सध्या फुलशेतीमध्ये बरेच शेतकरी नशीब आजमावत असून उत्तम तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी आता फुलशेती करू लागले आहेत. जास्त करून शेतकरी बांधव पॉलिहाऊसमध्ये फुलशेती करण्याला प्राधान्य देतात. जर आपण फुलशेतीचा विचार केला तर अनेक वेगवेगळ्या फुलांची लागवड शेतकरी करतात. जर आपण फुलांच्या बाजारपेठेचा विचार केला तर याला उत्तम बाजारपेठ असून निर्यातीला देखील संधी आहे.
नक्कीच व्यवस्थित व्यवस्थापन आणि थोडीशी माहिती घेऊन जर फुलशेतीमध्ये उतरले तर नक्कीच यश मिळू शकते. या लेखामध्ये आपण अशाच एका फुलशेती बद्दल माहिती घेणार आहोत,जीशेतकरी बंधूंना चांगले व्यवस्थापन केले तर उत्तम नफा देऊ शकते.
दसरा दिवाळीच्या निमित्ताने फुले येतील अशा आशयाने करा शेवंती लागवड व या पद्धतीने करा व्यवस्थापन
1- जर तुमच्या डोक्यात शेवंती लागवड करायचा विचार असेल तर यासाठी मध्यम हलकी, पाण्याचा चांगला निचरा होणारी व भरपूर सेंद्रिय पदार्थ असलेली जमिनीची निवड करणे गरजेचे आहे. परंतु भारी जमीन या फुल पिकासाठी निवडू नये.
2- शेवंती व्यवस्थापनामध्ये लागवड केल्यानंतर सुरुवातीला भरघोस वाढ झाली तर उत्पादन देखील भरघोस मिळते.
3- पिकाची वाढ व फुलांवर येण्याचा काळ लक्षात ठेवूनच लागवडीचे नियोजन करावे. तुमच्याकडे पाण्याची उपलब्धता कोणत्या पद्धतीचे आहे यानुसार लागवड नियोजन करावे.
4- लागवडीसाठी प्रथम जमीन तयार करताना नांगरून, कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करून देणे गरजेचे असून जमीन तयार करत असतानाच एका हेक्टरसाठी 25 ते 30 टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीमध्ये मिसळून घ्यावे.
6- तुमच्या जमिनीचा उतार ज्या पद्धतीचा असेल त्या उताराला आडव्या 60 सेंटिमीटर अंतरावर सऱ्या पाडून वाफे तयार करून घ्यावे. लागवडीसाठी मागील हंगामातील शेवंती पिकाच्या निरोगी आणि सुदृढ काश्या वापराव्यात. लागवड करताना सरीच्या दोन्ही बाजूस 30 सेंटिमीटर अंतरावर बगलेत करावी. लागवड करताना दुपारी न करता ऊन कमी झाल्यानंतर करावी म्हणजे रोपांची मर कमी होते.
7-लागवडीसाठी राजा, पिवळी व पांढरी रेवडी, शरद माला तसेच रतलाम चंद्रमा यासारख्या जातींची निवड करावी.
8- शेवंती पासून दर्जेदार उत्पादन मिळवायचे असेल तर जमीन तयार करताना हेक्टरी 25 टन शेणखतमिसळून घ्यावे व लागवड करताना हेक्टरी 150 किलो नत्र,200 किलो स्फुरद आणि 200 किलो पालाश त्यासोबतच लागवडीनंतर एक ते दीड महिन्यांनी दीडशे किलो नत्र प्रति हेक्टरी द्यावे.
9- उन्हाळी हंगामात लागवड करायची असल्यामुळे पाण्याचा ताण पडणार नाही याची तंतोतंत काळजी घेणे गरजेचे आहे. लागवड केल्यानंतर जोपर्यंत पाऊस सुरू होत नाहीत तोपर्यंत पाच ते सात दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या देणे गरजेचे आहे.
जमिनीचा मगदूर आणि पिकाची पाण्याची गरज ओळखून पाणीपुरवठा करावा. परंतु फुले येण्याचा व फुलण्याचा काळामध्ये पाण्याचा अजिबात ताण पडणार नाही याची तंतोतंत काळजी घ्यावी.
10- लागवडीनंतर शेंडा खुडण्याचे काम चौथ्या आठवड्यानंतर करावे. यामुळे झाडाला अधिक फुटवे फुटून फुलांच्या उत्पादनात भरघोस वाढ होण्यास मदत होते.
11- जातीनुरूप फुलांची काढणी लागवडीनंतर तीन ते पाच महिन्यांनी करावी. लवकर उमलणाऱ्या जातींचे एकूण चार ते सहा तर उशिरा उमलणाऱ्या जातींचे आठ ते दहा तोडे मिळतात.
Published on: 23 October 2022, 07:32 IST