सिलिकॉन पिकांसाठी वापरल्यामुळे पिकांच्या पानांचा आकार वाढतो. प्रकाश संश्लेषण क्रिया अधिक प्रमाणात होते त्यासोबतच वनस्पतींच्या पेशी पृष्ठभागावर पातळ व टणक थर तयार होतो.तसेच सगळ्यात महत्वाचे म्हणजे पिकावर रस शोषक किडीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.
जर पिकांवर नत्राचा आती वापर केला गेला त्यामुळे काही दुष्परिणाम उद्भवले तर ते दुष्परिणाम कमी करण्यास सिलिकॉनचे मदत होते.तसेच पीककणखर होते व जमिनीवर लोळत नाही. सिलिकॉन मुळे पांढरी मुळे वाढीला चालना मिळते. तसेच फळांमध्ये पाण्याचे संतुलन राखले जाऊन फळांची प्रत सुधारते व टिकवण क्षमता वाढते.
वनस्पती सिलिकॉन कसे घेतात?
वनस्पती सिलिकॉन फक्त मोनोसिलिसिक ऍसिडकिंवा ऑर्थो सॅलिसिक ऍसिड या स्वरूपामध्ये शोषून घेतात. सिलिकॉन मुख्यत्वेकरून मुळांद्वारे पाण्याबरोबर शोषून घेतले जाते. या संपूर्ण प्रक्रियेला मास फ्लोस असे म्हणतात. सिलिकॉन वनस्पतीच्या पेशीभित्तिका मध्ये व मुळामध्ये सिलिकॉन ऑफ साइड चा रूपात जमा होतो.
तसेच झाडांच्या अवयवांमध्ये मोनोसिलिसिक ऍसिड,कोलायडल सिलिसिक ऍसिड इत्यादी रुपात साठून राहतात. सिलिकॉन सर्वप्रथम झाडांचा शेंड्याकडे साठविण्यात येतो. तसेच सर्वात जास्त सिलिकॉन पानांच्या वरच्या थरांमध्ये साठवले जाते. त्यामुळे झाडांमध्ये नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती तयार होते.
सिलिकॉन वापराचे फायदे
- मॅगेनीज व लोह अधिक यामुळे होणारे हानिकारक परिणामांची तीव्रता सिलिकॉन मुळे कमी होते. तसेच ॲल्युमिनियमच्या अधिक्यासाठीही काही प्रमाणात फायदा होतो.
- झाडामधील जस्त आणि स्फुरद यांचा कार्यक्षम वापरासाठी सिलिकॉन फायद्याचे आहे.
- उसामध्ये सिलिकॉन वापरामुळे रोगांचे प्रमाण कमी राहून उत्पादनामध्ये वाढ होते.
- भातामधील आर्सेनिक प्रमाण वाढणे, ही जागतिक समस्या होत आहे.सिलिकॉनचा वापरानेआर्सेनिक समस्या कमी होते. नैसर्गिक रित्या भाताच्या रोग व कीड नियंत्रणात मदत होते.
- गहू व वांगी या पिकांमध्ये सिलिकॉन वापराने कीड व रोगांना प्रतिबंध होतो. तसेच उत्पादनाबरोबरच वांग्याचा तजेलदारपणा वाढल्याचे दिसून आले.यासारखाच फायदा कांदा, गहू, लसूण घास आणि टोमॅटो सारखे पिकांमध्ये दिसून आला आहे.
सिलिकॉन कमतरतेचे दुष्परिणाम
- पाने,खोड व मुळे यांची वाढ मंदावते. झाडांची पाने व खोड मऊ व जास्त प्रमाणात खाली झुकलेली राहतात. कणखरता कमी असल्याने पिक लोळण्याचे प्रमाण वाढते. झाडांचे रोग व कीड प्रतिकारक्षमता कमी होते.
- प्रकाश संश्लेषण क्रिया वर परिणाम होतो. जर भात पिकामध्ये सिलिकॉनचे कमतरता झाली तर प्रति चौरस मीटर ओंब्याची संख्या, प्रति ओंबी दाण्यांची संख्या कमी होते.
Published on: 02 November 2021, 05:20 IST