Agripedia

आज कालच्या युगामध्ये शेतकरी विविध प्रकारची पिके घेत असतो. पिके घेत असताना जमिनीतील सिलिकॉनचे प्रमाण कमी होत असते. याचा परिणाम पुढील येत्या पिकांवर होत असतो, पिकांची वाढ मी होत असते.

Updated on 04 September, 2020 4:38 PM IST


आज कालच्या युगामध्ये शेतकरी विविध प्रकारची पिके घेत असतो.  पिके घेत असताना जमिनीतील सिलिकॉनचे प्रमाण कमी होत असते. याचा परिणाम पुढील येत्या  पिकांवर होत असतो, पिकांची वाढ मी होत असते. पिकांच्या वाढीसाठी तसेच कीड आणि कीटकांच्या अटकाव करण्यासाठी सिलिकॉन ची मदत होते. मातीमधील एकूण मूलद्रव्यांच्या उपलब्ध ते पैकी सिलिकॉन हे दुसऱ्या क्रमांकाचे मूलद्रव्य आहे.पिकांच्या वाढीसाठी सिलिकॉन महत्वाचे असल्याचे तज्ञांच्या विविध प्रयोगातूनही पुढे आले आहे.  पिकांच्या वाढीसाठी महत्त्वाचे असलेले सिलिकॉनचे हाताच्या कार्य कोणते हे आपण या लेखात पहाणार आहोत.

   सिलिकॉन अन्नघटकाची पिकांच्या बाबतीत महत्त्वाचे कार्य

 आपण आपण जो पिकांच्या वाढीसाठी नत्राचा पुरवठा करतो किंवा मॅग्नीज फेरस सारख्या अन्नद्रव्यांचा वापर केला जातो.  जर अन्नद्रव्यांचा अयोग्य वापर झाला तर त्याचे दुष्परिणाम हे पाहायला मिळतात.  होणारे दुष्परिणाम कमी करण्याचे काम सिलिकॉनमुळे होते.  तसेच पिकांवर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.  जेव्हा पावसाळ्यात पिकांना पाण्याची ओढ पडते. तसेच दुष्काळी भागात पाणी कमी असल्याचा झटका पिकांना वारंवार बसत असतो.  तेव्हा योग्यवेळी योग्य प्रमाणात जर सिलिकॉनचा पुरवठा पिकांना केला तर पिकांची कमी पाण्यात तग धरून ठेवण्याची क्षमता वाढते. पिकांना आवश्‍यक असणाऱ्या पांढऱ्या मुळांची वाढ होण्यास मदत होते.  उंच वाढणारी पिके कणखर बनल्यामुळे ते जमिनीवर लोळत नाहीत.  फळांमध्ये पाण्याचे संतुलन राखले जाऊन फळांचे प्रत निर्यातक्षम होण्यास मदत होते त्यांची टिकवण क्षमता वाढते.

 


महत्त्वाचे म्हणजे द्विदल वर्गीय पिकांमध्ये सिलिकॉनचे प्रमाण अतिशय कमी असते म्हणून ते पिके सिलिकॉन संग्राहक म्हणून ओळखले जातात.  तुलनेने एकदल पिकांमध्ये सिलिकॉनचे प्रमाण बऱ्यापैकी असते म्हणून या पिकांना सिलिकॉन संग्राहक पिके असं म्हणतात. सिलिकॉन हे पूरक अन्नद्रव्य म्हणून ओळखले जाते. वनस्पतीच्या विविध भागांमध्ये नत्र व पालाश यांच्या तुलनेने सिलिकॉनचे प्रमाण हे जास्त असते.  भात, गहू, ऊस व इतर द्विदल वर्गीय पिकांच्या वाढीवर व उत्पादनावर चांगल्या प्रकारचे परिणाम सिलिकॉन वापराने दिसून आले आहेत.  सिलिकॉन हे पिकामध्ये झाडाच्या वरच्या शेंड्यामध्ये साठविण्यात येते.  त्यामुळे पिकांची रोगप्रतिकार शक्ती वाढते.

       सिलिकॉनच्या कमतरतेचे परिणाम

सिलिकॉनच्या कमतरतेमुळे पिकांच्या प्रकाश संश्लेषण क्रियेवर परिणाम होऊन झाडांची रोग व कीड प्रतिकारक्षमता कमी होते.  पिकाची पाने,  खोड व मुळांची वाढ मंदावते.  झाडांची पाने व खोड मऊ व जास्त प्रमाणात खाली झुकलेली राहतात.  त्यामुळे पिकांचे जमिनीवर लोडण्याचे  प्रमाण वाढते.  या सगळ्यांचा परिणाम असा होतो की उत्पादनात घट होते.

   सिलिकॉनचे फायदे

  स्फुरद व जास्त यांच्या कार्यक्षम वापरासाठी सिलिकॉनची आवश्यकता असते.  ऊसासारख्या पिकांमध्ये सिलिकॉनच्या वापरामुळे रोगांचे प्रमाण कमी होऊन उत्पादनात वाढ होते.  सिलिकॉनचा वापर यामुळे गहू आणि वांगी या पिकांमध्ये कीड व रोग प्रतिबंधास मदत होते.  वांग्यामध्ये तजेलदारपणा वाढून येतो.  तसेच भात पिकांमधील आर्सेनिकचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.  त्यामुळे नैसर्गिक रीत्या भात पिकावरील रोग व कीड नियंत्रणास मदत होते. म्हणून आपण योग्य प्रमाणात जर सिलिकॉनचा पुरवठा पिकांना केला तर ते फायद्याचे होऊन उत्पादनात वाढ होऊ शकते.



English Summary: Silicon is needed to protect crops from pests
Published on: 04 September 2020, 04:37 IST