत असली पाहिजे हे प्रमाण हरितगृहामध्ये नियंत्रित करता येते. पर्यायाने हरितगृहामध्ये उत्पादन घेतलेल्या मिरचीचा दर्जा चांगला येतो.

2) जमीन :- जमीन चांगली कसदार व सुपीक लागते पाण्याचा चांगला निचरा होणारी सामू सहा ते सात साधारणपणे जमिनीची खोली एक - दीड मीटर असावी. म्हणून मध्यम ते भारी काळी या जमिनी या पिकास उत्तम मानवतात.तसेच पोयट्याच्या सुपीक जमिनी सुद्धा चालू शकता.

3) ढोबळी मिरचीच्या जाती :- हरितगृहामध्ये लाल पिवळ्या आणि नेहमीच्या हिरव्या ढोबळी मिरची यांची लागवड केली जाते. आपले गाव शहराच्या जवळ असल्यास लाल आणि पिवळ्या रंगाच्या ढोबळी मिरचीला अधिक उठाव मिळू शकतो, कारण या मिरच्यांची चव काहीशी गोडसर असल्याने त्यांचा वापर आपल्याकडे भाजी म्हणून होत नाही. पंचतारांकित हॉटेल आणि मोठ्या शहरांमध्ये मात्र रंगीत ढोबळी मिरची यांची मागणी अधिक असल्याचे दिसून आले आहे, त्यासाठी अधिक दर उपलब्ध होतो. शहरांमध्ये काढणीनंतर आपला माल पाठविणे सोयीचे नसल्यास नेहमीच्या हिरव्या ढोबळी मिरचीचा पर्याय शेतकऱ्यांनी निवडावा. दर्जेदार उत्पादनामुळे या मिरच्यांना स्थानिक बाजारपेठेत चांगला दर मिळू शकतो. आपल्या परिसराचे नुसार आणि बाजारपेठेतील स्वतःच्या अभ्यासानुसार मिरचीची जात निवडावी.

4) रोपे तयार करणे :-

1)रोपे तयार करण्यासाठी निवडलेली जागा चांगली स्वच्छ करावी. त्याच प्रमाणे जमीन चांगली नांगरून कुळवून भुसभुशीत करावी. तीन मीटर लांब, एक मीटर रुंद आणि 15 सें.मी. उंचीचे गादीवाफे तयार करावेत. गादीवाफ्यावर चांगले कुजलेले शेणखत पसरावे व मातीत मिसळावे.

2) वाफ्यावर दोन सें.मी. खोलीच्या दहा सें.मी. अंतरावर रुंदीला समांतर रेघा ओढून घ्याव्यात. त्यात प्रथम फोरेट (10 जी) हे कीटक नाशक दहा ग्रॅम प्रत्येक वाफ्यावर टाकून नंतर बी पेरणी करावी.

3) प्रति वाफा दहा ग्रॅम बियाणे वापरावे. एक हेक्टर ढोबळी मिरची लागवडीसाठीसुमारे 400 ते 500 ग्रॅम बियाण्याची गरज असते जातीनुसार बियाण्याची गरज बदलू शकते.

4)  सहा ते आठ आठवड्यांची झाल्यावर ती पुनर्लागवडीसाठी तयार होतात.

5) लागवडीच्या वेळी रोपे खालीलप्रमाणे असावेत :

1)रोपांचे वय चार ते पाच आठवड्यांचे असावे.

2) रोपांची उंची 16 ते 20 सें.मी. असावी.

3) रोपावरती चार ते सहा पाने असावीत.

6) लागवड:

1) रंगीत ढोबळी मिरचीच्या लागवडीसाठी गादीवाफ्याचा वापर करावा.

2) गादीवाफा 90×40×50 सें.मी.आकाराचा असावा. या वाक्यावर दोन ओळीत झिगझॅग पद्धतीने लागवड करावी.

