Agripedia

सध्या कोणत्याही पिकाला स्लरी हि नवीन पद्धत खूप फायदेशीर ठरत आहे, परंतु याचा वापर शेतकरी अजूनही पाहिजे तितका करत नाही, कारण ती दुकानात मिळत नाही ती स्वतः घरी बनवावी लागते.

Updated on 20 May, 2022 10:52 AM IST

स्लरी शेतात वापरल्याने जमिनीमधील सूक्ष्म जिवाणू कार्यरत होतात कारण त्यांना ऊर्जा मिळते व त्या जिवाणूंमुळे जमिनीमधील अन्नद्रव्य पिकास उपलब्ध होतात. उदा. जर आपण जमिनीमध्ये यूरिया टाकला तर तो अमोनिकल स्वरूपात असतो व तो पीक घेऊ शकत नाही त्या अमोनिकल स्वरूपाचे रूपांतर nitrite मध्ये करण्याचे काम Nitrosomonas बॅक्टेरिया व nitrite चे रूपांतर nitrat मदे nitrobactor करत असतात व nitrat स्वरूपातील नत्र पीक घेत असते, म्हणून असे जीवाणू उतेजित करण्याचे काम स्लरी करत असते.स्लरी जमिनीचे भौतिक रासायनिक व जैविक गुणधर्म वाढवते.स्लरी जमिनीची पोकळी वाढवते व हवा खेळती ठेवते. स्लरी मुळे mineralisation (organic चे inorganic मदे रुपान्तर होणे) क्रिया लवकर होते, कारण हेच inorganic स्वरूपातील अन्नद्रव्य पीक घेत असते. 

स्लरी मुळे जमिनीचा कर्ब:नत्र गुणोत्तर टिकून राहते.महाराष्ट्रातील बहुताऊस जमिनींमध्ये कॅल्शिअम कार्बोनेट चे प्रमाण जास्त आहे त्यामुळे पिकांच्या मुळ्या ब्लॉक होतात व झाड वाळते, स्लरी दिल्यास ही सस्या येत नाही व मूळ सर्व अन्नद्रव्य व्यवस्थित घेते.स्लरी कशी बनवावी :-स्लरीसाठी आपल्या जनावरांच्या गोठ्यात मलमूत्र साठवण्याची सोय असावी.- जनावरांचे ताजे शेण उन्हात न ठेवता सावलीत ठेवावे.- स्लरी साठी सिमेंटची 300 ते 400 लिटर ची टाकी असावी.स्लरी बनवताना 20 किलो शेण, 10 लिटर गोमूत्र, 200ते250 लिटर पाणी सिमेंटच्या टाकीत टाकून चांगले हालवून घ्यावे.स्लरी चे प्रकार 1.मुख्य अन्नद्रवयाची स्लरी 2.सूक्ष्म अन्नद्रवयाची स्लरी 3.जिवाणूंची स्लरी 4.कडधान्य स्लरी 1.मुख्य अन्नद्रव्याची स्लरी स्लरीचे महत्व या स्लरी मुळे रासायनिक खते पिकास लवकर लागू होतात व त्यांची कार्यक्षमता वाढवते, पांढऱ्या मुळींची भरपूर वाढ होते, मुख्य अन्नद्रव्यातील स्फुरदचे स्थिरीकरण कमी करण्यास मदत करते व नत्राचे बाष्पीभवन होत नाही.

