भारतातील शेतकरी आता आधुनिक शेती करण्याकडे वळला आहे. पारंपरिक पिकांसोबत आधुनिक पीके घेण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. या पिकांमध्ये शिमला/ढोबळी मिरची या पिकाचाही समावेश आहे. शहरी भागात या शिमला मिरचीला मोठी मागणी आहे. आज याच शिमला मिरचीच्या लागवडीविषयी माहिती घेणार आहोत.
आपल्याला माहितीच आहे की, शिमला मिरचीला भाजीपाल्याच्या शेतीत एक महत्त्वपूर्ण स्थान आहे. शिमला ही मिरचीची एक प्रजाती आहे जी भाजीपाला म्हणून वापरली जाते. हे ग्रीन पेपर, गोड पेपर, बेल पेपर इत्यादी वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. ही तिखटपणात आणि आकारात मिर्चीपेक्षा वेगळी आहे. याची फळे कोमल, मांसल, जाड, बेल-आकाराचे आहेत, कुठून बाहेर आलेली आणि कुठूनतरी खाली दाबलेली असतात.
हे भारताचे महत्त्वाचे पीक आहे. मुख्यतः कढी, लोणचे, चटणी आणि इतर भाज्यांमध्ये याचा वापर केला जातो. या मिरचीची उत्पत्ती मेक्सिको मध्ये झाल्याचे मानले जाते. हे 17 व्या शतकात भारतात दाखल झाले. हे औषधी गुणांनीही भरपूर असते. बाजारात शिमला लाल, हिरव्या किंवा पिवळ्या रंगात उपलब्ध आहे. शिमला मिरची कोणत्याही रंगाची असू द्या त्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि बीटा-कॅरोटीन भरपुर प्रमाणात असते.
मिरची उत्पादनात भारत हा प्रमुख देश आहे. मिरची ताजी, वाळून किंवा चूर्ण करून देखील वापरले जाऊ शकते. भारतात मिरचीची लागवड मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, ओरिसा, तामिळनाडू, बिहार, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये केली जाते.
लागवडीची वेळ
नर्सरीमध्ये बियाणे पेरण्यासाठी योग्य वेळ जून ते जुलै, ऑगस्ट ते सप्टेंबर आणि नोव्हेंबर ते डिसेंबर असा आहे.
तसेच लागवडीसाठी जुलै ते ऑगस्ट, सप्टेंबर ते ऑक्टोबर आणि डिसेंबर ते जानेवारी हा कालावधी लागवडीसाठी योग्य वेळ आहे.
अंतर
बेल्यांदरम्यान 60 सेमी आणि रोपांच्या दरम्यान 30 सें.मी. अंतरावर दुहेरी ओळीत लागवड केली जाते.
- बियाणे 2-4 सेमी खोलीवर लागवड करावी.
रोपवाटिकेत बियाणे पेरण्याची पद्धत
पेरणीच्या एक दिवस आधी, बिया पाण्यामध्ये भिजवल्या पाहिजेत. भिजवण्यापूर्वी ते हातांनी चोळले पाहिजेत.बियाण्याला सडण्यापासून वाचवण्यासाठी बियाण्यावर बुरशीनाशकाचा उपचार केला पाहिजे. बियाणे पेरल्यासारखे न पेरता एका ओळीत खोचुन लागवड करावी,जेणेकरून ते सहजारित्या उपटता येतील.
बियाणे उपचार
मातीपासुन रोग टाळण्यासाठी पेरणीपूर्वी बियाणे थायरम किंवा कॅप्टन किंवा सिरेसन मध्ये 2ग्रॅम / कि.ग्रा.या प्रमाणात लावावे.
अनुकूल हवामान
शिमला लागवडीसाठी सौम्य आर्द्र हवामान आवश्यक आहे. त्याच्या चांगल्या वाढीसाठी, किमान 21 ते 25 डिग्री सेल्सियस तपमान असणे चांगले आहे.
जमीनीची निवड
शिमला लागवडीसाठी, चांगल्या ड्रेनेज सिस्टमसह वालुकामय आणि गुळगुळीत चिकणमाती माती योग्य आहे. सेंद्रिय पदार्थ असलेली माती यासाठी अधिक योग्य आहे.
शेतीची तयारी
शिमलाच्या लागवडीसाठी लागवड करण्यापूर्वी 4-5 वेळा चांगली नांगरणी करावी. शेवटच्या नांगरणीच्या वेळी,जमीन समतलं करावी. आणि योग्य प्रकारे वाफे आवश्यकतेनुसार बनवावेत. शेतात पाणी साचणार नाही हे सुनिश्चित करा.
खते किंवा रासायनिक खते
शिमला लागवडीपूर्वी गांडूळ खत किंवा शेणखत एकरी 20-25 टन दराने जमिनीत चांगले मिसळावे.रासायनिक खते नायट्रोजन 50कि.ग्रा., फॉस्फरस 25 कि.ग्रा. आणि पोटॅशियम 12 कि.ग्रा.प्रति एकरी टाकावे.नायट्रोजन दोन भागात विभागले पाहिजे आणि लावणीनंतर 30 आणि 55 दिवसांनी टॉप ड्रेसिंग म्हणून शिंपडावे. रासायनिक खतांचा वापर माती परीक्षणाच्या आधारावर केला पाहिजे हे लक्षात घ्या.
तण नियंत्रण
चांगल्या पिकाच्या उत्पादनासाठी, निंदनी/खुरपणी ही आवश्यकतेनुसार आणि योग्य कालांतराने करावी. नवीन झाडे लागवडीनंतर 2 आठवड्यांनंतर गाद्यावर माती लावा, यामुळे शेतात तण कमी होण्यास मदत होते. लागवडीच्या 30 दिवसानंतर पहिली खुरपणी करावी. 60 दिवसांनी दुसरी खुरपणी करा.
सिंचन/पाणी व्यवस्थापन
बियाणे पेरल्यानंतर लगेच थोडे पाणी द्या. आणि लागवड झाल्यानंतर लगेच पाणी द्यावे. रोपे चांगले उभे होईपर्यंत दररोज पाणी देणे आवश्यक आहे, त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. शेतात पाण्याचा साठा संपणार नाही हे सुनिश्चित करा. ठिबक सिंचन पद्धतीचा वापर शिमला पिकासाठी फायदेशीर आहे.
कापणी/तोडणी
कॅप्सिकम/ शिमला मिरचीची काढणी लागवडीनंतर 60 ते 70 दिवसानंतर होते, जी 90 ते 120 दिवस टिकते. तोडणी नियमितपणे करावी.
उत्पादन
शास्त्रीय तंत्राने कॅप्सिकम/शिमला लागवड केल्यास व जमिनीनुसार जातं निवडल्यास चांगल्या जातींमध्ये प्रति हेक्टर 150 ते 250 क्विंटल आणि संकरीत जातीत 250 ते 400 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळते.
Published on: 13 July 2021, 12:07 IST