लातूर जिल्ह्यातील उसाचा पट्टा असलेला भाग म्हणजे लातूर ग्रामीण. या भागातील तांदूळजा या गावाच्या शिवारातील सारसा मायनर या परीसरातील ऊस शेतीला साडे चार ते पाच वाजेच्या दरम्यान आग लागली. काहीच कालावधीत आगीने पन्नास एकर उसाशेतीला आपल्या कवेत घेतले
तांदूळजा येथील ग्रामस्थ नानासाहेब गायकवाड यांच्या शेतात सर्वप्रथम आग लागली. ते त्यावेळी शेतातच होते. त्याच्या शेतातील विजेच्या खांब वरील तारा ह्यात घर्षण झाले आणि आगीच्या ठिणग्या निर्माण झाल्या. उसाच्या वाळलेल्या चिपाटानी आग पकडली.
काही वेळात हि आग वाऱ्यासारखी पसरत गेली. या भागातील पन्नास एकर ऊस जळून किंवा करपून गेला आहे .काढणीला आलेला ऊस जळून गेल्यामुळे हातातोंडाशी आलेला घास गेल्याचे दुःख जास्त आहे. आग भीषण होती . यात शेतातील ठिबक ची पाईप लाईन. जनावरांसाठीचा चारा . शेतीची साहित्य अवजारे यासारख्या अनेक वस्तू जळून भस्मासात झाल्या आहेत.
माझे सहा एकर वरील ऊस आणि शेतातील साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे . शेतातील साहित्याचे विषय मोठा नाही .मात्र ऊस जळाल्यामुळे माझे आर्थिक गणितच कोलमडून पडले आहे .
शेतातून जाणाऱ्या हाय टेन्शन ताराच्या घर्षणातून शॉर्ट सर्किट झाले आणि काही वेळातच आग भडकली अशी माहिती नानासाहेब गायकवाड यांनी दिली आहे.
या आगीची माहिती प्रशासनास मिळाली आहे . आग विझविण्यासाठी अनेक प्रयास सुरु आहेत . विकास साखर कारखान्याचा अग्निशमन गाडी घटनास्थळी तात्काळ दाखल झाली होती . मात्र आगीचे क्षेत्र खूप मोठे असल्यामुळे ते प्रयास कमी पडले आहेत .
यावर उपाय म्हणून ग्रामस्थानी श्यक असतील तेवढ्या ठिकाणावरून आग विझण्यासाठी पाण्याचा वापर सुरु केला . आग इतर ठिकाणी पसरू नये यासाठी ग्रामस्थानी प्रयास केले . यात दोन तासांनी यश आले आहे.
Published on: 22 December 2021, 10:09 IST