स्लरी कशी बनवावी साधारण 300 ते 350 फळझाडानसाठी ताजे शेण 20 kg, जनावरांचे मूत्र 10 lit, निंबोळी पेंड 15 kg, युरिया 5 kg, सिंगल सुपर फॉस्फेट 10 kg, पोटॅश 5 kg आणि 200 ते 250 lit पाणी या पद्धतीने मुख्य अन्नद्रव्याची स्लरी बनवावी व साधारणपणे महिन्यातून एकदा तरी प्रति झाड 1 lit या प्रमाणात वापरावी.2.सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्य स्लरी सूक्ष्म अन्नद्रव्य मुख्यतो झिंक व फेरस हे जमिनीमध्ये असेच दिल्यास ते पिकाला पूर्णतः न लागता जमिनीत दुसऱ्या रूपात स्थिर होतात, म्हणून शक्यतो सूक्ष्म अन्नद्रव्य जमिनीतून देत असताना स्लरीच्या स्वरूपात द्यावे.त्यासाठी ताजे शेण 20 kg, जनावरांचे मूत्र 10 lit, निंबोळी पेंड 15 kg, झिंक सुल्फेट 5 kg, फेरस सुल्फेट 3 kg, म्यॅग्नीस 2 kg, कॉपर सुल्फेट 100 gm व बोरॉन 30 gm.दुय्यम अन्नद्रव्य स्लरी बनवताना ताजे शेण 20 kg, जनावरांचे मूत्र 10 lit, निंबोळी पेंड 15 kg, कॅल्सीम 15 kg, म्यॅगनेशिअम 15 kg, गंधक 10 kg, 200 ते 250 पाणी द्यावे स्लरी दिवसातून दोन वेळेस चांगले हलवावे.सूक्ष्म आणि दुय्यम अन्नद्रव्य स्लरी मध्ये 10 ते 12 दिवसांचे आंतर ठेवावे.3.जिवाणू स्लरी जिवाणू स्लरीचे फायदे- नत्र युक्त जिवाणू स्लरी मुळे हवेतील नत्र शोषले जाऊन ते पिकांना उपलब्ध करून दिले जाते.- अविद्राव्य स्वरूपातील स्फुरद विरघळून पिकांना उपलब्ध करून दिले जाते.

- सेंद्रिय पदार्थाचे जलद विघटन होते.- बियाणांच्या उगवण क्षमतेत वाद होते.- पिकांची जोमदार वाफ व रोगप्रतिकर शक्तीत वाढ होते.जमिनीचा पोत सुधारतो.- रासायनिक खतावरील खर्चात कपात होते.- हे जिवाणू नैसर्गिक असल्याने जास्त माञेचा जमिनीवर व पिकावर दुष्परिणाम होत नाही.जिवाणू स्लरी कशी बनवावी- ताजे शेण 20 kg, जनावरांचे मूत्र 10 lit, काळा गूळ 2 kg, ऍझोटोबॅक्टर 500 gm, फॉस्फेट सोलुब्लिसिन्ग मायक्रो ऑर्गॅनिसम 500 gm, पोटॅश मोबिलिझर 500 gm, इ एम द्रावण 1 lit व इतर जैविक बुरशीनाशके 1 kg, 200 ते 250 लिटर पाणी.- शक्यतो जैविक खते व बुरशीनाशके एकत्र वापरू नाही.4.कडधान्य स्लरी एक एकर क्षेत्रासाठी कडधान्य स्लरी- ताजे शेण 20 kg, जनावरांचे मूत्र 10 lit, हुमिक ऍसिड व व्हर्मीवॉश 2 lit, भरडा कडधान्य प्रत्येकी 1 kg मूग, मठ, चवळी, हरभरा, मसूर, वाटाणा, उडीद, ई.एम. द्रावण 2lit व 200 ते 250 लि. पाणी.टीप.. वरील सर्व स्लरी द्रावण 5 ते 6 दिवस ठेवायचे, दररोज सकाळी 2 मिनिट हालवायचे व 7 व्या दिवशी वापसावर जमिनीतून पिकाला आळवणी करावी.- हि स्लरी एक एकर क्षेत्रासाठी वापरावी.

 

श्री. ओमप्रकाश हिरे पी. एच. डी. विद्यार्थी मृद विज्ञान आणि कृषि रसायनशास्र म. फु. कृ. वि.

English Summary: Slurry management is beneficial for keeping the soil strong and alive
Published on: 20 May 2022, 10:52 IST