Agripedia

शेतकरी शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पिके घेत असतात. कुठलेही पीक घेताना त्यामागे उद्देश असतो की उत्पादन वाढावे व दोन पैसे हातात यावेत. परंतु बऱ्याचदा शेतकऱ्यांना जास्त कालावधीची पिके आणि लागणारे भांडवल ही जास्त प्रमाणात लागणारी पिके घेतल्यामुळे आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते यामध्ये बऱ्याचदा वेळही जातो आणि हातात अपेक्षित उत्पन्नही हाती लागत नाही.

Updated on 26 November, 2021 12:35 PM IST

 शेतकरी शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पिके घेत असतात. कुठलेही पीक घेताना  त्यामागे उद्देश असतो की उत्पादन वाढावे व दोन पैसे हातात यावेत. परंतु बऱ्याचदा शेतकऱ्यांना जास्त कालावधीची पिके आणि लागणारे भांडवल ही जास्त प्रमाणात लागणारी पिके घेतल्यामुळे आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते यामध्ये बऱ्याचदा वेळही जातो आणि हातात अपेक्षित  उत्पन्नही हाती लागत नाही.

ह्या लेखात आपण  कमीकालावधी, कमी गुंतवणुकीच्यापिकांची माहिती घेणार आहोत. जेणेकरून या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढू शकते.

वेलवर्गीय भाजीपाला पिके

 आपल्याला माहित आहेच कि वेलवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये काकडी, कारली, दोडके, दुधीभोपळा या प्रमुख भाज्यांचा समावेश होतो.या सर्व वेलवर्गीय भाज्यांची लागवड बियांद्वारे व रुंद अंतर ठेवले जाते. लागवड केल्यानंतर बियांची उगवण होते त्याच्या नंतर काही दिवसांनी वेलीला वळण देणे व आधार देणे ही महत्वाची कामे असतात. वेलवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये जर वेलीला मंडप किंवा तारेच्या ताटीचा आधार दिला तर दर्जेदार उत्पादन मिळते.कारली, दुधी भोपळा आणि दोडके हे कमकुवत वेल  वर्गात मोडणारी पिके असून त्यांच्या वेलींना चांगला आधार मिळाला तर त्यांची वाढ चांगली होण्यास मदत होते.

वांगी, टोमॅटो आणि मिरची यांची लागवड

 मिरची, टोमॅटो, वांगी या त्यांनी पिकांची रोपे गादीवाफ्यावर करावी. गादीवाफ्यावर बियाणे पेरून झाल्यानंतर साधारणपणे जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात रोपांची पुनर्लागवड केली जाते. या पिकांमध्ये विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी काळजी घ्यावी लागते. मिरचीची लागवड करताना तिचे उत्पादन मार्च ते मे महिन्यात हातात येईल या दृष्टीने करावे.मिरची पिकामध्ये फुले ज्योती या जातींची लागवड केली तर या जातीच्या मिरच्या झुपक्यातयेतात आणि पाने देखील दाट असतात.

 तसेच वांगी या पिकासाठी उंच व डेरेदार वाढ असणारा काटेरी डेट, पांढऱ्या,हिरव्या रंगाची छटा एकत्र असणाऱ्या चकाकी दार  फळ येणारे वाणाची निवड करावी.वांगी पिकाला शेणखत व रासायनिक खते यांचा संतुलित वापर करावा. त्यासोबतच टोमॅटो पिकासाठी वाण निवडताना जास्त पानेअसणारा, उष्ण तापमानात फळधारणा होणारा, फळांना तडे न जाणारा निवडावा. टोमॅटोची लागवड शक्यतो लवकर करावी. कारण उष्ण हवामानात फळधारणा कमी होते.

भेंडी आणि गवार

 उन्हाळ्यामध्ये घेतल्या जाणाऱ्या या भाज्यांना मागणी सुद्धा अधिक असते. भेंडी लागवड करायची असेल तर हळदया या रोगास प्रतिकार करणाऱ्या वाणांची निवड करावी. उदाहरणार्थ परभणी, क्रांती, सवानी आणि पूसातसेच गवारी साठी पुसानाव बहार,पुसा सदाबहार या जातींची लागवड करावी. पिकांची काढणी संध्याकाळच्या वेळेस करावी.

 

कोथिंबीर

 उन्हाळी हंगामात कमी पाण्यावर येणारे कोथिंबिरीचे पीक कमी कालावधीत चांगले पैसे देऊन जाते. दर आठ दिवसांच्या अंतराने टप्प्या टप्प्याने याची  लागवड करावी.

राजगिरा,मेथी  यांची लागवड

या लागवडीसाठी पाण्याचा हमखास आणि सलग पुरवठा असणे आवश्यक असते. या पिकांच्या विक्रीसाठी बाजारपेठ जवळ असायला हव्यात तसेच वाहतुकीच्या सोयी देखील उत्तम असणे आवश्यक आहे.कमी कालावधीत व कमी भांडवलातया पिकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळू शकते.

English Summary: short term and short duration crop is benificial for farmer lika as bitter gourd ,okra
Published on: 26 November 2021, 12:35 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)