Agripedia

गेली सात वर्षे राज्य सरकारने कर्जमाफीचे आमिषे दाखवून शेतकऱ्यांना लटकत ठेवले. त्यामुळे आर्थिक संकटाचे दुष्टचक्र - भरमसाठ व्याज वाढले, ऐन पेरणीच्या वेळी नवीन कर्ज उपलब्ध नाही, सावकारांकडून कर्जे, बँकांकडून मानहानी / अपमान, असे सुरू झाले.

Updated on 27 December, 2021 2:29 PM IST

सावकारांकडून कर्जे, बँकांकडून मानहानी / अपमान, असे सुरू झाले.

कृषीद्रोही धोरणांमुळे शेतमालाला भाव नाही, निसर्गाचा मारा, वीज तोडणी अशा संकटांच्या मालिका चालु आहे.

महाराष्ट्र बरेच वर्षे शेतकऱ्यांच्या आत्महत्या. आकडेवारीमध्ये इतर राज्यांच्या किती तरी पुढे पहील्या क्रमांकावर आहे.

त्याची कारणे सांगताना नापिकी, दुष्काळ, अतिवृष्टी असे दाखवुन दिशाभुल केली जाते. प्रत्यक्षात अनेक कारणांपैकी एक महत्वाचे आहे कर्जाचा बोजा

 प्रत्यक्षात अनेक कारणांपैकी एक महत्वाचे आहे कर्जाचा बोजा.

सन 2020 साली देशामध्ये, सर्वाधिक महाराष्ट्रात 4006 आत्महत्या झाल्या. म्हणजे दिवसाला 11 हत्या.पण सरकार कोणतीही प्रतिबंधनात्मक कृती कार्यक्रम आखीत नाही.ह्या विषया शिवाय इतर कुठलाही विषय प्राधान्य क्रमांकाचा होऊच शकत नाही.

महात्मा ज्योतीराव फुले कर्जमाफी योजना जाहीर केल्याला, 27 डिसेंबर 2021ला दोन वर्षे पुर्ण होतात. सरसकट कर्जमुक्तीच्या नावाखाली सकुंचित कालखंड, फक्त पीक कर्ज व दोन लाख रू. खालील कर्ज अशा अटी

टाकल्यामूळे लाखो शेतकरी (77%) या योजनेपासून वंचित राहीले आहेत. नियमित कर्ज परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांनाही सानुग्रह / प्रोत्साहनपर मदत दिली नाही.

निवडणुका पुर्वी दिलेली वचननामे, जाहीरनामे, शपथनामे पाळली गेली नाहीत.

अजुन किती दिवस धोंगडं भिजत ठेवणार आहात?

#TargetZero_FarmersSuicides

सतीश देशमुख, B.E. (Mech.), पुणे अध्यक्ष, फोरम ऑफ इंटलेकच्युअल्स 9881495518

एकच ध्यास- शेतकरी आणि एकात्मिक ग्रामीण विकास!

English Summary: Shraddha, the second year of the debt waiver scheme.
Published on: 27 December 2021, 02:29 IST