7) लागवडीचे अंतर:

1) दोन रोपांतील अंतर - 45 सें.मी.

2) दोन ओळीतील अंतर -50 सें.मी.

3) रोपांची घनता - 2.5 रोपे प्रति चौ.मी.

8) मशागतीच्या पद्धती :- रंगीत ढोबळी मिरचीचे पीक हे दहा महिन्यांचे आहे. या कालावधीमध्ये विविध मशागतीच्या पद्धतींचा अवलंब केला जातो. त्यातील महत्वाच्या  बाबींविषयी जाणून घेऊ.

1) झाडाला आधार देणे : मिरची पिकाची उंची दहा फुटांपर्यंत जाते हे पीक आपले आणि फळांचे वजन पेलू शकत नाही त्यामुळे झाडाला आधार देणे गरजेचे असते.

2) एका गादीवाफ्यावर साधारणपणे तीन मीटर उंचीवर 3 गॅल्व्हनाईज्ड आर्यनच्या तारा (12 गेज जाडीच्या) वाफ्याला समांतरपणे बांधून घ्याव्यात. तारा बांधल्या नंतर लागवड करावी.

3) लागवड झाल्यानंतर लवकरात लवकर एका झाडासाठी चार या संख्येत प्लास्टिक दोऱ्या तारेला बांधून खाली सोडाव्यात. नंतर त्या झाडाला बांधाव्यात.

9) रोपांचा शेंडा खुडणे :- लागवडीनंतर 21 दिवसांनी रोपांचा शेंडा खुडावा. खुडण्यासाठी धारदार कात्री चा वापर करावा रोपावरती 4 - 5 पाने ठेवून शेंडा खुडला जातो. त्यामुळे मिरचीला तीन ते चार फुटवे फुटतात. त्यांना आधारासाठी सोडलेल्या दोऱ्या बांधून घ्याव्यात.

10) काढणी :- मिरचीची काढणे प्रामुख्याने जातीवर रंगानुसार वेगवेगळ्या वेळी सुरू होते. हा कालावधी 90 ते 100 दिवस असा असतो. काढणी करताना दूरच्या बाजारपेठेत पाठवितांना मिरचीला 5% रंग आल्यानंतर काढणी करावी. तर जवळच्या बाजारपेठेसाठी रंग येण्याचे प्रमाण थोडे अधिक असले तरी चालू शकते.

11) उत्पादन :- मिरचीचे उत्पादन जातीपरत्वे वेगवेगळे दिसून येते जुन्या किंवा पारंपारिक जातींमध्ये आठ कि.ग्रॅ.प्रति चौ.मी. आणि आयात केलेल्या काही जातीपासून 14 ते 18 कि.ग्रॅ. प्रति चौ.मी. उत्पादन मिळते.

12) प्रतवारी:- मिरचीच्या काढणीनंतर फळांचा आकार व वजनानुसार प्रतवारी करावी.

13) साधारणत: अ दर्जा - 200 ते 250 ग्रॅम, ब दर्जा - 150 ते 119 ग्रॅम, क दर्जा -150 ग्रॅम पेक्षा कमी वजनाच्या मिरच्या अशा तीन प्रतीनुसार वर्गीकरण केले जाते.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:डॉ. अतुल पी.फुसे( कृषी विशेषज्ञ) यांचे अनमोल मार्गदर्शन! संत्रा फळझाडांची उन्हाळ्यातील उपाययोजना

नक्की वाचा:तंत्र वापरा परंतु माहिती घेऊन! वडाच्या झाडाखालील माती आणि हरभरा डाळीच्या पिठाचे जीवामृतमधील महत्व

नक्की वाचा:शेवगा लागवड एक उत्तम पर्याय! योग्य व्यवस्थापन करा अन 6 ते 7 महिन्यात कमवा बक्कळ नफा

English Summary: smart and perfect planning in polyhouse of chilli crop give more production and income
Published on: 06 May 2022, 09:24 IST