Agripedia

शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी व त्यांच्या शेती व्यवसायाला चांगल्या प्रकारचे जोडधंदे उपलब्ध व्हावेत यासाठी शासन स्तरावर अनेक प्रकारच्या योजना शासनाकडून राबवले जातात. या योजनांचा फायदा शेतकऱ्यांनी घेऊन आर्थिक प्रगती साधणे खूप गरजेचे आहे. याच दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळावे ही एक काळाची गरज आहे. कारण ही शेती आता लोकप्रिय होत असून कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारा हा एक प्रमुख जोडधंदा म्हणून नावारूपास येत आहे.

Updated on 23 September, 2022 9:56 AM IST

शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी व त्यांच्या शेती व्यवसायाला चांगल्या प्रकारचे जोडधंदे उपलब्ध व्हावेत यासाठी शासन स्तरावर अनेक प्रकारच्या योजना शासनाकडून राबवले जातात. या योजनांचा फायदा शेतकऱ्यांनी घेऊन आर्थिक प्रगती साधणे खूप गरजेचे आहे. याच दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळावे ही एक काळाची गरज आहे. कारण ही शेती आता लोकप्रिय होत असून कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारा हा एक प्रमुख जोडधंदा म्हणून नावारूपास येत आहे.

नक्की वाचा:Wheat Farming : शेतकऱ्यांनो तयारीला लागा…! रब्बी हंगाम जवळ येतोय, 'या' जातीचा गहू लागवड करा, लाखों कमवा

यासाठी रेशीम शेतीला प्रोत्साहन मिळावे म्हणून शासनाच्या वतीने स्वतंत्र रेशीम संचालनालय देखील सुरू करण्यात आले आहे व या माध्यमातून शेतकऱ्यांना रेशीम शेतीच्या बाबतीत सर्व सहकार्य व मार्गदर्शन देखील केले जाते.

जर आपण शेतीशी संबंधित असलेल्या जोडधंदे यांचा विचार केला तर इतर कोणत्याही जोडधंदा पेक्षा हा अधिक उत्पादन देणारा व कमी खर्चाचा व्यवसाय आहे व याला खात्रीशीर बाजारपेठ देखील उपलब्ध आहे.

 रेशीम शेतीचे नियोजन

 रेशीम शेतीचे नियोजन करताना तुम्हाला पहिल्या वर्षी जून ते जुलै दरम्यान एक एकर मध्ये तुतीची लागवड करावी लागते व याचे पहिले पीक डिसेंबर मध्ये येते. दुसऱ्या वर्षी मे ते जून या कालावधी दरम्यान तुतीची तळ छाटणी करून जुलै ते ऑगस्ट दरम्यान पहिले पीक घेता येते व ऑक्टोबर मध्ये दुसरे व जानेवारीमध्ये तिसरे व मार्च ते एप्रिल दरम्यान चौथे पीक घेता येते.

जर आपण या मध्ये दुसर्या वर्षाचा विचार केला तर ही चारही पिके मिळून 500 किलो कोष उत्पादन शेतकरी घेऊ शकतो. अशा पद्धतीने वर्षातून चार ते पाच पिके घेता येतात व या पद्धतीने ही शेती केली तर एक एकर तुती लागवडीतून 50 हजार रुपयांचे निव्वळ उत्पन्न शेतकऱ्यांना मिळते.

साहजिकच जास्त क्षेत्रात नियोजन केले तर मिळणारे उत्पन्न देखील वाढत जाते.रेशीम शेती हे कमी कालावधीतील पीक असून वर्षातून चार ते पाच पिके या माध्यमातून मिळतात.

या शेतीचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तुतीची लागवड तसेच किटक संगोपन गृह बांधकाम व संगोपन साहित्य यासाठी पहिल्या वर्षी खर्च करावा लागतो मात्र त्याचा उपयोग तुम्ही पुढील दहा वर्ष करू शकतात. म्हणजे तुम्हाला पुढील दहा वर्षात यावर खर्च करण्याची गरज नसते. एवढेच नाहीतर तूतिच्या फांद्या व कीटकांची विष्टा यापासून उत्कृष्ट प्रकारचे सेंद्रिय खत देखील मिळते.

नक्की वाचा:पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग योजनेला केंद्र सरकारकडून 10 लाख रुपयांचे अनुदान जाहीर

रेशीम शेतीसाठी सवलती

 ज्या शेतकऱ्यांना रेशीम शेती करायची इच्छा आहे अशा शेतकऱ्यांना सवलतीच्या दरामध्ये बेण्याचा पुरवठा देखील करण्यात येतो तसे विद्यावेतनासह प्रशिक्षण, तांत्रिक मार्गदर्शन व सवलतीच्या दरात अंडीपुंज यांचा पुरवठा देखील केला जातो.

शेतकरी गटामध्ये अथवा समूहामध्ये ही 50 ते 100 एकर पर्यंत तुती लागवड करून रेशीम कोष उत्पादन सहकारी संस्था स्थापन करून प्रक्रिया उद्योग देखील सुरू करू शकतात. त्यामुळे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना देखील रेशीम शेती एक फायदेशीर व्यवसाय ठरेल.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे यामध्ये तुम्ही अगदी घरच्या घरी या संबंधीचे सगळी कामे करू शकतात. म्हणजेच तुतीच्या पाल्यांचे  खाद्य अळ्यांना पुरवण्याचे काम घरातील महिला व घरातील इतर मंडळी अगदी आरामात करू शकतात.

 रेशीम शेती अनुदानासाठी महत्त्वाच्या गोष्टी

रेशीम शेतीसाठी कीटक संगोपन गृह बांधकाम, ठिबक सिंचन संच वितरण करण्यासाठी शेतकऱ्यांना सातबारा / आठ अ, गाव नमुना, तुती लागवडीच्या अद्ययावत नोंदी नमूद करणे आवश्यक आहे. पक्के कीटक संगोपन गृह बांधकाम नियोजन व अंदाजपत्रक तयार करून त्याची मान्यता अभियंत्याकडून सादर करणे आवश्यक असते.

तसेच बांधकाम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र, संगोपन गृह बांधकामाचा दाखला, संगोपन गृह बांधकाम व ठिबक सिंचन बसवले याचा दाखला, सात वर्षे कोष उत्पादन कार्यक्रम सुरू ठेवण्याचा करारनामा, लाभार्थी अनुसूचित जाती जमातीचा असलेल्या जातीचा दाखला जोडणे या गोष्टी अनुदानाचा लाभ घेण्यासाठी बंधनकारक आहेत.

नक्की वाचा:आनंदाची बातमी; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात ४८ लाख ४९ हजार रुपयांचा निधी वाटप

English Summary: silk farming is so profitable and benificial for farmer and give more income
Published on: 23 September 2022, 09:56 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)